'लक्ष्मीच्या पाऊलांनी' मालिकेत कला खरे आणि अद्वैत चांदेकरची कथा दाखवण्यात आली आहे. कलाला चांदेकर कुटुंबीयांमध्ये स्वत:चे स्थान निर्माण करण्याचा प्रयत्न करत आहे. आबा कायमच कलाच्या पाठीशी आहेत. पण चांदेकर कुटुंबीय कलाला ज्या प्रकारे वागवत आहेत ते पाहून नैनाला आनंद होत आहे.
कलाची बहिण काजोल ही सामान आणण्यासाठी दुकानात जाते पण दुकानदार हा तिला उधारी देण्यास नकार देतो. तो कलाच्या वडिलांना वाटेल ते बोलतो. ते पाहून काजोलला राग अनावर होतो. ती दुकानदाराशी भांडते. तो तिला धक्का देतो तेवढ्यात सोहम तेथे येतो आणि त्या दुकानदाराला चांगलेच सुनावतो. त्याचे पूर्ण पैसे देऊन काजोलला घरी घेऊन जातो.
वाचा : सोनाक्षी सिन्हा करणार बॉयफ्रेंड झहीर इक्बालशी लग्न? अभिनेत्रीने स्वत: दिली प्रतिक्रिया
आई आणि वडिलांना मदत करण्यासाठी कला नोकरीच्या शोधात असते. पण चांदेकर नोकरी करु देणार नाही हे देखील तिला माहिती असते. शेवटी कला अद्वैतच्या कंपनीसाठी सोन्याच्या दागिन्यांचे डिझाइन बनवण्याचा निर्णय घेते. तिने अद्वैतच्या नकळत एकदा त्याला डिल मिळवून दिलेली असते. त्यामुळे कला अद्वैतच्या ऑफिसमधील स्टाफला फोन करुन मी तुमच्यासाठी डिझाइन बनवेल आणि मला त्या बदल्यात पैसे द्या असे सांगते. तसेच याबाबत कोणालाही कळता कामा नये असे देखील म्हणते. रात्री अद्वैत झोपलेला असताना कला डिझाइन काढायला बसते. तेवढ्यात तो जागा होतो. कला कुठे गेली हे शोधतो. त्यानंतर दोघांमध्ये तूतू मैमै सुरु होते.
वाचा : 'हमे हिंदू राष्ट्र चाहिए प्रधानमंत्रीजी,' केतकी चितळेची थेट पंतप्रधान नरेंद्र मोदींकडे मागणी
कला आणि नैनासाठी आईने फराळ बनवलेला असतो. तो देण्यासाठी काजोल घरी येते आणि सोफ्यात बसलेली असते. तिला तसे बसलेले पाहून सोहमचे वडील चिडतात. तेवढ्यात राहुलची आई येते आणि ती देखील तिच्यावर चिडते. तिला घरातून बाहेर काढतात. तेवढ्यात कला तेथे येते आणि सर्व थांबवते. आता कलाचे सगळे ऐकणार का? आबा यावर काय प्रतिक्रिया देणार? असे प्रश्न प्रेक्षकांना पडले आहेत. मालिकेच्या आगामी भागात या सगळ्या प्रश्नांची उत्तरे मिळणार आहेत.
वाचा : 'मुंज्या' चित्रपटाचा बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ! चार दिवसात कमावले कोट्यवधी रुपये
संबंधित बातम्या