T20 world cup India schedule : टी-२० विश्वचषक २०२४ मधील भारतीय संघाचं वेळापत्रक HT Marathi वर
मराठी बातम्या  /  क्रिकेट  /  टी-२० वर्ल्डकप २०२४  /  इंडिया टी-२० वर्ल्डकप २०२४ वेळापत्रक

टी-२० वर्ल्डकप भारतीय संघ वेळापत्रक

टी-२० विश्वचषक स्पर्धा एकूण २० देशांमध्ये होत असली तरी भारतासह जगभरातील क्रिकेटप्रेमींच्या नजरा काही ठराविक संघांवर असतील. भारतीय संघ हा त्यातील प्रमुख संघ असेल. टी-२० विश्वषकात दुसऱ्यांदा जिंकण्याचा भारताचा प्रयत्न असेल. त्यामुळं भारताचे सामने कधी होणार? कोणत्या मैदानावर होणार? कोणत्या संघाविरुद्ध होणार? भारत-पाकिस्तानचा सामना कोणत्या तारखेला होणार? याविषयी विशेष उत्सुकता असेल. पाहूया यासंबंधीची सर्व माहिती...

यावेळी वेस्ट इंडिज आणि अमेरिका हे दोन देश संयुक्तपणे टी-२० विश्वचषक २०२४ चं आयोजन करत आहेत. तथापि, टीम इंडिया आपले सर्व लीग सामने अमेरिकेत खेळणार आहे. भारत हा अ गटात आहे. भारतासोबतच पाकिस्तान, कॅनडा, यजमान अमेरिका आणि आयर्लंड संघ अ गटात आहेत. साखळी फेरीत भारतीय संघ एकूण चार सामने खेळणार आहे.

वास्तविक, ही स्पर्धा १ जूनपासून सुरू होणार आहे. भारतीय वेळेनुसार पहिला सामना २ जून रोजी सकाळी ६ वाजता होणार आहे. ही मेगा स्पर्धा २९ जूनपर्यंत सुरू राहणार आहे. टी-20 वर्ल्डकपमधील टीम इंडियाचे हे वेळापत्रक पुढीलप्रमाणे आहे.

भारत विरुद्ध आयर्लंड - ५ जून रात्री ८ वाजता (न्यूयॉर्क)

भारत विरुद्ध पाकिस्तान - ९ जून रात्री ८ वाजता (न्यूयॉर्क)

भारत विरुद्ध अमेरिका - १२ जून रात्री ८ वाजता (न्यूयॉर्क)

भारत विरुद्ध कॅनडा - १५ जून रात्री ८ वाजता (लँडरहिल)

सामन्यांचा तपशील आणि भारतीय वेळेनुसार सामन्यांच्या वेळा येथे पाहता येतील.

T20 विश्वचषक कुठे बघायचा?

यावेळी टी-२० विश्वचषक लाइव्ह स्टार स्पोर्ट्स नेटवर्कवर असेल. तुम्ही हे सामने टीव्हीवर स्टार स्पोर्ट्स चॅनलवर, डिस्ने प्लस हॉटस्टारवर डिजिटलवर पाहू शकता. हॉटस्टार मोबाईलवर तुम्ही सर्व सामने विनामूल्य पाहू शकता. जर तुम्हाला लॅपटॉप आणि टीव्हीवर पाहायचे असेल तर तुम्हाला हॉटस्टारचे सबस्क्रिप्शन घ्यावे लागेल. हा T20 विश्वचषक फॉर्मेट आहे

विश्वचषक स्पर्धेतील साखळी फेरी चार गटात होईल. या चार गटात प्रत्येकी पाच संघ असतील. ते खालीलप्रमाणे...

अ गट - भारत, पाकिस्तान, कॅनडा, आयर्लंड, अमेरिका

ब गट - इंग्लंड, ऑस्ट्रेलिया, नामिबिया, स्कॉटलंड, ओमान

क गट - न्यूझीलंड, वेस्ट इंडिज, अफगाणिस्तान, पापुआ न्यू गिनी, युगांडा

ड गट - दक्षिण आफ्रिका, श्रीलंका, बांगलादेश, नेदरलँड, नेपाळ

Teams
Venues

T20 वर्ल्ड कप FAQs

Q: भारताचा टी-२० विश्वचषक २०२४ चा पहिला सामना कुठे खेळवला जाईल?

A: टीम इंडियाचा टी-२० विश्वचषक २०२४ चा पहिला सामना ५ जून २०२४ रोजी आयर्लंड विरुद्ध नासाऊ काउंटी आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियम, न्यूयॉर्क येथे होईल.

Q: टी-२० विश्वचषक २०२४ सामन्यांच्या सुरुवातीच्या वेळा काय आहेत?

A: टी-२० विश्वचषक २०२४अमेरिका आणि वेस्ट इंडिजमध्ये होणार असल्याने, बहुतेक सामने सकाळी ६ किंवा ८ वाजता सुरू होत आहेत.

Q: टी-२० विश्वचषक २०२४ मध्ये भारत विरुद्ध पाकिस्तान सामना कधी आहे?

A: भारत विरुद्ध पाकिस्तान सामना ९ जून रोजी न्यूयॉर्कमध्ये होणार आहे.

Q: टी-२० विश्वचषक २०२४ मध्ये भारत कोणत्या गटात आहे?

A: टीम इंडिया पाकिस्तान, आयर्लंड, यूएसए आणि कॅनडासोबत ग्रुप-अ मध्ये आहे.