मराठी बातम्या  /  लाइफस्टाइल  /  गर्दीपासून लांब कुठे तरी शांत ठिकाणी जायचे? मग ठाण्याजवळील ‘या’ पर्यटन स्थळांना नक्की भेट द्या

गर्दीपासून लांब कुठे तरी शांत ठिकाणी जायचे? मग ठाण्याजवळील ‘या’ पर्यटन स्थळांना नक्की भेट द्या

Aarti Vilas Borade HT Marathi
Jun 13, 2024 03:36 PM IST

शहरात राहणाऱ्या प्रत्येकाला गर्दीपासून लांब आणि शांत ठिकाणी जायची इच्छा असते. शहराजवळच अगदी कमी वेळात कुठे जाता येईल हे चला जाणून घेऊया...

thane hill station: ठाण्याजवळील पर्यटन स्थळे
thane hill station: ठाण्याजवळील पर्यटन स्थळे

शहरात राहणाऱ्या लोकांचे आयुष्य हे अतिशय धकाधकीचे असते. सतत धावपळ, आजूबाजूला आवाज, प्रदूषण अशा अनेक गोष्टी असतात. आपल्या व्यग्र वेळापत्रकातून वेळ काढून सर्वजण शांततेच्या ठिकाणी, कमी प्रवास करावा लागेल अशी ठिकाणी जाण्यासाठी उत्सुक असतात. जर तुम्हीही जायचा निर्णय घेत असाल तर ही बातमी नक्की वाचा. कारण याबातमीमध्ये आम्ही तुम्हाला शहराच्या आसपास असणाऱ्या शांत पण पर्यटन स्थळांची माहिती देणार आहोत.

उपवन तलाव

ठाणे शहरापासून थोडे लांब आणि शांत असलेले तलाव म्हणजे उपवन तलाव. या तलावाच्या शेजारी असलेली झाडे आणि तेथील शांतता मन शांत करते. तसेच पावसाळ्यात उपवन सरोवराचे सौंदर्य सुंदर असते, कारण आजूबाजूचे पर्वतही या तलावाच्या सौंदर्यात भर घालतात. या तलावाच्या काठावर तुम्ही चांगला क्वालिटी टाइम घालू शकता.
वाचा : दिवसभर उत्साही राहण्यासाठी या गुलाबी ड्रिंकने करा सुरुवात, वाचा रेसिपी

येऊर हिल्स

ठाणे शहरापासून जवळपास ८ किलोमीटर अंतरावर असलेले हे ठिकाण अतिशय सुंदर आहे. हा एक डोंगराळ भाग आहे. या भागात सुंदर हिरवळ आहे. पावसाळ्यात या टेकड्यांचे सौंदर्य अद्भूत असते, त्यामुळे पावसाळ्यात येथे सर्वाधिक पर्यटक येतात, असे म्हटले जाते. येथे जाऊन तुम्ही सायकल चालवून आनंद घेऊ शकता.
वाचा : फ्रेंच फ्राईज, बटाटा वडा रोज खाताय? जाणून घ्या शरीरावर काय होत परिणाम

ट्रेंडिंग न्यूज

अक्सा बीच

ठाण्यासाठी जर तुम्ही गाडीने प्रवास करत असाल तर रस्त्यात तुम्हाला एक समुद्रकिनारा देखील लागेल. या समुद्र किनाऱ्याचे नाव अक्सा बीच आहे. जवळपास ४० किलोमीटर अंतरावर हा समुद्र किनारा आहे. अक्सा बीचवरून तुम्ही अरबी समुद्राच्या सुंदर लाटा पाहू शकता. येथील शांतता तुम्हाला प्रचंड आवडेल. त्यामुळे तुम्ही नक्की येथे जा.
वाचा : घरी पाळीव श्वान आणताय? मग 'या' पाच गोष्टी नक्की लक्षात ठेवा

ओवळेकर वाडी-फुलपाखरू बाग

अनेकांना फुलपाखरे पाहणे, त्यांचे फोटो काढण्याची खूप इच्छा असते. त्यामुळे ठाण्यातील आवळेकर गार्डनर हे योग्य पर्याय ठरु शकतात. हे शहरापासून केवळ दोन किलोमीटर अंतरावर आहे. येथे हजारे झाडे आणि वनस्पतींमध्ये वेगवेगळ्या प्रजातीची फुलपाखरे आहेत. रंगीबेरंगी फुलपाखरे पाहण्यासाठी तुम्ही येथे जाऊ शकता.
वाचा : जलतरणपटूंना होऊ शकते कानाच्या संसर्गाची समस्या, जाणून घ्या काय आहे स्वीमर्स इयर आजार

WhatsApp channel
विभाग