USA vs IND : मियाँ मॅजिक… सीमारेषेवर मोहम्मद सिराजचा थरारक झेल, फिल्डिंग कोचसह सगळेच थक्क झाले, एकदा पाहाच!
मराठी बातम्या  /  क्रिकेट  /  USA vs IND : मियाँ मॅजिक… सीमारेषेवर मोहम्मद सिराजचा थरारक झेल, फिल्डिंग कोचसह सगळेच थक्क झाले, एकदा पाहाच!

USA vs IND : मियाँ मॅजिक… सीमारेषेवर मोहम्मद सिराजचा थरारक झेल, फिल्डिंग कोचसह सगळेच थक्क झाले, एकदा पाहाच!

Published Jun 12, 2024 10:12 PM IST

Mohammed Siraj Tooks Catch Of Nitish Kumar : भारताचा वेगवान गोलंदाज मोहम्मद सिराजचे जादुई क्षेत्ररक्षण पाहायला मिळाले. मोहम्मद सिराजने अप्रतिम क्षेत्ररक्षण करत अमेरिकेचा फलंदाज नितीश कुमारचा अप्रतिम झेल घेतला. त्याचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

USA vs IND : मियां मॅजिक… सीमारेषेवर मोहम्मद सिराजचा थरारक झेल, फिल्डिंग कोचसह सगळेच थक्क झाले, एकदा पाहाच!
USA vs IND : मियां मॅजिक… सीमारेषेवर मोहम्मद सिराजचा थरारक झेल, फिल्डिंग कोचसह सगळेच थक्क झाले, एकदा पाहाच!

टी-20 विश्वचषक २०२४ मध्ये आज (१२ जून) अ गटातील अमेरिका आणि भारत आमनेसामने आहेत. न्यूयॉर्कच्या नासाऊ काउंटी इंटरनॅशनल स्टेडियमवर भारताचा कर्णधार रोहित शर्माने टॉस जिंकून प्रथम गोलंदाजीचा निर्णय घेतला. यानंतर अमेरिकेने प्रथम फलंदाजी करताना २० षटकात ८ बाद केवळ ११० धावा केल्या.

भारताला विजयासाठी १११ धावा करायच्या आहेत. पण या दरम्यान, या सामन्यात भारताचा वेगवान गोलंदाज मोहम्मद सिराजचे जादुई क्षेत्ररक्षण पाहायला मिळाले. मोहम्मद सिराजने अप्रतिम क्षेत्ररक्षण करत अमेरिकेचा फलंदाज नितीश कुमारचा अप्रतिम झेल घेतला. त्याचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. हा झेल पाहून चाहते सिराजचे खूप कौतुक करत आहेत.

खरं तर, अमेरिकेचा फलंदाज नितीश कुमारने अर्शदीप सिंगच्या चेंडूवर मिड-विकेटवर शानदार पुल शॉट मारला. चेंडू सीमारेषेबाहेर षटकारासाठी जात होता, पण तिथे उपस्थित असलेल्या सिराजने हवेत झेप घेत अविश्वसनीय झेल घेतला. सिराजने इतका चांगला झेल घेतला यावर कोणाचाही विश्वास बसत नव्हता. खुद्द फील्डिंग कोच टी. दिलीपही आश्चर्यचकित दिसले.

या विकेटसह अमेरिकेला ८१ धावांवर ५वा आणि सर्वात मोठा धक्का बसला. कारण हा झेल नितीश कुमारचा होता आणि नितीश वेगाने धावा करत होता.

वास्तविक, १५व्या षटकाच्या चौथ्या चेंडूवर अर्शदीप सिंगने शॉर्ट बॉल टाकला. चेंडू आपल्या रडारवर येत असल्याचे पाहून उजव्या हाताचा फलंदाज नितीश कुमारने मिड-विकेटच्या दिशेने षटकारासाठी हवेत मारला. हा मोठा षटकार असेल असे टीव्हीवर दिसत होते, पण मोहम्मद सिराजने या झेलचा अंदाज लावला. त्याने सीमारेषेच्या दोरीच्या अगदी समोर योग्य वेळी उडी मारली आणि मागे पडताना एक जबरदस्त झेल पूर्ण केला. नितीश कुमार २३ चेंडूत २७ धावा करत अमेरिकेसाठी सर्वात यशस्वी फलंदाज ठरला.

अर्शदीप सिंगने ४ बळी घेतले

अर्शदीप सिंगने ४ षटकांच्या स्पेलमध्ये ९ धावांत ४ बळी घेत धुमाकूळ घातला. अर्शदीप सिंगने डावाच्या पहिल्या षटकातच अमेरिकेला दुहेरी झटका दिला. यानंतर त्याने नितीश कुमार आणि हरमीत सिंगची विकेट घेतली.

Whats_app_banner

संबंधित बातम्या