Konkan Railway : गोव्याशी संबंधित असलेली ही योजना कोकण रेल्वेकडून अखेर रद्द! मोठं कारण आलं समोर
मराठी बातम्या  /  महाराष्ट्र  /  Konkan Railway : गोव्याशी संबंधित असलेली ही योजना कोकण रेल्वेकडून अखेर रद्द! मोठं कारण आलं समोर

Konkan Railway : गोव्याशी संबंधित असलेली ही योजना कोकण रेल्वेकडून अखेर रद्द! मोठं कारण आलं समोर

Jun 13, 2024 04:00 PM IST

Konkan Railway News : स्थानिकांकडून या योजनेला होत असलेला विरोध लक्षात घेतारेल्वेकडून ही योजना रद्द करण्यात आली आहे. यामुळे या योजनेसाठी जारी केलेल्या निविदा रद्द केल्या आहेत.

गोव्याशी संबंधित असलेली ही योजना कोकण रेल्वेकडून अखेर रद्द!
गोव्याशी संबंधित असलेली ही योजना कोकण रेल्वेकडून अखेर रद्द!

Kokan RailwayNews :कोकण रेल्वे प्रशासानाने गोव्याशी संबंधित योजना रद्द करण्याचा निर्णय घेतला आहे. या योजनेला गोव्यातील स्थानिक लोकांचा जोरदार विरोध होता. स्थानिकांच्या विरोधानंतर कोकण रेल्वेने हा प्लान गुंडाळण्याचा निर्णय घेतला आहे. कोकण रेल्वेकडून रेंट अ बाइक (Bike On Rent) ही योजना प्रस्तावित होती. मात्र योजना जाहीर झाल्यापासून नागरिकांचा विरोध होता. अखेर बुधवारी ही योजना रद्द केली आहे.

कोकण रेल्वे कॉर्पोरेशन लिमिटेडच्या (Kokan Railway) उप महाप्रबंधक बबन घाटगे यांनी सांगितले की, स्थानिकांकडून या योजनेला होत असलेला विरोध लक्षात घेतारेल्वेकडून ही योजना रद्द करण्यात आली आहे. यामुळे गोव्यात दुचाकी भाड्याने देण्यासाठी आखलेल्या या योजनेसाठी जारी केलेल्या निविदा रद्द केल्या आहेत.

कोकण रेल्वेच्या या योजनेला आपचे आमदार वेन्झी व्हिएगस दक्षिण तसेच उत्तर गोव्यातील रेन्ट अ बाइक असोसिएशनने विरोध केला होता. गोवा फॉरवर्डचे अध्यक्ष आणि आमदार विजय सरदेसाई यांनी कोकण रेल्वेच्या या बाईक योजनेला आधीपासूनच विरोध केला होता. या योजनेमुळं स्थानिक लोकांच्या बाईक व्यवसायावर परिणाम होऊ शकतो. या योजनेला विरोध करताना प्रादेशिक अस्मितेचा मुद्दा उपस्थित केला होता. कोकण रेल्वेच्या योजनेमुळे कोकण रेल्वे गोव्याच्या पर्यटन क्षेत्रात प्रवेश करत आहे. यामुळे पारंपारिक व्यवसायांना याचा फटका बसू शकतो. त्यामुळे आमचा या योजनेला विरोध आहे. असे आमदार सरदेसाई यांनी सांगितलं आहे.

गोव्याचे मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांनीही याप्रकरणी कोकण रेल्वेचे मुख्य व्यवस्थापकीय संचालक संतोषकुमार झा यांची भेट घेऊन या योजनेची निविदा रद्द करण्याची मागणी केली होती.

आमदार सरदेसाई यांनी म्हटलं की, कोकण रेल्वेने वेळेवर ट्रेन सोडण्यावर लक्ष केंद्रित केले पाहिजे. त्यांनी पर्यटनाच्या व्यवसायात येऊ नये. कोकण रेल्वेची जबाबदारी परिवहन उपलब्ध करुन देणे आहे. रेल्वे वेळेवर चालवणे ही आहे. मात्र, रेल्वेबाइक व कार भाड्याने देण्याच्या व्यवसायात उतरण्याचा प्रयत्न करत आहे. गोव्यातील स्थानिक सुरुवातीपासूनच हा व्यवसाय करत आहेत.

 

बाईक ऑन रेंट योजना काय आहे -

कोकण रेल्वेकडून बाईक भाड्याने देण्याची योजना सुरू केली जाणार होती. त्यासाठी१८जूनला निविदा सादर करण्याची अंतिम तारीख होती. मात्र,आता विरोधानंतर ही निविदा रद्द करण्याचा निर्णय कोकण रेल्वेकडून घेण्यात आला आहे. गोव्यातील मडगाव, थिवी, करमळी, काणकोण तसेच कर्नाटकातील कारवार, गोकर्ण रोड व कुमठा रेल्वे स्थानकावर ही सेवा सुरू करण्याचा विचार होता.

Whats_app_banner

संबंधित बातम्या

महाराष्ट्रातील बातम्या, प्रत्येक घडामोडीची ब्रेकिंग न्यूज मिळवा हिंदुस्तान टाइम्स मराठीवर