Esha Deol Divorce: हेमा मालिनीची लेक पतीपासून विभक्त होणार? ‘त्या’ व्हायरल पोस्टमुळे चर्चांना उधाण!-esha deol divorce rumors reedit post goes viral on internet stating that esha and bharat got separated ,मनोरंजन बातम्या
मराठी बातम्या  /  मनोरंजन  /  Esha Deol Divorce: हेमा मालिनीची लेक पतीपासून विभक्त होणार? ‘त्या’ व्हायरल पोस्टमुळे चर्चांना उधाण!

Esha Deol Divorce: हेमा मालिनीची लेक पतीपासून विभक्त होणार? ‘त्या’ व्हायरल पोस्टमुळे चर्चांना उधाण!

Jan 17, 2024 07:40 AM IST

Esha Deol Divorce Rumors: मनोरंजन विश्वात फारशी सक्रिय नसली तरी, ईशा तिच्या वैवाहिक आयुष्यामुळे नेहमीच चर्चेत असते.

Esha Deol Divorce
Esha Deol Divorce

Esha Deol Divorce Rumors: बॉलिवूड अभिनेत्री हेमा मालिनी आणि अभिनेते धर्मेंद्र यांची मुलगी ईशा देओल हिचे लग्न उद्योगपती भरत तख्तानीसोबत झाले आहे. मनोरंजन विश्वात फारशी सक्रिय नसली तरी, ईशा तिच्या वैवाहिक आयुष्यामुळे नेहमीच चर्चेत असते. मात्र, आता ईशा आणि भरत एकमेकांपासून वेगळे झाल्याच्या चर्चा सुरू झाल्या आहेत. दोघेही मागील बऱ्याच दिवसांपासून कोणत्याही कार्यक्रमात किंवा पार्टीत एकत्र दिसलेले नाहीत. याशिवाय अभिनेत्रीने तिच्या पतीसोबतचे फोटो सोशल मीडियावर शेअर करणे बंद केले आहे. या सगळ्या दरम्यानच रेडीटवर एक पोस्ट व्हायरल झाली आहे, ज्यामध्ये त्यांच्या घटस्फोटाबद्दल सांगण्यात आले आहे.

या पोस्टमध्ये लिहिले आहे की, ‘ईशा देओलने तिच्या पतीसोबतचे फोटो शेअर करणे बंद केले आहे. इन्स्टाग्रामवर तिचा नवऱ्यासोबतचा शेवटचा फोटो ३० जून २०२३चा आहे. नुकत्याच झालेल्या अनेक कार्यक्रमांमध्ये ईशाने एकटीने किंवा आई हेमा मालिनीसोबत हजेरी लावलेली दिसली आहे. काही महिन्यांपूर्वी जेव्हा सनी देओलचा 'गदर २' रिलीज झाला होता, तेव्हा या चित्रपटाची स्क्रिनिंग पार पडली होती. या स्क्रिनिंगला ती बहीण आहाना आणि सावत्र भाऊ सनी-बॉबीसोबत दिसली होती. मात्र, तेव्हा देखील भरत तख्तानी गायब होता. हेमा मालिनी यांच्या वाढदिवसालाही ती एकटीच दिसली होती. त्यानंतर आता ईशाने तिच्या आईसोबत आमिरच्या मुलीच्या रिसेप्शनला हजेरी लावली होती.’

Tharala Tar Mag 16th Jan: खोट्या तन्वीचं पितळ उघडं पडणार! जोगतीणीचं सत्य कल्पनासमोर येणार

ईशा देओल या सगळ्याच ठिकाणी एकटीच पोहोचल्याने, त्यांच्या विभक्त होण्याच्या बातम्यांनी चांगलाच जोर धरला आहे. मात्र, आतापर्यंत या सगळ्या चर्चांकडे केवळ अफवा म्हणून पाहिले जात आहे. याबाबत ईशा आणि भरतकडून अधिकृतरित्या काहीही सांगण्यात आलेले नाही. आता त्यांच्या चाहत्यांना अभिनेत्रीच्या प्रतिक्रियेची प्रतीक्षा आहे.

ईशाने जून २०२३मध्ये भरतला लग्नाच्या वाढदिवसानिमित्त शुभेच्छा देणारी एक सुंदर पोस्ट लिहिली होती. त्यात त्यांनी एक सुंदर फोटोही शेअर केला होता, ज्यामध्ये दोघांमधील प्रेम दिसले होते. ईशा आणि भरत यांची भेट एका आंतरमहाविद्यालयीन स्पर्धेदरम्यान झाली होती. १० वर्षांनंतर ते पुन्हा अमेरिकेत भेटले आणि एकमेकांच्या प्रेमात पडले. २९ जून २०१२ रोजी त्यांनी मुंबईतील इस्कॉन मंदिरात लग्नगाठ बांधली होती. त्यांच्या लग्नाला ११ वर्षे झाली आहेत. ईशा आणि भरत यांना राध्या आणि मिराया या दोन मुली आहेत.

विभाग