Fathers Day 2024: बाबा म्हणून मी खूप संयम शिकलोय; अनुभव सांगताना संकर्षण कऱ्हाडे आनंदून गेला!
मराठी बातम्या  /  फोटोगॅलरी  /  Fathers Day 2024: बाबा म्हणून मी खूप संयम शिकलोय; अनुभव सांगताना संकर्षण कऱ्हाडे आनंदून गेला!

Fathers Day 2024: बाबा म्हणून मी खूप संयम शिकलोय; अनुभव सांगताना संकर्षण कऱ्हाडे आनंदून गेला!

Fathers Day 2024: बाबा म्हणून मी खूप संयम शिकलोय; अनुभव सांगताना संकर्षण कऱ्हाडे आनंदून गेला!

Published Jun 13, 2024 12:40 PM IST
  • twitter
  • twitter
Fathers Day 2024: खाजगी आयुष्यात संकर्षण दोन चिमुकल्यांचा बाबा आहे आणि त्याने ‘फादर्स डे’च्या निमित्ताने आपला बाबा म्हणून अनुभव व्यक्त केला.
संकर्षण लवकरच झी मराठीवर परीक्षक म्हणून दिसणार आहे. जिथे तो चिमुकल्या स्पर्धकांना मार्गदर्शन करताना दिसेल. आपल्या खाजगी आयुष्यात संकर्षण दोन चिमुकल्यांचा बाबा आहे आणि त्याने ‘फादर्स डे’च्या निमित्ताने आपला बाबा म्हणून अनुभव व्यक्त केला. मी माझ्या बाबांकडून काय शिकलो आणि त्यांचे कोणते गुण घेतले, तेही सांगितले आहेत.
twitterfacebook
share
(1 / 5)

संकर्षण म्हणाला, ‘मी दोन जुळ्या मुलांचा बाबा आहे. २७ जूनला त्यांना ३ वर्ष पूर्ण होतील. बाबा म्हणून मी खूप संयम शिकलो आहे आणि माझी नवीन मालिका ‘ड्रामा ज्युनिअर्स’मध्ये परीक्षकाच्या भूमिकेत या संयमाचा खूप उपयोग होणार आहे. आधी मी जितका अधीर होतो, तितका राहिलो नाही. कारण लहान मुलांना सांभाळणं, त्यांना वाढवणं अतिशय संयमाचं काम आहे.’
twitterfacebook
share
(2 / 5)

पुढे संकर्षण म्हणाला की, ‘ते कुठल्या क्षणी काय मागतील, कसे वागतील, कसे पाहतील आणि काय करतील याचा काहीच नेम नसतो. अशवेळी तुम्ही थकलेले असाल, तुम्ही काम करून घरी आलेले असाल, वेगळ्या विचारात असाल, तरी त्यांच्यावर तुम्हाला रागवून रिऍक्ट करण्याची परवानगीच नाही. त्यांना कळत नाही की, ते आता काय करतायतं. त्याच्यामुळे त्यांना सांभाळणं आणि हसतं ठेवणं भयंकर संयमाचं काम आहे.’
twitterfacebook
share
(3 / 5)

‘एक बाबा म्हणून माझा संयम प्रचंड वाढला आहे. मी माझा राग राखून ठेवतो आणि जीव उधळून प्रेम करतो. मला माझी लहान बाळं एक क्षण ही रडलेली आवडत नाहीत. मी माझ्या बायकोला शलाकाला तेच सांगतो, की ते रडत असताना त्यांना काय पाहिजे ते दे आणि जेव्हा त्यांचं रडणं थांबत त्यांना मी जवळ घेऊन समजावतो आणि त्यांना ते कळतं’, असं संकर्षण म्हणाला.
twitterfacebook
share
(4 / 5)

आपल्या वडिलांबद्दल सांगताना संकर्षण म्हणाला, ‘माझ्या बाबांबद्दल बोलायचं झालं, तर ते अत्यंत प्रामाणिक, दिलंय ते काम नियमाने, नित्याने आणि सचोटीने करणारा माणूस. हा बाबांचा गुण मला खूप आवडतो. त्यांच्यातली भावनिकता आणि खरेपणा खूप आवडतो. त्यांचा मुलगा म्हणून मी कायम माझ्या वागण्यात तो प्रामाणिकपण आणि ती भावनिकता आणायचा प्रयत्न करतो. बाबांनी संपूर्ण कुटुंबाला उत्तम आयुष्य कसं द्यायचं, हे काटाक्षने पाळलं आणि एक छान आयुष्य दिलं. त्याचचं मी तंतोतंत पालन करण्याचा प्रयत्न करत आहे.’
twitterfacebook
share
(5 / 5)

इतर गॅलरीज