मराठी बातम्या  /  महाराष्ट्र  /  mumbai ice cream news : अचानक भयानक! ऑनलाइन मागवलेल्या आइसक्रीम कोनमध्ये आढळलं माणसाचं तुटलेलं बोट

mumbai ice cream news : अचानक भयानक! ऑनलाइन मागवलेल्या आइसक्रीम कोनमध्ये आढळलं माणसाचं तुटलेलं बोट

Jun 13, 2024 04:00 PM IST

Mumbai Ice Cream Case: मुंबईतील मलाड इथं एका डॉक्टर तरुणाला ऑनलाइन मागवलेल्या आइसक्रीमच्या कोनमध्ये माणसाच्या बोटाचा तुकडा सापडला आहे. त्यामुळं खळबळ उडाली आहे.

अचानक भयानक! ऑनलाइन मागवलेल्या आइसक्रीम कोनमध्ये आढळलं माणसाचं तुटलेलं बोट
अचानक भयानक! ऑनलाइन मागवलेल्या आइसक्रीम कोनमध्ये आढळलं माणसाचं तुटलेलं बोट

Human Finger Found in Ice-cream : उन्हाळा म्हटले की अनेक जण आइसक्रीम खाण्याला पसंती देतात. काही जण थेट आइसक्रीम पार्लरमध्ये जाऊन आइसक्रीम मागवतात तर काही जण थेट घरी ऑनलाइन ऑर्डर देऊन आइसक्रीमवर ताव मारतात. पण, मुंबईत अशी घटना घडली आहे की तुम्ही ती घटना ऐकून हादरून जाल. 

ट्रेंडिंग न्यूज

मुंबईत मलाड येथे राहणाऱ्या एका डॉक्टर तरुणानं ऑनलाइन आइसक्रीम मागवले. या आइसक्रीमच्या कोनमध्ये माणसाची बोटे आढळली आहेत. हे पाहून त्या डॉक्टरला धक्काच बसला. या प्रकरणी पोलिस ठाण्यात तक्रार दिली असून पोलिसांनी यम्मो आईस्क्रीम कंपनीविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. तसेच हे आईस्क्रीम व मानवी बोट फॉरेसिक विभागाकडे तपासासाठी पाठवले आहे.

Sambhaji Nagar: पतीचे मैत्रिणीसोबत सुरू होते चाळे! पत्नीने पाहताच तरुणीला दिवसभर गेटला बांधून दिला चोप; पोलिसांनी सोडवले

ब्रेंडन सेराओ (वय २७) या तरुणाचं नाव आहे. तो एमबीबीएस डॉक्टर असून मुंबईतील मलाड इथं राहतो. बुधवारी त्यानं ऑनलाइन डिलिव्हरी ॲपद्वारे यम्मो कंपनीचा (EMOI) आईस्क्रीम कोन ऑनलाईन ऑर्डर केला होता. हा कोन त्याच्या घरी आला. आइसक्रीम आल्यानंतर त्यानं सहज ते खायला सुरुवात केली. अर्ध आइसक्रीम खाल्ल्यानंतर त्याच्या दातांना काहीतरी कडक लागलं. एखादा शेंगदाणा किंवा चॉकलेटचा तुकडा असावा असं त्याला वाटलं. मात्र त्यानं ते थेट न खाता ते पाहिलं.

NEET मध्ये ग्रेस गुण असलेल्यांचे स्कोअरकार्ड होणार रद्द; २३ जून रोजी १,५६३ विद्यार्थ्यांना द्यावी लागणार पुन्हा परीक्षा

बारकाईनं पाहिल्यावर त्याला नखासारखं काहीतरी दिसलं. डॉक्टर असल्यामुळं त्याला लगेचच हे माणसाचं तुटलेलं बोट असल्याचं लक्षात आलं. हे पाहून तो थरारला. त्यानंतर त्यानं प्रसंगावधान राखून हे बोट तसंच बर्फात ठेवलं. हा निष्काळजीपणाचा प्रकार आहे की आणखी काही हे कळावं म्हणून त्यानं हा तुकडा फेकून न देता ठेवला. त्यानंतर मालाड पोलीस ठाण्यात तक्रार केली.

पोलिसांनी सुरू केला तपास

पोलिसांना दिलेल्या माहीतीनुसार, डॉक्टर तरुणानं ऑनलाइन मागवलेल्या आईस्क्रीम कोनमध्ये २ सेमी लांब असलेले मानवी बोट आढळले. सेराओ यानं पोलिसांकडं रीतसर तक्रार नोंदवली आहे. पोलिसांनी या प्रकरणी यम्मो आईस्क्रीम कंपनीविरोधात मलाड गुन्हा दाखल केला आहे. आईस्कीम कोनमध्ये आढळलेले मानवी बोट मालाड पोलिसांनी फॉरेन्सिक विभागाकडे पाठवले आहे.

WhatsApp channel
विभाग