टी-20 वर्ल्डकप २०२४ चा २५ वा सामना भारत आणि अमेरिका यांच्यात खेळला जात आहे. न्यूयॉर्कच्या नासाऊ काउंटी इंटरनॅशनल स्टेडियमवर भारताचा कर्णधार रोहित शर्माने टॉस जिंकून प्रथम गोलंदाजीचा निर्णय घेतला आहे. अमेरिका प्रथम फलंदाजी करेल.
भारताच्या प्लेइंग इलेव्हनमध्ये कोणताच बदल झालेला नाही. गेल्या दोन सामन्यांमध्ये खेळणाऱ्या संघासोबतच पुढे जाण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. तर अमेरिकेचा नियमित कर्णधार मोनांक पटेल या सामन्यात खेळत नाही, त्याच्या जागी आरोन जोन्स संघाची कमान सांभाळत आहे.
अमेरिका- स्टीव्हन टेलर, शायन जहांगीर, अँड्रिस गौस (विकेटकीपर), आरोन जोन्स (कर्णधार), नितीश कुमार, कोरी अँडरसन, हरमीत सिंग, शॅडली व्हॅन शाल्कविक, जसदीप सिंग, सौरभ नेत्रावलकर, अली खान
भारत- रोहित शर्मा (कर्णधार), विराट कोहली, ऋषभ पंत (विकेटकीप), सूर्यकुमार यादव, शिवम दुबे, हार्दिक पंड्या, रवींद्र जडेजा, अक्षर पटेल, जसप्रीत बुमराह, अर्शदीप सिंग, मोहम्मद सिराज
भारत आणि सह-यजमान यूएसए हे दोन्ही संघ या स्पर्धेत आतापर्यंत अपराजित आहेत आणि जे दोन संघ हा सामना जिंकतील ते सुपर ८ साठी पात्र ठरतील.
विराटने १२ जून २०१० रोजी हरारे येथे झिम्बाब्वेविरुद्ध टी-20 पदार्पण केले. पदार्पणाच्या सामन्यात विराटने २१ चेंडूत २६ धावा केल्या होत्या. विराट १४ वर्षांपासून टी-20 खेळत आहे.
बाबर आझमने १२२ सामने खेळून T20 आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये सर्वाधिक ४११३ धावा केल्या आहेत. तर कोहलीच्या नावावर ११९ सामन्यात ४०४२ धावा आहेत. अशा स्थितीत कोहलीला बाबरला मागे टाण्याची संधी असेल. कोहली आता बाबर आझमपेक्षा ७१ धावांनी मागे आहे.
अमेरिकन संघात भारतीय वंशाचे अनेक खेळाडू आहेत. सौरभ नेत्रावलकर आणि हरमीत सिंग हे अमेरिकन गोलंदाज अनेक भारतीय खेळाडूंसोबत खेळले आहेत. सौरभ आणि हरमीत भारतीय कर्णधार रोहित शर्मासोबतही खेळले आहेत. नेत्रावळकर सूर्यकुमार यादवसोबतही खेळला आहे.
संबंधित बातम्या