मराठी बातम्या  /  क्रिकेट  /  Adam Zampa : ॲडम झाम्पाने रचला इतिहास, मिचेल स्टार्कला मागे टाकून बनला नंबर वन गोलंदाज

Adam Zampa : ॲडम झाम्पाने रचला इतिहास, मिचेल स्टार्कला मागे टाकून बनला नंबर वन गोलंदाज

Jun 12, 2024 04:49 PM IST

Adam Zampa In T20 world cup 2024 : अँटिग्वाच्या सर व्हिव्हियन रिचर्ड्स स्टेडियमवर खेळल्या गेलेल्या सामन्यात ॲडम झाम्पाने आपल्या फिरकीच्या तालावर नामिबियाच्या फलंदाजांना नाचवले. ॲडम झाम्पाने ४ षटकात केवळ १२ धावा देत ४ विकेट घेतल्या.

Adam Zampa : ॲडम झाम्पाने रचला इतिहास, मिचेल स्टार्कला मागे टाकून बनला नंबर वन गोलंदाज
Adam Zampa : ॲडम झाम्पाने रचला इतिहास, मिचेल स्टार्कला मागे टाकून बनला नंबर वन गोलंदाज (PTI)

ऑस्ट्रेलियाचा लेगस्पिनर ॲडम झाम्पाने बुधवारी (१२ जून) नामिबियाविरुद्ध ४ विकेट घेत इतिहास रचला. टी-२० वर्ल्डकप २०२४ चा २४वा सामना ऑस्ट्रेलिया आणि नामिबिया यांच्यात खेळला गेला. या सामन्यातून ॲडम झाम्पाने आपल्या टी-20 आंतरराष्ट्रीय कारकिर्दीत १०० बळी पूर्ण केले. T20I मध्ये १०० किंवा त्याहून अधिक विकेट घेणारा झाम्पा हा पहिला ऑस्ट्रेलियन गोलंदाज ठरला.

अँटिग्वाच्या सर व्हिव्हियन रिचर्ड्स स्टेडियमवर खेळल्या गेलेल्या सामन्यात ॲडम झाम्पाने आपल्या फिरकीच्या तालावर नामिबियाच्या फलंदाजांना नाचवले. ॲडम झाम्पाने ४ षटकात केवळ १२ धावा देत ४ विकेट घेतल्या. झाम्पाने कारकिर्दीतील ८३व्या टी-२० आंतरराष्ट्रीय सामन्यात १०० बळींचा टप्पा गाठला.

ट्रेंडिंग न्यूज

झाम्पा ऑस्ट्रेलियाकडून T20 आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये आघाडीवर आहे. ऑस्ट्रेलियन गोलंदाजांमध्ये, वेगवान गोलंदाज मिचेल स्टार्क T20 आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये सर्वाधिक विकेट्स घेण्याच्या बाबतीत दुसऱ्या स्थानावर आहे. डाव्या हाताच्या वेगवान गोलंदाजाने ६२ टी-20 सामन्यांत ७६ बळी घेतले. त्याचबरोबर जोश हेझलवूड ४८ सामन्यांत ६४ बळी घेत तिसऱ्या स्थानावर आहे.

ॲडम झाम्पाने रचला इतिहास

ॲडम झम्पा हा T20 आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये १०० किंवा त्याहून अधिक बळी घेणारा जगातील १५ वा गोलंदाज ठरला आहे. १०० बळींचा आकडा गाठणाऱ्या जगातील ६ लेगस्पिनर्सपैकी तो एक बनला आहे. याशिवाय ॲडम झम्पा हा T20 विश्वचषकाच्या इतिहासात सर्वाधिक विकेट घेणारा ऑस्ट्रेलियन गोलंदाज ठरला आहे. झाम्पाने टी-20 वर्ल्ड कपमध्ये ३१ विकेट घेतल्या आहेत. त्याने मिचेल स्टार्कला (२९ विकेट) मागे टाकले.

ऑस्ट्रेलियाचा मोठा विजय

ॲडम झाम्पाच्या उत्कृष्ट गोलंदाजीमुळे ऑस्ट्रेलियाने नामिबियाला १७ षटकांत केवळ ७२ धावांवर ऑलआउट केले. यानंतर कांगारू संघाने केवळ ३४ चेंडूत एक विकेट गमावून लक्ष्य गाठले. या विजयासह ऑस्ट्रेलियन संघाने T20 विश्वचषक २०२४ च्या सुपर-८ फेरीत प्रवेश केला. ऑस्ट्रेलियापूर्वी केवळ दक्षिण आफ्रिकेला सुपर-८ मध्ये आपले स्थान निश्चित करता आले आहे.

WhatsApp channel