Pune Porsche Car Accident : पुण्यातील कल्याणी नगर अपघातात प्रकरणी रोज नव नवीन माहिती पुढे येत आहे. अपघात झाल्याच्या दिवशी मुलाला वाचवण्यासाठी आरोपी मुलाचे बाबा विशाल अगरवाल आणि आई शिवानी अगरवाल हे पोलिस ठाण्यात रात्रभर उपस्थित असल्याची माहिती पुढे आली आहे. तर मुलाचे बदललेले रक्त हे आई शिवानीचे असल्याचे पुढे आले आहे. दरम्यान, या प्रकरणी पुणे पोलिसांनी शिवानी अगरवाल यांना अटक केली आहे.
पुणे कल्याणी नगर येथे आलीशान पोर्शे कार चालवत बिल्डर विशाल अगरवाल याच्या अल्पवयीन मुलाने दुचाकी वरून जाणाऱ्या दोघांना धडक दिली होती. यात एका तरूणाचा आणि एका तरुणीचा मृत्यू झाला होता. यानंतर नागरिकांनी या पोराला पकडून पोलिसांच्या हवाली केले होते. पोलिसांनी मुलाला अटक करून त्याची आरोग्य तपासणी करण्यासाठी त्याला ससुन रुग्णालयात भरती केले होते. यावेळी मुलाला वाचवण्यासाठी आई शिवानी आणि वडील विशाल अगरवाल हे ससुनमध्ये उपस्थित होते. त्यांनीच मुलाचे रक्ताचे नमुने बदलन्यासाठी दबाव टाकल्याचे उघड झाले आहे. तर मुलाचे रक्ताचे नमुने हे कचऱ्यात टाकून शिवानी अगरवाल यांचे रक्ताचे नमुने घेण्यात आल्याचे उघड झाले आहे. शिवानी अगरवाल यांनी या बाबत चौकशीत कबुली दिली आहे.
दरम्यान, माझा मुलगाच गाडी चालवत होता, अशी कबुली देखील विशाल गरवळ आणि आई शिवानी अगरवाल यांनी दिली आहे. त्यामुळे अपघात झाला त्या दिवशी अल्पवयीन मुलगा हाच गाडी चालवत असल्याचे स्पष्ट झाले आहे.
आरोपीची आई शिवानी व वडील विशाल अग्रवालने यांनी मुलाला वाचवण्यासाठी कट रचला असल्याचे तपासात उघड झाले आहे. अपघात झाल्यानंतर शिवानी अग्रवाल व विशाल अग्रवाल हे दोघेही ससून रुग्णालयात होते. दवाखान्याच्या सीसीटीव्हीत देखील विशाल अग्रवाल दिसून आला होता. या प्रकरणी अल्पवयीन आरोपी मुलाचे वडील विशाल अगरवाल, आजोबा सुरेंद्र अगरवाल तर आई शिवानी अगरवाल यांना अटक करण्यात आली आहे.