Tharala Tar Mag 16th January 2024 Serial Update: सायलीने अखेर अर्जुनला माफ केलं आहे. सायलीने माफ केल्यामुळे अर्जुन आता आनंदाच्या शिखरावर आहे. गुंडांशी धुमश्चक्री झाल्यानंतर रात्री अर्जुन सायलीच्या माहेरी म्हणजेच कुसुम ताईंच्या घरीच थांबला आहे. तर, दुसरीकडे कल्पनासमोर एक मोठं सत्य येणार आहे. तन्वी बनून वावरणाऱ्या प्रियाचा खोटेपणा आता समोर येणार आहे. प्रियानेच खोटेपणा करून जोगतीणीला पढवून कल्पनाकडे पाठवलं होतं. याच जोगतीणीच्याकरवी प्रियाने कल्पनाच्या मनात भीतीचं बीज पेरलं होतं.
सायली आणि अर्जुन यांच्या नात्यात विष कालवण्यासाठी प्रिया शक्य ते सगळे प्रयत्न करत आहे. प्रियाने आपण तन्वी असल्याचे भासवून रविराजच्या घरात एन्ट्री मिळवली होती. आता तन्वी बनून ती सायलीच्या आयुष्यात गोंधळ निर्माण करत आहे. यातच आता तिने एका खोट्या जोगतीणीला कल्पनाकडे पाठवून तिच्या मनात संशयाचं बीज पेरलं होतं. तुमची सून काही कारणांनी तुमच्या मुलाच्या आयुष्यातून दूर निघून जाईल, असं भाकित या जोगतीणीने केलं होतं. यामुळे कल्पना मनातून चांगलीच घाबरून गेली होती. मात्र, आता या खोट्या जोगतीणीचं सत्य कल्पनासमोर येणार आहे.
जोगतीणीला पट्टी पढवताना प्रियाला पाहून कल्पनाचा संताप अनावर होणार आहे. प्रियानेच पैसे देऊन या महिलेला खोटं बोलायला लावल्याचं आता समोर आलं आहे. यावेळी कल्पना प्रियाला रंगेहात पकडणार आहे. इतकंच नाही तर, यावेळी ती प्रियाला चांगलंच सुनावणार आहे. तू बहिणीसारखी असूनही सायलीच्या आयुष्यात आणि तिच्या संसारात विष का कालवत आहेस? असा प्रश्न कल्पना प्रियाला करणार आहे. तर, ‘तू दुसरी कुणी असली असती तर तुला आताच पोलिसांच्या हवाली केलं असतं. पण, तू रविराजची मुलगी आहेस, म्हणून तुला एकदा सोडून देतेय’, असा धमकीवजा इशारा ती प्रियाला देणार आहे.
मात्र, जर पुन्हा तू सायलीच्या आयुष्यात असं काही करायचा प्रयत्न केलास तर, तुला त्याची शिक्षा मिळेल आणि मी याची माहिती रविराजला देईन, असे देखील कल्पनाने म्हटले. यामुळे आता प्रियाला चांगलीच तंबी मिळाली आहे. दुसरीकडे अर्जुन सायलीची समजूत काढण्यात यशस्वी ठरल्याने आता सायली देखील त्याच्यासोबत घरी जाण्यासाठी तयार होणार आहे. मात्र, ‘आता हे फार काळ चालणार नाही, आपण थोड्याच दिवसांत पुन्हा कुसुम ताईंकडे येऊन राहणार आहे. आपला करार संपणार आहे’, याची आठवण सायली अर्जुनला करून देणार आहे.
संबंधित बातम्या