मराठी बातम्या  /  मनोरंजन  /  साक्षीने गेमच केला! पत्रकार परिषद घेत चैतन्य आणि अर्जुनवर लावले आरोप! ‘ठरलं तर मग’मध्ये ट्वीस्ट

साक्षीने गेमच केला! पत्रकार परिषद घेत चैतन्य आणि अर्जुनवर लावले आरोप! ‘ठरलं तर मग’मध्ये ट्वीस्ट

Jun 13, 2024 03:16 PM IST

साक्षी लाईव्ह पत्रकार परिषद घेऊन त्यामध्ये चैतन्य आणि अर्जुन सुभेदार यांनी मिळवून माझ्यासारख्या भोळ्या स्त्रीला फसवलं, ते वकील नाही तर फसवणूक करणारी लोकं आहेत, असे आरोप करणार आहे.

साक्षीने गेमच केला! पत्रकार परिषद घेत चैतन्य आणि अर्जुनवर लावले आरोप!
साक्षीने गेमच केला! पत्रकार परिषद घेत चैतन्य आणि अर्जुनवर लावले आरोप!

ठरलं तर मग’ या मालिकेच्या आजच्या भागात सायली प्रियाच्या गोष्टी ऐकताना दिसणार आहे. प्रियाकडे कोणीतरी पैसे मागत आहे, ही गोष्ट सायलीला खटकणार आहे. मात्र, त्यावेळेस काहीही बोलण्याऐवजी सायली सगळ्यांसमोर प्रियाला याबद्दल प्रश्न विचारणार आहे. ‘तुला आलेला नर्सचा फोन कसला होता आणि कसले खोटे रिपोर्ट तू बनवले आहेस?’, असा प्रश्न ती सगळ्यांसमोरच प्रियाला विचारणार आहे. यावेळी प्रिया घाबरून जाणार आहे. मात्र, परिस्थिती सावरत प्रिया म्हणणार आहे की, ‘तुम्ही सगळे जेव्हा हॉस्पिटलमध्ये पळापळ करत होतात, तेव्हा मला चक्कर आली आणि माझं शुगर डाऊन झालं होतं. मात्र, मी नर्सला माझे रिपोर्ट नॉर्मल बनव, असं सांगितलं. यासाठी तिला पैसे देण्याचा कबूल केलं होतं. तेच पैसे ती मागत होती. मला होणारा त्रास यामुळे इतरांना आणखी त्रास होऊ नये म्हणून मी हे सगळं केलं होतं.’

आधीच पत्नी गमावल्याच्या भावनेत दुःखी असलेला रविराज आपल्या खोट्या लेकीचा हा खोटेपणा खरा वाटून आणखी भावूक होतो आणि तो प्रियाला माफ करतो. दुसरीकडे आता सायली आणि अर्जुन आपल्या कुटुंबाला घरी घेऊन जाण्याचा प्रयत्न करत असतात. मात्र, कुणीही प्रतिमाच्या फोटो समोरून हलायला कबूल नाही. सगळ्यांच्या डोळ्यात अजूनही पाणी आहे. हे पाहून आता सायली एक शक्कल लढवणार आहे. ती काही फुलं प्रतिमाच्या फोटो जवळ ठेवून प्रतिमाच्या फोटोला म्हणणार आहे की, मला तुम्हाला काहीतरी सांगायचं आणि यानंतर प्रतिमा म्हणून ती पूर्णा आजीशी बोलणार आहे.

रवी चारी देणार सतार वादनाचे धडे! कधी आणि कुठे? जाणून घ्या संपू्र्ण माहिती...

सायली लढवणार शक्कल!

सायली पूर्णा आजीला म्हणणार आहे की, ‘माझ्या माघारी तुम्ही असे रडत बसला तर, माझ्या आत्म्याला कशी शांती मिळेल, माझ्यामागे असं कुणीही रडायचं नाही’, असा प्रतिमाचा निरोप असल्याचं ती सगळ्यांना सांगणार आहे. काही क्षणांसाठी मात्र पूर्णा आजीला सायलीमध्येच प्रतिमाचा भास होत असल्याने ती सायली म्हणणं ऐकणार आहे. सायलीला पाहून आता प्रियाचा आणखी जळफळाट होणार आहे. तर, सायली आपल्या कुटुंबाला कशाप्रकारे सावरते हे बघून भावनेच्या भरात अर्जुन तिला म्हणणार आहे की, अशी बायको जर असेल तर कुणाला कशी आपल्या कुटुंबाची काळजी वाटेल.

ट्रेंडिंग न्यूज

साक्षी करणार गेम!

मात्र, नंतर तो आपलंच बोलणं सावरत तिला म्हणणार आहे की, तुम्ही ज्या घरात जाल तिथे असाच आनंद पसरवाल. आता सगळेजण घरी परतणार आहेत. मात्र, त्यावेळी त्यांना पुन्हा एक मोठा धक्का बसणार आहे. साक्षी लाईव्ह पत्रकार परिषद घेऊन त्यामध्ये चैतन्य आणि अर्जुन सुभेदार यांनी मिळवून माझ्यासारख्या भोळ्या स्त्रीला फसवलं, ते वकील नाही तर फसवणूक करणारी लोकं आहेत, असे आरोप करणार आहे. त्यामुळे सगळ्यांनाच मोठा धक्का बसणार आहे. आता मालिकेत पुढे काय होणार हे येत्या भागात पाहायला मिळणार आहे.

WhatsApp channel