मराठी बातम्या  /  राशिभविष्य  /  Today Horoscope 2 June 2024 : जून महिन्याचा पहिला रविवारचा दिवस तुम्हाला कसा जाणार? वाचा आजचे राशीभविष्य

Today Horoscope 2 June 2024 : जून महिन्याचा पहिला रविवारचा दिवस तुम्हाला कसा जाणार? वाचा आजचे राशीभविष्य

Jun 02, 2024 07:55 AM IST

Today Horoscope 2 June 2024 : आज रविवारच्या दिवशी अपरा स्मार्त एकादशी साजरी केली जात आहे. हा दिवस तुमच्यासाठी कसा असणार, वाचा आजचे राशीभविष्य थोडक्यात!

आजचे राशीभविष्य २ जून २०२४
आजचे राशीभविष्य २ जून २०२४

आज रविवार २ जून २०२४ चा दिवस अतिशय खास आहे. आज अपरा स्मार्त एकादशी साजरी केली जात आहे. तर दुसरीकडे चंद्र अहोरात्र मीन आणि मेष राशीतून संक्रमण करत आहे. यामध्ये आजचा दिवस कोणाला सकारात्मक तर कोणाला नकारत्मक असणार आहे. तुम्हाला आजचा दिवस नेमका कसा जाणार जाणून घ्या राशीभविष्य.

मेषः 

आज शनि चंद्र दृष्टीयोगात जोडीदाराची काही महत्त्वाची कामे रखडतील. घरात आणि घराबाहेर दोन्हीकडे लक्ष द्यावे लागल्यामुळे तारेवरची कसरत करावी लागेल. व्यवसायात एखादी योजना रद्द करावी लागेल.

वृषभ: 

आज चंद्रभ्रमणात सामाजिक क्षेत्रात मान मिळेल. कौटुंबिक वातावरण चांगले नसल्यामुळे काम करण्यात आनंद वाटणार नाही. व्यवसायात वेळेवर कामे दिली नाहीत तर पुढच्या कामावर त्याचा परिणाम होईल.

मिथुनः 

आज आयुष्मान योगात खरेदी आणि शुभ कामासाठी दिवस उत्तम आहे. घरातील जुने वाद संपुष्टात येऊन गृहसौख्यात भर पडेल.

कर्कः 

आज चंद्राशी होणारा शनिचा संयोग पाहता अडलेली कामे मार्गी लागतील. तुमच्यातील सद्गुणांचे लोक कौतुक करतील. कुटुंबामध्ये तुमच्या सल्ल्याला महत्त्व राहील.

सिंह: 

आजच्या चंद्र संक्रमणात कामाचे उत्तम नियोजन करणार आहात. किर्ती प्रसिद्धीचे योग संभवतात. उत्तम कल्पनाशक्तीचा आविष्कार तुमच्यात पहायला मिळेल.

कन्याः 

आज मंगळ-चंद्र संयोगात घर किंवा वाहन खरेदी कराल. प्रवासामध्ये चीजवस्तू सांभाळा. मुलांच्या अभ्यासाविषयी जास्त लक्ष द्यावे लागेल. अती संवेदनशील असल्यामुळेच थोडा तापटपणाही वाढेल.

तूळ: 

आज शनि-चंद्र दृष्टीयोगात असल्याने वैवाहीक आयुष्यात वाद जास्त ताणू नका. आर्थिक बाबतीत उगीच चिंता कराल. खर्चाचा आकडा थोड़ा वाढल्यामुळे तसे वाटणे साहजिक असले तरी पैसे मिळणार आहेत.

वृश्चिकः 

आज आयुष्मान योगातील चंद्रभ्रमणात समजूतदार आणि सोशिक होऊन घरातील अनेक अडचणी सोडवाल. अत्यंत प्रतिकूल परिस्थितीमध्ये स्थिर राहून ध्येयापर्यंत पोहचण्याचा फार मोठा गुण तुमच्यामध्ये आहे.

धनुः 

आज चंद्रभ्रमणात व्यवसायात आपल्या मतावर ठाम रहाणार आहात. घरात वेळ देऊ शकणार नसल्यामुळे मनावर थोडा ताण येईल. हाती आलेला पैसा अचानक कुटुंबातील अडचणींवर खर्च होईल.

मकरः 

आज चंद्राशी होणारा मंगळाचा संयोग पाहता आर्थिक स्थिती सुधारेल. तज्ज्ञांच्या सल्ल्याने गुंतवणूक करायला हरकत नाही. ज्यांना व्यसन आहे त्यांनी ते कमी करण्याचा प्रयत्न करावा.

कुंभः 

आज आयुष्मान योगात व्यवसायातील अडलेली कामे मार्गी लागतील. काम करण्यासाठी बुद्धीबरोबर चिकाटीही हवी. शक्ती आणि युक्तीचा सुरेख संगम व्यवहारात दिसेल.

मीन: 

आज आयुष्मान योगात सामाजिक कामात मानसन्मान मिळण्याचे योग आहेत. प्रवासात जास्त पैसा खर्च होण्याचा संभव आहे. अशा परिस्थितीत प्रत्येक गोष्टीचा खोलवर विचार कराल. आणि कंटाळा न करता कामाला लागाल.

WhatsApp channel