मराठी बातम्या  /  मनोरंजन  /  Anushka Sharma: अनुष्का-विराटकडे पुन्हा गोड बातमी? अभिनेत्री शेअर केला 'बेबी बंप' फोटो!'

Anushka Sharma: अनुष्का-विराटकडे पुन्हा गोड बातमी? अभिनेत्री शेअर केला 'बेबी बंप' फोटो!'

Harshada Bhirvandekar HT Marathi
Oct 27, 2023 09:00 AM IST

Anushka Sharma Baby Bump:अनुष्का शर्मा पुन्हा गर्भवती असल्याच्या चर्चा रंगल्या होत्या. दरम्यान आता अभिनेत्रीने बेबी बंपचा फोटो शेअर करत सगळ्यांना बुचकळ्यात पाडलं आहे.

Anushka Sharma
Anushka Sharma

Anushka Sharma Baby Bump: बॉलिवूड अभिनेत्री अनुष्का शर्मा नेहमीच चर्चेत असते. सध्या अनुष्का शर्मा बॉलिवूड करिअरमधून ब्रेक घेऊन आपल्या मुलीला आणि पतीला वेळ देत आहे. विराट कोहलीला चिअर करण्यासाठी अनुष्का शर्मा भारताच्या सामन्यांना हजेरी लावत आहे. दरम्यान आता अभिनेत्रीने तिच्या सोशल मीडिया अकाऊंटवर बेबी बंप फ्लॉन्ट करतानाचा एक फोटो पोस्ट केला आहे. अनुष्का शर्मा हिचा हा फोटो बघून आता चाहत्यांच्या भुवयाही उंचावल्या आहेत. गेल्या काही काळापासून अनुष्का शर्मा पुन्हा गर्भवती असल्याच्या चर्चा रंगल्या होत्या. दरम्यान आता अभिनेत्रीने बेबी बंपचा फोटो शेअर करत सगळ्यांना बुचकळ्यात पाडलं आहे.

ट्रेंडिंग न्यूज

तुम्हीही अनुष्का शर्माचा बेबी बंप पाहून गोंधळाला आहेत का? अभिनेत्री अनुष्का शर्माने तिचा बेबी बंप दाखवला असला, तरी तो फोटो मात्र जुना आहे. वामिकाच्या जन्माआधीच हा फोटो अनुष्का शर्माने पुन्हा एकदा पोस्ट केला आहे. त्याच जागेवर, त्याच पोजमध्ये बसून अनुष्का शर्माने हा फोटो काढला आहे. वेळ किती भुर्रकन उडून जातो, अशा आशयाचं कॅप्शन देत तिने हा फोटो सोशल मीडियावर शेअर केला आहे. तिच्या या फोटोमुळे चाहते मात्र चांगलेच गोंधळले होते. गेल्या कहाणी महिन्यांपासून अनुष्का शर्मा लवकर पुन्हा एकदा आई होणार असल्याच्या चर्चांना उधाण आले आहे.

Bigg Boss 17: अंकिता लोखंडेवर भडकला पती विकी जैन! मन्नाराकडे इशारा करत म्हणाला...

हिंदुस्तान टाईम्सच्या सूत्रांनुसार, अभिनेत्री अनुष्का शर्मा ही ३-४ महिन्यांची प्रेग्नन्ट आहे. लवकरच टी दुसऱ्या बाळाला जन्म देणार आहे. लवकरच विराट आणि अनुष्का यांच्या घरी वामिकाच्या भावंडांचे आगमन होणार आहे. तर, अगदी मागच्या वेळ प्रमाणेच काही दिवस उलटून गेल्यानंतर अनुष्का आणि विराट याची अधिकृत घोषणा करून चाहत्यांना सरप्राईज देतील, असे म्हटले जात आहे.

काही दिवसांपूर्वी विराट आणि अनुष्का मुंबईतील एका मॅटर्निटी क्लिनिकमध्ये जाताना दिसले होते. तेव्हापासूनच या चर्चांनी जोर धरला आहे. मीडिया रिपोर्ट्सनुसार या जोडप्याने माध्यमांना सध्या काहीही सांगण्यापासून प्रवृत्त केलं आहे. तर, योग्य वेळ आली की, आम्ही स्वतः सांगू असे देखील त्यांनी म्हटले आहे. तर, सध्या बेबी बंपमुळेच अनुष्का मीडियाच्या नजरेपासून दूर राहत असल्याचे म्हटले जात आहे. मात्र, यावर विराट आणि अनुष्का यांच्याकडून अद्याप कोणतेही अधिकृत वक्तव्य करण्यात आलेले नाही.

IPL_Entry_Point

विभाग