आजीचा प्लॅन सफल होणार? एजे लीलाला घरी घेऊन जाणार? ‘नवरी मिळे हिटरलला’चं कथानक रंजक वळणावर
मराठी बातम्या  /  मनोरंजन  /  आजीचा प्लॅन सफल होणार? एजे लीलाला घरी घेऊन जाणार? ‘नवरी मिळे हिटरलला’चं कथानक रंजक वळणावर

आजीचा प्लॅन सफल होणार? एजे लीलाला घरी घेऊन जाणार? ‘नवरी मिळे हिटरलला’चं कथानक रंजक वळणावर

Jun 13, 2024 03:38 PM IST

लग्नात श्वेताच्याऐवजी लीला तिथे येऊन उभी राहिल्याने आता अभिराम आणि लीला यांचम लग्न झालं आहे. मात्र, लीलाने आपली फसवणूक केली, असं म्हणत अभिराम तिला बायको म्हणून स्वीकारण्यास नकार दिला आहे.

आजीचा प्लॅन सफल होणार? एजे लीलाला घरी घेऊन जाणार?
आजीचा प्लॅन सफल होणार? एजे लीलाला घरी घेऊन जाणार?

नवरी मिळे हिटलरला’ या मालिकेत सध्या जबरदस्त ट्विस्ट पाहायला मिळत आहे. लग्नात श्वेताच्याऐवजी लीला तिथे येऊन उभी राहिल्याने आता अभिराम आणि लीला यांचम लग्न झालं आहे. मात्र, लीलाने आपली फसवणूक केली, असं म्हणत अभिराम तिला बायको म्हणून स्वीकारण्यास नकार दिला आहे. किशोर, विक्रांत आणि साळुंके यांनी रचलेल्या खेळात लीला अडकल्याने तिला अभिरामशी बळजबरीने लग्न करावे लागले. आपल्या बहिणीचा म्हणजे रेवतीचा जीव धोक्यात असल्याने लीलाने अभिरामशी लग्न मान्य करत, ती बोहल्यावर चढली. मात्र, लग्न लागल्यानंतर तिला अभिरामने बायको म्हणून स्वीकारण्यास नकार दिला.

दुसरीकडे रेवतीने देखील आपण एका खोलीत झोपलो होतो, असं म्हणून लीलाचीच बाजू खोटी पाडली. त्यामुळे आता लीलावर कुणीही विश्वास ठेवायला तयार नाही. लीला नव्या नवरीप्रमाणे माप ओलांडून जहागीरदारांच्या घरी गेली खरी मात्र, घरात गेल्या पावलांनीच ती पुन्हा माघारी माहेरी परतली. अभिरामच्या सुनांमुळे दुखावली गेलेली लीला आता पुन्हा आपल्या माहेरी परतली आहे. मात्र, अभिराम आई अर्थात सरोजिनी आजीला ही गोष्ट अजिबात मान्य नाही. आजीने लीलाला मनापासून सून म्हणून स्वीकारलं आहे. आता लीला आणि अभिरामला एकत्र करण्यासाठी आजी एक नवा डाव खेळणार आहे.

साक्षीने गेमच केला! पत्रकार परिषद घेत चैतन्य आणि अर्जुनवर लावले आरोप! ‘ठरलं तर मग’मध्ये ट्वीस्ट

आजीने लीलासाठी सोडलं घर!

घरात कोणालाही काहीही न सांगता सरोजनी आजी लीलाच्या घरी निघून जाणार आहे. जेवणाच्या टेबलवर आई दिसत नसल्याने अभिराम सगळ्यांकडे आईची चौकशी करणार आहे. त्यावेळी अभिरामच्या सुना घरात आजीला शोधायला सुरुवात करणार आहे. त्यावेळी वॉचमेन आजी संध्याकाळी घराबाहेर निघून गेल्या आहेत, असं सांगणार आहे. दुसरीकडे, लीलाच्या घरी असलेली आजी कोणाचाही फोनही उचलत नाही. मात्र, लीलाने विनंती केल्यानंतर आजी अभिरामचा फोन उचलून त्याच्याशी बोलते. ‘ज्याप्रमाणे तुला तुझ्या सुना महत्वाच्या आहेत, त्याचप्रमाणे मला माझी सून महत्त्वाची आहे. त्यामुळे मी माझ्या सुनेच्या घरी आलेय. जर तुला मी त्या घरात हवी असेन, तर माझ्या सुनेला देखील मानानं त्या घरात स्थान मिळालं पाहिजे’, अशी अट आजी अभिरामला घालणार आहे.

अभिराम करणार लीलाचा स्वीकार?

मात्र, अभिराम देखील हट्टाला पेटून मी आईला आणायला जाणार नाही, असा निर्णय आधी घेतो. परंतु, आई शिवाय करमत नसल्याने तो आईला आणण्यासाठी लीलाच्या घरी पोहोचणार आहे. यावेळी देखील आजी सगळ्यांसमोर अभिरामला लीलाला मानाने घरी घेऊन जाण्याचं वचन मागणार आहे. तर, अभिराम लीलाला म्हणणार आहे की, ‘तुझ्यासारख्या फसव्या मुलीला माझ्या घरात जागा नाही. मात्र माझ्या आईच्या हट्टामुळे मला तुला घरी न्यावं लागणार आहे.’ आता अभिरामने लीलाला घरी नेण्याचं मान्य केल्यानंतर त्यांच्या लग्नाच्या पुढच्या विधी पार पडणार की, नाही? अभिरामच्या घरात लीलाला घेतलं जाईल की नाही? हे मालिकेच्या येत्या भागात पाहायला मिळणार आहे.

Whats_app_banner