वांद्रे येथील घराबाहेर झालेल्या गोळीबार प्रकरणी मुंबई क्राईम ब्रँचने नोंदवला सलमान खानचा जबाब; विचारले १५० प्रश्न!
मराठी बातम्या  /  मनोरंजन  /  वांद्रे येथील घराबाहेर झालेल्या गोळीबार प्रकरणी मुंबई क्राईम ब्रँचने नोंदवला सलमान खानचा जबाब; विचारले १५० प्रश्न!

वांद्रे येथील घराबाहेर झालेल्या गोळीबार प्रकरणी मुंबई क्राईम ब्रँचने नोंदवला सलमान खानचा जबाब; विचारले १५० प्रश्न!

Jun 13, 2024 03:52 PM IST

अभिनेता सलमान खानच्या वांद्रे येथील निवासस्थानाबाहेर झालेल्या गोळीबाराच्या घटनेप्रकरणी मुंबई गुन्हे शाखेने त्याचा जबाब नोंदवला आहे. यावेळी अभिनेत्याला तब्बल १५० प्रश्न विचारले गेले.

वांद्रे येथील घराबाहेर झालेल्या गोळीबार प्रकरणी मुंबई क्राईम ब्रँचने नोंदवला सलमान खानचा जबाब
वांद्रे येथील घराबाहेर झालेल्या गोळीबार प्रकरणी मुंबई क्राईम ब्रँचने नोंदवला सलमान खानचा जबाब

अभिनेता सलमान खानच्या वांद्रे येथील निवासस्थानाबाहेर झालेल्या गोळीबाराच्या घटनेप्रकरणी मुंबई गुन्हे शाखेने त्याचा जबाब नोंदवला आहे. पोलिसांनी ४ जून रोजी सलमानचा भाऊ आणि अभिनेता अरबाज खानचा जबाब ही नोंदवला. मुंबईतील वांद्रे परिसरातील गॅलेक्सी अपार्टमेंटमधील सलमानच्या घराबाहेर १४ एप्रिल रोजी गोळीबाराची घटना घडली होती. त्यानंतर झालेल्या अटकेत लॉरेन्स बिश्नोई टोळीशी संबंध असल्याचे उघड झाले आणि मुंबई पोलिसांनी या गोळीबारात सहभागी असलेल्या सर्वांवर महाराष्ट्र संघटित गुन्हेगारी नियंत्रण कायदा (मोक्का) लागू केला.

नव्या माहितीनुसार मुंबई पोलिसांनी गोळीबार प्रकरणी सलमान खानची चौकशी केली आहे. यावेळी पोलिसांनी भाईजानला एक-दोन नव्हे तर, तब्बल १५० प्रश्न विचारले. पोलिसांच्या सूत्रांच्या माहितीनुसार, गुन्हे शाखेच्या चार सदस्यीय पथकाने ४ जून २०२४ रोजी दुपारी सलमान खान याच्या निवासस्थानी भेट दिली. यादरम्यान त्यांनी चार तास सलमानचा जबाब नोंदवला. चौकशीदरम्यान सलमानने मुंबई पोलिसांचे मदतीसाठी कौतुकही केले.

आजीचा प्लॅन सफल होणार? एजे लीलाला घरी घेऊन जाणार? ‘नवरी मिळे हिटरलला’चं कथानक रंजक वळणावर

लॉरेन्स बिश्नोईच्या टोळीने केला गोळीबार!

गँगस्टर लॉरेन्स बिश्नोईचा भाऊ अनमोल बिश्नोई याने हल्लेखोरांना प्रेरित करण्यात महत्त्वाची भूमिका बजावली होती. १५ मार्च रोजी पनवेलमध्ये शस्त्रास्त्रांची डिलिव्हरी मिळाल्यानंतर अनमोलने शूटर्सना टार्गेटची माहिती दिली आणि अभिनेत्याच्या घरावर गोळीबार करण्याच्या सूचना दिल्या. सुनियोजित गोळीबाराची घटना सूचनेनुसार राबवण्यात आली, या दरम्यान शूटर्सना एकूण तीन लाख रुपये मिळाले होते.

साक्षीने गेमच केला! पत्रकार परिषद घेत चैतन्य आणि अर्जुनवर लावले आरोप! ‘ठरलं तर मग’मध्ये ट्वीस्ट

अरबाज खानने दिले निवेदन!

या धक्कादायक घटनेनंतर काही दिवसांनी अरबाजने आपल्या कुटुंबीयांच्या वतीने एक निवेदन जारी केले. या पोस्टमध्ये अरबाजने म्हटले आहे की, ‘या विशेष त्रासदायक घटनेचा कुटुंबावर परिणाम झाला आहे. सलीम खान कुटुंबीयांचे निवासस्थान असलेल्या गॅलेक्सी अपार्टमेंटमध्ये मोटारसायकलवरून दोन अनोळखी व्यक्तींनी गोळीबार केल्याची घटना अत्यंत विदारक आणि अस्वस्थ करणारी आहे. घडलेल्या या धक्कादायक घटनेने आमचे कुटुंबीय हैराण झाले आहेत. दुर्दैवाने, आमच्या कुटुंबाशी जवळचे असल्याचा दावा करणारे आणि प्रवक्ते असल्याचे भासवणारे काही लोक प्रसारमाध्यमांना हे सर्व पब्लिसिटी स्टंट आहे आणि कुटुंब व्यवस्थित आहे, असे जे काही म्हणत आहेत ते खरे नाही’, असे निवेदनात म्हटले आहे.

सलीम खान कुटुंबातील एकाही सदस्याने या घटनेबाबत माध्यमांसमोर कोणतेही वक्तव्य केलेले नाही. यावेळी या अनुचित घटनेच्या तपासात कुटुंबीय पोलिसांना मदत आणि सहकार्य करत आहेत. आम्हाला मुंबई पोलिसांवर विश्वास आहे आणि आम्हाला आश्वासन देण्यात आले आहे की, ते आमच्या कुटुंबाचे संरक्षण आणि सुरक्षिततेसाठी त्यांच्या क्षमतेनुसार सर्व काही करतील. तुमच्या प्रेम आणि पाठिंब्याबद्दल सर्वांचे आभार,' असे अरबाजने लिहिले आहे.

Whats_app_banner