Tejashri Pradhan New Projects: ‘होणार सून मी या घरची’ म्हणत अभिनेत्री तेजश्री प्रधान हिने प्रेक्षकांच्या मनात हक्काचं स्थान निर्माण केलं आहे. चित्रपट, मालिका आणि नाटक अशा तीनही क्षेत्रांमध्ये तेजश्री प्रधान हिने आपल्या अभिनयाची चुणूक दाखवली आहे. आता हे नवीन वर्ष देखील तेजश्री प्रधान हिच्यासाठी खूपच खास ठरणार आहे. या वर्षात तेजश्री प्रधान अनेक नव्या प्रोजेक्ट्समध्ये झळकणार आहे. सध्या अभिनेत्री छोट्या पडद्यावरच्या ‘प्रेमाची गोष्ट’ या मालिकेत झळकत आहे. आता लवकरच ती एका चित्रपटात देखील झळकणार आहे. ‘लोकशाही’ या आगामी मराठी चित्रपटात तेजश्री प्रधान मुख्य भूमिकेत झळकणार आहे.
गेल्या काही महिन्यांपासून तेजश्री प्रधान हिने मनोरंजन विश्वातून ब्रेक घेतला होता. मात्र, तिने पुन्हा एकदा मालिका विश्वातून दमदार पुनरागमन केलं. ‘प्रेमाची गोष्ट’ या मालिकेत अभिनेत्री तेजश्री प्रधान मुख्य भूमिका साकारात आहे. ‘ये है मोहबते’ या गाजलेल्या हिंदी मालिकेचं या मराठी रुपांतरणा असलेली ‘प्रेमाची गोष्ट’ सध्या खूप गाजत आहे. या मालिकेला अल्पावधीतच प्रेक्षकांचा भरपूर प्रतिसाद मिळाला आहे. सागर आणि मुक्ता यांची ही कथा प्रेक्षकांना खूप भावली आहे. यामुळेच मालिकेने टीआरपीमध्ये देखील बाजी मारली होती. त्यामुळे तिचं पुनरागमन धमाकेदार ठरलं आहे.
आता ‘लोकशाही’ या आगामी चित्रपटातून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. नुकतीच ती अभिनेत्री माधुरी दीक्षित हिच्या ‘पंचक’ या चित्रपटात देखील झळकली होती. नवीन वर्षाच्या सुरुवातीलाच ‘पंचक’ या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर चांगलाच धुमाकूळ घातला होता. या चित्रपटात तेजश्री प्रधान हिने छोटीशी पण अतिशय महत्वपूर्ण भूमिका साकारली होती. तिच्या या भूमिकेला देखील प्रेक्षकांचा चांगला प्रतिसाद मिळाला होता. मालवणी लहेजा असलेल्या या चित्रपटात तेजश्रीची भूमिका अतिशय रंजक होती. आता तेजश्री प्रधान ‘लोकशाही’ या चित्रपटात एका आगळ्या वेगळ्या भूमिकेत दिसणार आहे.
तेजश्री प्रधान हिचा 'लोकशाही' हा चित्रपट येत्या ९ फेब्रुवारीला प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. या चित्रपटात तेजश्री प्रधानसोबत समीर धर्माधिकारी, भार्गवी चिरमुले आणि अंकित मोहन हे कलाकार देखील महत्त्वपूर्ण भूमिकेत दिसणार आहे. तिच्या या नव्या चित्रपटाचं पोस्टर नुकतंच प्रेक्षकांच्या भेटीला आलं आहे. या चित्रपटात तेजश्री एका मातब्बर राजकारण्याची भूमिका साकारणार आहे.
संबंधित बातम्या