मराठी बातम्या  /  राशिभविष्य  /  Dhanu Makar Kumbh Meen Rashi : रविवारचा दिवस धनु राशीच्या लोकांसाठी सुखावणारा! वाचा चारही राशींचे भविष्य

Dhanu Makar Kumbh Meen Rashi : रविवारचा दिवस धनु राशीच्या लोकांसाठी सुखावणारा! वाचा चारही राशींचे भविष्य

Jun 02, 2024 10:19 AM IST

Sagittarius, Capricorn, Aquarius, Pisces prediction 2 June 2024 : आज चंद्र कुंभ राशीतून आणि शततारका व पुर्वा भाद्रपदा नक्षत्रातून भ्रमण करणार आहे. धनु, मकर, कुंभ आणि मीन राशीसाठी कसा असेल गुरुवारचा दिवस? वाचा चारही राशींचे भविष्य!

धनु, मकर, कुंभ आणि मीन
धनु, मकर, कुंभ आणि मीन

Dhanu Makar Kumbh Meen Rashi Bhavishya : जोतिष शास्त्रानुसार आज चंद्र मीन राशीतून मेष राशीमध्ये भ्रमण करणार आहे. तसेच ग्रह-नक्षत्रांच्या राशीपरिवर्तनामुळे आज सर्वार्थसिद्धी योग, रेवती नक्षत्र, आयुष्मान योग आणि बव करणदेखील असणार आहे. या दरम्यान आजचा दिवस धनु, मकर, कुंभ आणि मीन राशीसाठी कसा जाणार याबाबत जाणून घेऊया.

धनु

धनु राशीच्या लोकांसाठी आजचा दिवस चांगला असणार आहे. आज तुमच्या कामकाजाचा विस्तार होईल. नोकरीत वरिष्ठांकडून मर्जी प्राप्त कराल. कामाच्याबाबतीत नवीन कल्पना नक्की मांडा. व्यवसायातील वातावरण चांगले राहिल. अचानक लाभ होण्याचे योग आहेत. व्यापारात नवीन योजनेत भागीदाराकडून मदत मिळेल. विरोधकावर मात करण्यात यशस्वी व्हाल. दुसर्‍याला जामीन राहु नका अन्यथा फसवणूक, आर्थिक हानी होण्याची शक्यता आहे. बांधकाम क्षेत्रातील व्यक्तींना भरभरटीचा दिवस आहे. एखादया विधायक कार्याची मुहूर्तमेढ रोवली जाईल. पत्नीकडून सासरच्या मंडळीकडून सहकार्य मिळेल. नवीन प्रकल्प कामे पुर्णात्वास जातील.

शुभरंग: पिवळा, शुभदिशाः ईशान्य, शुभअंकः ०३, ०५.

मकर

मकर राशीसाठी आजचा दिवस सामान्य असणार आहे. पार्टनरशिपच्या धंद्यात एकमेकांशी पटणे जरा अवघड राहील. अशावेळी शांत रहाणे सोयीस्कर ठरेल. गूढ गोष्टींची आवड निर्माण होईल. महत्वाच्या गोष्टीत स्वतंत्र विचार कराल. व्यवसायात लाभ होतील. प्रवासाचे योग जुळून येत आहेत. पण तुमच्या मुडी स्वभावामुळे प्रवासात इतरांशी पटणे अवघड जाईल. व्यापारात आर्थिक लाभाची शक्यता आहे. कुटुंबावर खर्च होईल. नियोजीत काम वेळेवर पूर्ण कराल. परदेशगमन अथवा दुरचा प्रवास घडणार आहे. आर्थिकदृष्ट्या प्रवास लाभदायक ठरतील. राजकीय कलाक्षेत्रातील व्यक्तींना पदप्रतिष्ठा लाभेल. सामाजिक कार्यात सहभागी व्हाल. तुमच्या हातून चांगले कार्य घडेल. निरनिराळ्या सूचना कल्पना व्यावसायिकदृष्ट्या अंमलात आणाल.

शुभरंगः निळा, शुभदिशाः नैऋत्य, शुभअंकः ०४, ०८.

कुंभ

कुंभ राशीसाठी आजचा दिवस सामान्य असणार आहे. घरात दोन पिढ्यांमध्ये संघर्ष जाणवेल. परंतु वेळीच सर्व गोष्टी उघडपणे बोलून वातावरण शांत कराल. तुमच्या जबाबदाऱ्या ओळखून त्या पूर्ण कराल. नको तिथे आत्मविश्वासाचा अतिरेक करणे टाळा. प्रेमसंबंधात भावनेवर नियंत्रण ठेवा. आर्थिक नुकसान होण्याची शक्यता राहिल. विरोधक डोके वर काढतील. शत्रुपक्षाच्या कारवाया वाढण्याची शक्यता राहिल. कौटुंबिक पातळीवर काही समस्या उद्भभवतील. मानसिक स्वास्थ बिघडणार नाही याची दक्षता घ्या. अनावश्यक कामात वेळ वाया घालू नका. काम चुकारपणा करू नका. शक्यतो प्रवास टाळा.

शुभरंगः जांभळा, शुभदिशाः पश्चिम, शुभअंकः ०२, ०७.

मीन

मीन राशीसाठी आजचा दिवस संमिश्र स्वरुपाचा असणार आहे. दूरच्या प्रवासाचे योग जुळून येतील. प्रवास सुखावह होण्यासाठी उत्तम नियोजनाची आवश्यकता भासेल. घरामध्ये प्रत्येकाची उगीचच काळजी कराल. परंतु त्यामुळे आपले मनःस्वास्थ्य बिघडवून बसाल. अशावेळी नको ते धाडसी निर्णय घेण्याची शक्यता आहे. कामात यश मिळाल्याने आनंदी राहाल.व्यापारात उत्पन्नात वाढ होईल. नातेवाईकांसोबत असलेल्या संबंधांवर मात्र मर्यादा राखा. कायदेशीरबाबी पूर्ण कराल. आर्थिक स्त्रोत वाढेल.कौटुंबिक सौख्य लाभेल. नवीन व्यापार प्रारंभ करण्यासाठी यशस्वी दिवस आहे. जनमानसात प्रतिष्ठा वृद्धिंगत होईल.

शुभरंगः पिवळा, शुभदिशाः ईशान्य, शुभअंकः ०३, ०७.

WhatsApp channel