सोनाक्षी सिन्हा-झहीर इक्बाल: सोनाक्षी सिन्हा सध्या तिच्या लग्नामुळे चर्चेत आहे. ‘हीरामंडी’ फेम अभिनेत्री तिचा मुस्लिम बॉयफ्रेंड झहीर इक्बालसोबत २३ जून रोजी लग्न करणार आहे. चला यानिमित्ताने जाणून घेऊया, इतर सेलेब्सबद्दल ज्यांनी इतर धर्मात लग्न केले. त्यातील काहींनी इस्लाम स्वीकारला तर काहींनी नावे बदलली.
संजय दत्त-मान्यता: बॉलिवूडचा खलनायक संजय दत्तने प्रसिद्ध अभिनेत्री मान्यतासोबत लग्न केले. फार कमी लोकांना माहित असेल की, मान्यता लग्नापूर्वी मुस्लिम कुटुंबातून आली होती. तिचे नाव दिलनवास शेख होते. संजय दत्तसोबत लग्नानंतर तिने नाव बदलले.
नर्गिस आणि सुनील दत्त: संजय दत्तचे वडील सुनील दत्त यांनी मुस्लिम धर्माच्या नर्गिसशी लग्न केले. मीडिया रिपोर्ट्सनुसार, बॉलिवूड अभिनेत्री नर्गिसने तिचे नाव बदलले होते. तिने स्वतःचे नाव निर्मला दत्त ठेवले.
अमृता सिंह-सैफ अली खान: अमृता सिंहने बॉलिवूड अभिनेता सैफ अली खानसोबत लग्न केले. सैफ अलीशी लग्न करण्यासाठी अमृताने शीख धर्म सोडून इस्लामचा स्वीकार केला होता. अमृता आणि सैफने लग्नाच्या १३ वर्षांनी एकमेकांना घटस्फोट दिला. घटस्फोटानंतर अमृता शीख धर्मात परतली की, नाही याबाबत मीडियामध्ये कोणतीही माहिती नाही. त्यानंतर सैफने करीना कपूरसोबत लग्न केले. करीनाने धर्म न बदलता सैफशी लग्न केले.
शर्मिला टागोर-नवाब मन्सूर अली खान: सैफ अली खानची आई हिंदू धर्माची आहे. तिचा विवाह नवाब मन्सूर अली खान पतौडी यांच्याशी झाला होता. त्यांच्याशी लग्न करण्यासाठी शर्मिलाने इस्लाम धर्म स्वीकारला होता आणि नावही बदलले होते. मीडिया रिपोर्ट्सनुसार, शर्मिला टागोरने तिचे नाव बदलून आयशा सुलताना ठेवले होते.
स्वरा भास्कर-फहाद अहमद: बॉलिवूड अभिनेत्री स्वरा भास्करने २०२३मध्ये सामाजिक कार्यकर्ते आणि नेते फहाद अहमदसोबत लग्न केले. मात्र, स्वरा भास्करने धर्म न बदलता फहादशी लग्न केले.
धर्मेंद्र-हेमा मालिनी: बॉलिवूडचे ज्येष्ठ अभिनेते धर्मेंद्र यांनी अभिनेत्री हेमा मालिनीसोबत लग्न करण्यासाठी धर्म बदलला. धर्मेंद्र आधीच विवाहित होते आणि हिंदू धर्मानुसार ते पुन्हा लग्न करू शकत नव्हते. त्यामुळेच त्यांनी हेमा मालिनी यांच्याशी लग्न करण्यासाठी इस्लाम धर्म स्वीकारला. इस्लाम धर्म स्वीकारल्यानंतर धर्मेंद्र यांनी आपले नाव बदलून दिलावर खान ठेवले.
शाहरुख खान-गौरी खान: शाहरुख खानची पत्नी गौरी पंजाबी हिंदू आहे. गौरी खाननेही धर्म न बदलता शाहरुख खानशी लग्न केले आहे. शाहरुखने अनेकवेळा सांगितले आहे की, त्याची मुलेही दोन्ही धर्मांचे पालन करतात.