बॉलिवूडमधील लोकप्रिय कपल पैकी एक नाव म्हणजे अभिनेत्री हेमा मालिनी आणि अभिनेते धर्मेंद्र. त्यांनी बॉलिवूडमधील एक काळ गाजवला होता. हेमा मालिनी ही धर्मेंद्र यांची दुसरी पत्नी. १९८० साली धर्मेंद्र यांनी हेमा मालिनीशी लग्न केले. त्यांच्या पहिल्या पत्नीचे नाव प्रकाश कौर. सनी देओल आणि बॉबी देओल हे धर्मेंद्र यांच्या पहिल्या पत्नीची मुले आहेत. विवाहित असूनही धर्मेंद्र हे हेमा मालिनीच्या इतक्या प्रेमात होते की एकदा दिग्दर्शकाला देखील त्यांनी बेदम मारहाण केली होती.
१९८१ साली धर्मेंद्र आणि हेमा मालिनी यांच्या लग्नाला एक वर्ष झाले होते. त्यावेळी दोघांचेही करिअर यशाच्या शिखरावर होते. दोघेही चित्रपटांच्या चित्रीकरणामध्ये व्यग्र होते. दिग्दर्शक सुभाष घई यांच्या 'क्रोधी' या चित्रपटाचे चित्रीकरण सुरु होते. चित्रपटातील एका सीनमध्ये हेमा मालिनी यांना बिकिनी परिधान करायची होती. हेमा यासाठी तयार नव्हती. तिने दिग्दर्शकाला नकार दिला होता.
वाचा: करण जोहरने दीपिका-रणवीरला काय गिफ्ट दिले? जाणून घ्या गिफ्ट हॅम्परविषयी
हेमा मालिनी सुभाष घई यांना म्हणाल्या की जर या सीनची इतकीच गरज आहे तर मी रिविलिंग ड्रेस परिधान करते. मात्र मी बिकिनी परिधान करु शकणार नाही. यावर सुभाष घई यांनी थेट नकार दिला. त्यांनी हेमा मालिनीला जबरदस्ती बिकिनी घालण्यास सांगितले. त्यांनी हेमा मालिनीला सांगितले की तुझ्या कॉन्ट्रॅक्टमध्ये लिहिली आहे की दिग्दर्शकाला तुम्ही नाही म्हणू शकत नाही. शेवटी हेमा मालिनी यांनी बिकिनी परिधान केली.
जेव्हा धर्मेंद्र यांना याबाबत कळाले तेव्हा त्यांना प्रचंड राग आहे. दुसऱ्याच दिवशी ते क्रोधी चित्रपटाच्या सेटवर पोहोचले आणि सुभाष घई यांच्याशी वाद घालू लागले. रागाच्या भरात त्यांनी सुभाष घई यांच्यावर हात देखील उचलला. त्यांना मारहाण केली. अभिनेता रंजीतने कसेबसे धर्मेंद्र यांचा राग शांत केला. जेव्हा त्यांनी हेमा मालिनीचा बिकिनी सीन डिलिट केला तेव्हाच तेथून गेले. या घटनेनंतर सुभाष घई यांनी ना हेमा मालिनीसोबत सिनेमा केला ना धर्मेंद्र यांच्यासोबत.