टी-२० वर्ल्डकप २०२४
टी-२० विश्वचषक २०२४ स्पर्धा १ जून ते २९ जून दरम्यान होणार आहे. भारतीय वेळेनुसार, २ जून रोजी सकाळी ६ वाजता पहिला सामना होईल. यावेळी विश्वचषक स्पर्धा अमेरिका आणि वेस्ट इंडिजनं संयुक्तपणे आयोजित केली आहे. बहुतेक सामने आपल्या वेळेनुसार सकाळी ६ वाजता किंवा ८ वाजता सुरू होतील.टी-२० विश्वचषक २०२४ मध्ये एकूण २० संघ सहभागी होत आहेत. सर्व २० संघांची चार गटांत विभागणी करण्यात आली आहे. प्रत्येक गटात पाच संघ आहेत.
विश्वचषक स्पर्धेतील गट
अ गट - भारत, पाकिस्तान, कॅनडा, आयर्लंड, अमेरिका
ब गट - इंग्लंड, ऑस्ट्रेलिया, नामिबिया, स्कॉटलंड, ओमान
क गट - न्यूझीलंड, वेस्ट इंडिज, अफगाणिस्तान, पापुआ न्यू गिनी, युगांडा
ड गट - दक्षिण आफ्रिका, श्रीलंका, बांगलादेश, नेदरलँड, नेपाळ
प्रत्येक गटातील प्रत्येक संघ इतर सर्व संघांविरुद्ध एक सामना खेळेल. सर्व सामने जिंकणाऱ्या संघाला जास्तीत जास्त ८ गुण दिले जातील. प्रत्येक गटातून दोन संघ सुपर ८ फेरीत जातील. सुपर ८ फेरीत दोन गटांमध्ये स्पर्धा होईल. प्रत्येक गटातून दोन संघ उपांत्य फेरीत जातील.
टी-२० विश्वचषक २०२४ चे ठिकाण
टी-२० विश्वचषक २०२४ वेस्ट इंडिज आणि युनायटेड स्टेट्समधील ९ स्टेडियममध्ये होणार आहे. त्यापैकी सहा स्टेडियम वेस्ट इंडिजमध्ये तर तीन अमेरिकेत आहेत. वेस्ट इंडिजमध्ये सर व्हिव्हियन रिचर्ड्स स्टेडियम, केन्सिंग्टन ओव्हल, प्रॉव्हिडन्स स्टेडियम, डॅरेन सॅमी क्रिकेट ग्राउंड, अर्नोस व्हॅले स्टेडियम आणि ब्रायन लारा क्रिकेट अकादमी स्टेडियमवर सामने होणार आहेत.
अमेरिकेत सेंट्रल ब्रॉवर्ड पार्क, नासाऊ काउंटी इंटरनॅशनल क्रिकेट स्टेडियम आणि ग्रँड प्रेरी स्टेडियम येथे सामने होतील. बार्बाडोसमधील केन्सिंग्टन ओव्हल स्टेडियमवर २९ जून रोजी अंतिम सामना होणार आहे.
टी-२० वर्ल्डकपमधील टीम इंडियाचे वेळापत्रक पुढीलप्रमाणे आहे. भारतीय संघ विश्वचषक स्पर्धेत अ गटात आहे.टीम इंडिया खेळणार असलेल्या सामन्यांचा तपशील आणि भारतीय वेळेनुसार सामन्यांच्या वेळा येथे पाहता येतील.
भारत विरुद्ध आयर्लंड - ५ जून रात्री ८ वाजता (न्यूयॉर्क)
भारत विरुद्ध पाकिस्तान - ९ जून रात्री ८ वाजता (न्यूयॉर्क)
भारत विरुद्ध अमेरिका - १२ जून रात्री ८ वाजता (न्यूयॉर्क)
भारत विरुद्ध कॅनडा - १५ जून रात्री ८ वाजता (लँडरहिल)
T20 वर्ल्ड कप न्यूज
गुणतालिका
Pos | Team | Matches | Won | Lost | Tied | NR | Points | NRR | Series Form | |
---|---|---|---|---|---|---|---|---|---|---|
1 | India | 3 | 3 | 0 | 0 | 0 | 6 | +2.017 | WWW | |
2 | Afghanistan | 3 | 2 | 1 | 0 | 0 | 4 | -0.305 | WWL | |
3 | Australia | 3 | 1 | 2 | 0 | 0 | 2 | -0.331 | LLW |
टी-२० वर्ल्डकप २०२४ लीडरबोर्ड
- खेळाडू
- संघ
Most Runs
Most Wickets
T20 वर्ल्ड कप FAQs
A: टी-२० विश्वचषक २०२४ मध्ये एकूण २० संघ भाग घेत आहेत.
A: टी-२० विश्वचषक २०२४ चा भाग म्हणून एकूण ५५ सामने खेळवले जातील.
A: टी-२० विश्वचषक २०२४ चा अंतिम सामना २९ जून रोजी होणार आहे.
A: टीम इंडिया ५ जून रोजी आयर्लंड विरुद्ध टी-२० विश्वचषक २०२४ मध्ये पहिला सामना खेळेल.
A: टी-२० विश्वचषक २०२४ मधील भारत आणि पाकिस्तान यांच्यातील सामना ९ जून रोजी खेळवला जाईल.