टी-२० वर्ल्डकप वेळापत्रक
यंदा टी-२० विश्वचषक २०२४ अमेरिका आणि वेस्ट इंडिजमध्ये १ जून ते २९ जून या कालावधीत होणार आहे. एकूण २० संघ या स्पर्धेत सहभागी होणार आहेत. टी-२० विश्वचषक २०२४ चं वेळापत्रक यावर्षी जानेवारीमध्ये जाहीर करण्यात आलं होतं. या स्पर्धेतील एकूण ५५ सामने अमेरिका आणि वेस्ट इंडिजमधील ९ स्टेडियममध्ये होणार आहेत. विश्वचषकाचा अंतिम सामना २९ जून रोजी बार्बाडोस इथं होणार आहे. भारताचा पहिला सामना ५ जून रोजी आयर्लंडविरुद्ध होणार आहे, तर ९ जून रोजी पाकिस्तानविरुद्ध खेळणार आहे. साखळी फेरीत भारत तीन सामने न्यूयॉर्कमध्ये आणि एक सामना लँडरहिलमध्ये खेळणार आहे.
टी-२० विश्वचषक २०२४ गट व स्वरूप
टी-२० विश्वचषक २०२४ मध्ये एकूण २० संघ सहभागी होत आहेत. ते चार गटांमध्ये विभागले गेले आहेत. प्रत्येक गटात पाच संघ आहेत.
अ गट - भारत, पाकिस्तान, कॅनडा, आयर्लंड, अमेरिका
ब गट - इंग्लंड, ऑस्ट्रेलिया, नामिबिया, स्कॉटलंड, ओमान
क गट - न्यूझीलंड, वेस्ट इंडिज, अफगाणिस्तान, पापुआ न्यू गिनी, युगांडा
ड गट - दक्षिण आफ्रिका, श्रीलंका, बांगलादेश, नेदरलँड, नेपाळ
प्रत्येक गटातील प्रत्येक संघ इतर सर्व संघांविरुद्ध एक सामना खेळेल. सर्व सामने जिंकणाऱ्या संघाला जास्तीत जास्त ८ गुण दिले जातील. प्रत्येक गटातून दोन संघ सुपर ८ फेरीत जातील. सुपर ८ फेरीत दोन गटांमध्ये स्पर्धा होणार आहे. प्रत्येक गटातून दोन संघ उपांत्य फेरीत जातील.
वेस्ट इंडिज आणि यूएसए हे यजमान आहेत आणि ते दोघेही थेट पात्र ठरले. भारत, इंग्लंड, पाकिस्तान, न्यूझीलंड, ऑस्ट्रेलिया, दक्षिण आफ्रिका, नेदरलँड्स आणि श्रीलंका, जे पहिल्या 8 रँकमध्ये आहेत त्यांनीही थेट पात्रता मिळवली आहे. अफगाणिस्तान आणि बांगलादेशनेही स्पर्धेत स्थान मिळवलं आहे. युरोपमधून आयर्लंड आणि स्कॉटलंड, पूर्व आशिया-पॅसिफिकमधून पापुआ न्यू गिनी, अमेरिकेच्या क्वालिफायरमधून कॅनडा, आशियातील नेपाळ आणि ओमान, आफ्रिकेतून नामिबिया आणि युगांडा पात्र ठरले आहेत.
टी-२० विश्वचषक २०२४ चे ठिकाण
वेस्ट इंडिजमध्ये सर व्हिव्हियन रिचर्ड्स स्टेडियम, केन्सिंग्टन ओव्हल, प्रॉव्हिडन्स स्टेडियम, डॅरेन सॅमी क्रिकेट ग्राउंड, अर्नोस व्हॅले स्टेडियम आणि ब्रायन लारा क्रिकेट अकादमी स्टेडियमवर सामने होणार आहेत.
अमेरिकेत सेंट्रल ब्रॉवर्ड पार्क, नासाऊ काउंटी इंटरनॅशनल क्रिकेट स्टेडियम आणि ग्रँड प्रेरी स्टेडियम येथे सामने होतील. बार्बाडोसमधील केन्सिंग्टन ओव्हल स्टेडियमवर २९ जून रोजी अंतिम सामना होणार आहे.
आयसीसीनं माजी भारतीय क्रिकेटपटू युवराज सिंग, वेस्ट इंडिजचा माजी क्रिकेटपटू ख्रिस गेल आणि ऑलिम्पिक चॅम्पियन उसेन बोल्ट यांची टी-२० विश्वचषक २०२४ साठी ब्रँड ॲम्बेसेडर म्हणून नियुक्ती केली आहे.
पहिल्या फेरीतील टीम इंडियाच्या सामन्यांचं वेळापत्रक पुढीलप्रमाणे आहे.
भारत विरुद्ध आयर्लंड - ५ जून रात्री ८ वाजता (न्यूयॉर्क)
भारत विरुद्ध पाकिस्तान - ९ जून रात्री ८ वाजता (न्यूयॉर्क)
भारत विरुद्ध अमेरिका - १२ जून रात्री ८ वाजता (न्यूयॉर्क)
भारत विरुद्ध कॅनडा - १५ जून रात्री ८ वाजता (लँडरहिल)
T20 वर्ल्ड कप FAQs
A: १ ते २९ जून दरम्यान अमेरिका आणि वेस्ट इंडीजमध्ये विश्वचषक होणार आहे.
A: T20 विश्वचषक संघ चार गटात विभागले गेले आहेत. प्रत्येक गटातील अव्वल दोन संघ सुपर ८ टप्प्यात पोहोचतात. ते दोन गटात विभागलेले आहेत. दोन्ही गटातील अव्वल २ संघ उपांत्य फेरीत जातील.
A: साखळी टप्प्यातील प्रत्येकी चार गटांतील अव्वल दोन संघ सुपर ८ टप्प्यात जातील. ते दोन गटात विभागलेले आहेत. दोन्ही गटातील अव्वल २ संघ उपांत्य फेरीत जातील.
A: टी-२० विश्वचषक २०२४ मध्ये ५५ सामने खेळले जाणार आहेत.
A: टी-२० विश्वचषक २०२४ चे वेळापत्रक ICC वेबसाइटवर उपलब्ध आहे. तुम्ही ही माहिती हिंदुस्तान टाइम्स तेलुगु वेबसाइटवर टी-२० वर्ल्ड कप स्पेशल पेजवर देखील पाहू शकता.