जोतिष शास्त्रानुसार सूर्य सध्या वृषभ राशीमध्ये विराजमान आहे. लवकरच सूर्य बुधाच्या राशीत प्रवेश करणार आहे. दरम्यान आज सूर्य बुध आणि शुक्राशी युती करत आहे. अशामध्ये सर्वार्थसिद्धी योग, आयुष्मान योग, रेवती नक्षत्र आणि बव करणसुद्धा निर्माण होत आहेत. या सर्व शुभ योगांचा राशींवरसुद्धा प्रभाव पडणार आहे. अशात आज कोणत्या ५ राशी नशीबवान ठरत आहेत ते जाणून घेऊया.
आज रविवारचा दिवस मिथुन राशीसाठी चांगला असणार आहे. सामाजिक कार्यात रुची वाढेल. हातातून समाजकार्य घडल्याने नावलौकीक वाढेल. व्यवसायातून चांगला नफा होईल. त्यामुळे आर्थिक स्थिती पूर्वीपेक्षा सुधारेल. घरातील वातावरण आनंदमय असेल. शुभ कार्य पार पाडण्यासाठी आजचा दिवस उत्तम आहे. कामानिमित्त प्रवास घडून येईल. प्रवासातून फायदाच झालेला दिसून येईल. कला क्षेत्रातील व्यक्तींना मोठे व्यासपीठ लाभेल. लेखकांच्या लेखनाला चालना मिळेल. नातेवाइकांसोबत असलेले जुने मतभेद संपुष्ठात येऊन संबंध सुधारतील.
आज सर्वार्थसिद्धी आणि आयुष्मान योगात कर्क राशीसाठी दिवस उत्तम असणार आहे. शैक्षणिक क्षेत्रात विशेष गोडी निर्माण होईल. अनेक दिवसांपासून रेंगाळलेली महत्वाची कामे आज पूर्णत्वास जातील. कामानिमित्त परदेशी जाण्याचा योग आहे. या परदेशवारीतून फायदा होईल. तुमच्यातील चांगले गुण लोकांच्या समोर येतील. तुमच्याबद्दल आदर द्विगुणित होईल. राजकीय क्षेत्रातील लोकांना प्रसिद्धी मिळण्याची शक्यता आहे. जुन्या मित्रांच्या गाठीभेटी जुळून येतील. त्यांच्या सहवासात वेळ चांगला जाईल. घरातील वातावरण खेळीमेळीचे राहील.
आजचे चंद्रभ्रमण सिंह राशीच्या लोकांसाठी शुभ असणार आहे. त्यामुळे आज रविवार सुट्टीचा दिवस तुम्हाला आनंदात जाईल. उद्योग-व्यापारातून चांगला नफा मिळाल्याने मन प्रसन्न राहील. महत्वाच्या विषयांवर चर्चा करण्याची संधी मिळेल. त्याने तुमचा नावलौकीक वाढेल. मित्रांकडून एखादी आनंदाची बातमी ऐकायला मिळू शकते. मिळकतीत वाढ होऊन आर्थिक स्थिती स्थिर होईल. क्रीडा क्षेत्रातील लोकांना मोठी संधी मिळण्याचा योग आहे. मनासारख्या गोष्टी घडत असल्याने आत्मविश्वसात वाढ होईल.
वृश्चिक राशीच्या लोकांना आज सर्वार्थसिद्धी योगात लाभदायक दिवस जाणार आहे. उद्योग-व्यवसायात तुमच्या कल्पनांचे कौतुक होईल. सहकाऱ्यांमध्ये तुमच्याबद्दल आदर सन्मान वाढेल. विवेक बुद्धीने घरातील समस्यांवर तोडगा काढण्यात यशस्वी व्हाल. एखाद्या बातमीने तुमच्या आनंदात भर पडेल. मनाला समाधानही लाभेल. तुमच्या मितभाषी बोलण्याने लोक आकर्षित होतील. दिवसभर उत्साह आणि आत्मविश्वास जाणवेल. कामाच्या दृष्टीने नव्या योजना आखाल.
आजचा दिवस मीन राशीसाठी समाधानकारक असणार आहे. आज जोडीदारासोबत मनमोकळा संवाद साधण्याची संधी मिळेल. यातून अनेक गोष्टी स्पष्ट होतील. एकमेकांबद्दल प्रेम आणि आदराची भावना वाढीस लागेल. घरातील मतभेदसुद्धा दूर होतील आणि वातावरण खेळीमेळीचे होईल. व्यवसायात नवी जबाबदारी मिळेल. मात्र याठिकाणी आळस न करता काम केल्यास लाभ होईल. सामाजिक क्षेत्रात कार्यरत असलेल्या लोकांना आज अनेक चांगले समाधानकारक अनुभव येतील.