मराठी बातम्या  /  क्रिकेट  /  टी-२० वर्ल्डकप २०२४  /  टी-२० वर्ल्डकप २०२४ गुणतालिका

ಟಿ20 ವಿಶ್ವಕಪ್ ಪಾಯಿಂಟ್ಸ್‌ ಟೇಬಲ್ 2024

टी-२० वर्ल्डकप २०२४ गुणतालिका

क्रिकेट विश्वातील सर्वात लोकप्रिय प्रकार मानला जाणाऱ्या टी-२० क्रिकेटचा विश्वचषक १ जूनपासून अमेरिका व वेस्ट इंडिजच्या भूमीवर रंगणार आहे. २९ जूनपर्यंत ही स्पर्धा चालेल. यात एकूण ५५ सामने खेळवले जातील. ओमान, पापुआ न्यू गिनी, यूएसए, कॅनडा, युगांडा, नामिबिया, आयर्लंड आणि नेपाळ हे संघ विश्वचषकात खेळत आहेत.

वेस्ट इंडिज आणि यूएसए हे यजमान असून हे दोन्ही संघ स्पर्धेसाठी थेट पात्र ठरले आहेत. जागतिक क्रमवारीत पहिल्या आठमध्ये असलेले भारत, इंग्लंड, पाकिस्तान, न्यूझीलंड, ऑस्ट्रेलिया, दक्षिण आफ्रिका, नेदरलँड्स आणि श्रीलंका हे संघही स्पर्धेसाठी थेट पात्र ठरले आहेत. त्यानंतर अफगाणिस्तान आणि बांगलादेशनेही स्पर्धेत प्रवेश केला आहे. युरोपमधून आयर्लंड आणि स्कॉटलंड, पूर्व आशिया-पॅसिफिकमधून पापुआ न्यू गिनी, अमेरिकेच्या क्वालिफायरमधून कॅनडा, आशियातील नेपाळ आणि ओमान, आफ्रिकेतून नामिबिया आणि युगांडा पात्र ठरले आहेत.

टी-२० विश्वचषक २०२४ मध्ये एकूण २० संघ सहभागी होत आहेत. हे चार गटांमध्ये विभागले गेले आहेत. प्रत्येक गटात पाच संघ आहेत.

अ गट - भारत, पाकिस्तान, कॅनडा, आयर्लंड, अमेरिका

ब गट - इंग्लंड, ऑस्ट्रेलिया, नामिबिया, स्कॉटलंड, ओमान

क गट - न्यूझीलंड, वेस्ट इंडिज, अफगाणिस्तान, पापुआ न्यू गिनी, युगांडा

ड गट - दक्षिण आफ्रिका, श्रीलंका, बांगलादेश, नेदरलँड, नेपाळ

पहिल्या फेरीतील टीम इंडियाच्या सामन्यांचं वेळापत्रक पुढीलप्रमाणे आहे.

भारत विरुद्ध आयर्लंड - ५ जून रात्री ८ वाजता (न्यूयॉर्क)

भारत विरुद्ध पाकिस्तान - ९ जून रात्री ८ वाजता (न्यूयॉर्क)

भारत विरुद्ध अमेरिका - १२ जून रात्री ८ वाजता (न्यूयॉर्क)

भारत विरुद्ध कॅनडा - १५ जून रात्री ८ वाजता (लँडरहिल)

टी-२० विश्वचषक २०२४ स्पर्धेतील गुणतालिकेचा विचार केल्यास यावेळी टी-२० वर्ल्ड कप लीग स्टेज, सुपर ८, सेमीफायनल आणि फायनल फॉरमॅटमध्ये होणार आहे. लीग टप्प्यात, प्रत्येक गटातील टॉपचे २ संघ सुपर ८ साठी पात्र ठरतात. तिथे ८ संघ दोन गटात विभागले जाणार असून प्रत्येक गटातून दोन संघ उपांत्य फेरीत जाणार आहेत.

साखळी फेरीत विजयासाठी दोन गुण, टाय किंवा रद्द झाल्यास एक गुण आणि पराभवासाठी शून्य गुण दिले जातील. पुढील फेरीत जाण्यासाठी नेट रन रेटही महत्त्वाचा असेल. प्रथम सुपर ८ मध्ये चार गट आणि दोन गट आहेत. गुणतालिका सामन्यानुसार बदलत जाईल. गुणतालिकेतील बदल आणि इतर सर्व माहिती हिंदुस्तान टाइम्स मराठीवर पाहता येईल.

