जागतिक स्तरावर, दमा हा सर्वात प्रचलित तीव्र आजारांपैकी एक आहे, ज्यामुळे जगभरातील ३०० दशलक्ष लोक प्रभावित झालेले आहेत. तर, २०२५पर्यंत ही संख्या १०० दशलक्षांनी वाढण्याची शक्यता आहे. बाहेरील प्रदूषण, विषाणू, परागकण आणि इतर पर्यावरणीय घटकांसारख्या ट्रिगरच्या संपर्कात येण्यामुळे दमा आणि दम्याशी संबंधित नवीन आजारांचा धोका वाढतो.
विशेष म्हणजे, पर्यावरणीय प्रदूषकांव्यतिरिक्त, अभ्यासात अत्यधिक तापमान आणि एलर्जीक दमा यांच्यात मजबूत संबंध आढळला आहे. अभ्यासात असे आढळले आहे की अत्यधिक उष्णतेमुळे दम्यावर लक्षणीय परिणाम होतो आणि उष्णतेची ही तीव्र लाट अस्थम्यात एक महत्त्वपूर्ण ट्रिगर म्हणून काम करू शकते.
पुण्यातील सह्याद्री हॉस्पिटलचे कन्सल्टंट अॅलर्जिस्ट डॉ. विजय वराड यांनी एचटी लाइफस्टाइलला दिलेल्या मुलाखतीत सांगितले की, ‘अतिउष्णतेमुळे शरीरात द्रव कमी होतो, ज्याचा परिणाम फुफ्फुसांसह शरीरातील रक्ताभिसरणावर होतो. उष्णतेमुळे फुफ्फुसाच्या कार्यावर परिणाम होत असल्याने दम्याच्या रुग्णांना अटॅक आणि श्वास घेण्यास त्रास होऊ शकतो. शिवाय, तीव्र उष्णता आणि दमट हवामानामुळे हवेतील प्रदूषक, कीटक आणि सामान्य एलर्जीनची पातळी वाढू शकते. ज्यामुळे दम्याचा झटका येण्याची धोका वाढू शकतो. वातावरणातील कार्बन-डायऑक्साईडचे प्रमाण आणि उष्ण तापमानामुळे परागकणांचे उत्पादन वाढवते, विशेषत: शहरी भागात याचे प्रमाण जास्त आहे.’
ते म्हणाले की, ‘हवेतील हे कण संवेदनशील वायुमार्गाला त्रास देऊ शकतात आणि एलर्जिक दम्याला कारणीभूत ठरू शकतात. भविष्यात उष्णतेची लाट वाढेल आणि एलर्जिक दम्याच्या रुग्णांमध्ये लक्षणीय वाढ होईल, असा तज्ज्ञांचा अंदाज आहे. जसजसे तापमान वाढते, तसतसे धुळीचे कणही एलर्जेनची शक्ती वाढण्याबरोबर वाढतात. ग्लोबल वॉर्मिंगमुळे परागकणांचा हंगाम सध्या लांबला आहे. हिवाळ्यात पुन्हा धुक्यामुळे हवेतील हे परागकण खाली अडकतात, त्याबरोबरच वाहनांचा धूर, धूळ आणि बांधकामाची धूळ या समस्या देखील आहेत. ग्रामीण भागाबद्दल बोलायचे झाले, तर कीटकनाशकांच्या अतिवापरामुळे या परागकणांची शक्ती वाढली आहे.’
अशा तीव्र उष्णतेच्या परिस्थितीत डॉ. विजय वराड यांनी काही उपाय सुचवले आहेत, ज्यामुळे तुम्ही स्वतःचा बचाव करू शकाल…
योग्य ती खबरदारी घेऊन एखादी व्यक्ती त्यांच्या एलर्जीचे अधिक चांगल्या प्रकारे व्यवस्थापन करू शकते आणि एलर्जीच्या दम्यास कारणीभूत ठरणारे ट्रिगर रोखू शकते. उष्णतेची लाट आणि तीव्र परिस्थितीमुळे एलर्जिक दम्याची शक्यता वाढते. कोणतीही लक्षणे कायम राहिल्यास आपल्या डॉक्टरांशी बोलणे आणि योग्य उपचार घेणे महत्वाचे आहे.
संबंधित बातम्या