प्राचीन काळापासून हिंदू धर्मात देवी-देवतांची उपासना करताना माळेचा जप करण्याची प्रथा आहे. पूजापाठमध्ये माळेचा जप हा एक अत्यंत महत्वाचा भाग आहे. तुम्ही दररोज अत्यंत भक्तीभावाने ज्या माळेचा जप करता, त्यामध्ये एकूण किती मनी आहेत हे तुम्हाला माहिती आहे का? बहुतांश लोकांना याबाबत काहीच अंदाज नाही. तर या पवित्र जप माळेत तब्बल १०८ मणी असतात. अशाने एकावेळी १०८ वेळा तुम्ही देवाचे स्मरण करत असता. आता जप माळेत १०८ च मणी का असतात? यामागेसुद्धा धार्मिक आणि वैज्ञानिक कारण आहे.
वैदिक शास्त्रानुसार देवाची उपासना करताना जप करण्यासाठी माळ आवश्यक असते. यामध्ये रुद्राक्षपासून बनलेल्या माळेला सर्वश्रेष्ठ मानले जाते. या माळेमध्ये विद्युतीय आणि चुंबकीय शक्तीसोबतच कीटकनाशक गुणधर्म असतात. या माळेत १०८ रुद्राक्ष असतात. रुद्राक्ष, तुळस, स्फटिक अशा कोणत्याही गोष्टीपासून बनलेल्या या जप माळेत १०८ च मणी असतात. यामागचे कारण अनेक लोकांना माहितीच नाहीय. याबाबत आपण जाणून घेऊया.
वैदिक शास्त्रानुसार जप माळेतील १०८ मनींबद्दल विविध मान्यता सांगण्यात आल्या आहेत. त्यातील एक अत्यंत महत्वाची मान्यता आपण जाणून घेऊया. मनुष्याच्या श्वासाच्या आधारावर जप माळेत १०८ मनी स्वीकृत करण्यात आल्या आहेत. एका दिवसात २४ तास असतात. आणि या २४ तासात एखादा माणूस २१,६०० वेळा श्वास घेतो. त्यातील १२ तास आपल्या कामासाठी दिले जातात. उरलेले १२ तास देवी-देवतांच्या उपासनेसाठी असतात. या १२ तासांमध्ये व्यक्ती १०८०० वेळा श्वसनक्रिया करतो. परंतु इतक्या वेळा देवाचे नामस्मरण करणे शक्य होत नाही. त्यामुळे १०८०० मधील शेवटचे दोन शून्य काढून जो अंक राहतो तितक्या वेळा देवाचे स्मरण केले जाते. आणि हा शिल्लक राहिलेला अंक १०८ हा असतो. त्यामुळेच १०८ मणी जप माळेत असतात.
ग्रहांच्या यादीत सूर्याला महत्वाचे स्थान आहे. सूर्य एका वर्षात तब्बल २१६००० कला अर्थातच आकार बदलतो. इतकेच नव्हे तर सूर्य वर्षातून दोनवेळा आपली जागासुद्धा बदलतो. यामध्ये तो सहा महिन्यांसाठी उत्तरायण तर सहा महिन्यांसाठी दक्षिणायनमध्ये असतो. या सह महिन्यांच्या कालावधीत सूर्य एकूण १०८००० कला बदलतो. शास्त्रानुसार जप माळेतील प्रत्येक मणी सूर्याच्या कलेला अर्पण केला आहे. मात्र १०८००० मणी माळेत ठेवणे शक्य नसते. त्यामुळेच या आकड्यातील मागचे तीन शून्य हटवून १०८ या अंकाचा स्वीकार करण्यात आला आहे.
जोतिष शास्त्रानुसार या जगाला १२ भागांमध्ये विभागण्यात आले आहे. त्यालाच आपण राशीचक्र म्हणतो. यामध्ये तब्बल १२ राशी अस्तित्वात असतात. या १२ राशी ९ ग्रहांच्या आधारे कार्यरत असतात. या ९ ग्रहांचा आणि १२ राशींचा गुणकार केल्यास १०८ ही संख्या प्राप्त होते आणि म्हणूच जोतिषशास्त्रानुसार जपमाळेत १०८ मणी आहेत.
संबंधित बातम्या