T20 World Cup Points Table 2024 - Super Eight GROUP 1

PosTeams
1
Indiaindindia
2
Indiaausaustralia
3
Indiaafgafghanistan
4
Indiabanbangladesh
MatchesWonLostTiedNRPointsNRRSeries Form
220004+2.425
WW
211002+0.223
LW
211002-0.650
WL
202000-2.489
LL

Pos: Position, Pld: Played, Pts: Points, NRR: Net Run Rate

T20 World Cup Points Table 2024 - Super Eight GROUP 2

PosTeams
1
Indiaengengland
2
Indiasasouth africa
3
Indiawiwest indies
4
Indiausausa
MatchesWonLostTiedNRPointsNRRSeries Form
321004+1.992
WLW
220004+0.625
WW
211002+1.814
WL
303000-3.906
LLL

Pos: Position, Pld: Played, Pts: Points, NRR: Net Run Rate

T20 World Cup Points Table 2024 - Group A

PosTeams
1
Indiaindindia
2
Indiausausa
3
Indiapakpakistan
4
Indiacancanada
5
Indiaireireland
MatchesWonLostTiedNRPointsNRRSeries Form
430017+1.137
AWWW
421015+0.127
ALWW
422004+0.294
WWLL
412013-0.493
ALWL
403011-1.293
LALL

Pos: Position, Pld: Played, Pts: Points, NRR: Net Run Rate

T20 World Cup Points Table 2024 - Group B

PosTeams
1
Indiaausaustralia
2
Indiaengengland
3
Indiascoscotland
4
Indianamnamibia
5
Indiaomaoman
MatchesWonLostTiedNRPointsNRRSeries Form
440008+2.791
WWWW
421015+3.611
WWLA
421015+1.255
LWWA
413002-2.585
LLLW
404000-3.062
LLLL

Pos: Position, Pld: Played, Pts: Points, NRR: Net Run Rate

T20 World Cup Points Table 2024 - Group C

PosTeams
1
Indiawiwest indies
2
Indiaafgafghanistan
3
Indianznew zealand
4
Indiaugauganda
5
Indiapngpapua new guinea
MatchesWonLostTiedNRPointsNRRSeries Form
440008+3.257
WWWW
431006+1.835
LWWW
422004+0.415
WWLL
413002-4.510
LLWL
404000-1.268
LLLL

Pos: Position, Pld: Played, Pts: Points, NRR: Net Run Rate

T20 World Cup Points Table 2024 - Group D

PosTeams
1
Indiasasouth africa
2
Indiabanbangladesh
3
Indiaslsri lanka
4
Indianednetherlands
5
Indianepnepal
MatchesWonLostTiedNRPointsNRRSeries Form
440008+0.470
WWWW
431006+0.616
WWLW
412013+0.863
WALL
413002-1.358
LLLW
403011-0.542
LLAL

Pos: Position, Pld: Played, Pts: Points, NRR: Net Run Rate

T20 वर्ल्ड कप FAQs

Q: टी-२० विश्वचषक २०२४ पॉइंट टेबल कसे कार्य करते?

A: टी-२० विश्वचषक २०२४ गुणतालिकेत प्रत्येक गटातील अव्वल दोन संघ पुढील फेरीसाठी पात्र ठरतील.

Q: टी-२० विश्वचषक २०२४ मध्ये संघांना गुणांचे वाटप कसे केले जाईल?

A: गट टप्प्यात, प्रत्येक संघाला विजयासाठी दोन गुण, सामना बरोबरीत किंवा रद्द झाल्यास एक गुण आणि पराभवासाठी शून्य गुण दिले जातात.

Q: टी-२० विश्वचषक २०२४ गुणतालिकेत दोन संघांना समान गुण मिळाल्यास काय केले जाईल?

A: दोन्ही संघांचे गुण समान असल्यास..चांगला निव्वळ धावगती असलेला संघ पुढे जाईल.

Q: कोणत्या संघांनी सर्वाधिक वेळा टी-२० विश्वचषक जिंकला आहे?

A: वेस्ट इंडिज आणि इंग्लंड संघांनी दोनदा टी-२० विश्वचषक जिंकला आहे.