Jee Le Zara: ‘जी ले जरा’मध्ये प्रियांका चोप्राची जागा घेण्यास अनुष्का शर्माने दिला थेट नकार! नेमकं कारण काय?
मराठी बातम्या  /  मनोरंजन  /  Jee Le Zara: ‘जी ले जरा’मध्ये प्रियांका चोप्राची जागा घेण्यास अनुष्का शर्माने दिला थेट नकार! नेमकं कारण काय?

Jee Le Zara: ‘जी ले जरा’मध्ये प्रियांका चोप्राची जागा घेण्यास अनुष्का शर्माने दिला थेट नकार! नेमकं कारण काय?

Published Jul 11, 2023 08:57 AM IST

Jee Le Zara New Update: निर्माते प्रियांकाच्या भूमिकेसाठी अनुष्का शर्माकडे गेले होते. मात्र, आता अनुष्काने देखील या भूमिकेसाठी नकार दिल्याचे बोलले जात आहे.

Jee Le Zara
Jee Le Zara

Jee Le Zara New Update: गेल्या काही दिवसांपासून फरहान अख्तरचा आगामी चित्रपट 'जी ले जरा' प्रचंड चर्चेत आला आहे. फरहान अख्तर याने २०२१मध्ये या चित्रपटाची घोषणा केली होती. या चित्रपटामध्ये बॉलिवूड अभिनेत्री कतरिना कैफ, प्रियांका चोप्रा आणि आलिया भट्ट यांना कास्ट करण्यात आले होते. मात्र, अलीकडेच प्रियांका चोप्रा जोनासने हा चित्रपट सोडल्याची बातमी समोर आली होती. त्यानंतर अशी चर्चा झाली होती की, निर्माते प्रियांकाच्या भूमिकेसाठी अनुष्का शर्माकडे गेले होते. मात्र, आता अनुष्काने देखील या भूमिकेसाठी नकार दिल्याचे बोलले जात आहे.

'बॉलिवूड हंगामा'च्या रिपोर्टनुसार, अनुष्का शर्माने तारीखा जुळत नसल्यामुळे हा चित्रपट नाकारला आहे. या रिपोर्टमध्ये असे देखील म्हटले गेले आहे की, अनुष्का स्वतः या चित्रपटाचा भाग होण्यासाठी उत्सुक होती. परंतु निर्माते ज्या तारखांसाठी विचारणा करत होते, त्या दिवसांमध्ये अनुष्का आधीच व्यस्त होती. तर, दुसरीकडे या चित्रपटाच्या टीमला आलिया भट्ट आणि कतरिना कैफ यांच्याशी जुळणाऱ्या तारखाच हव्या होत्या. मात्र, आता दोन्ही अभिनेत्री देखील या चित्रपटातून काढता पाय घेतील की काय, असे चित्र निर्माण झाले आहे.

Tuntun Birthday: गायिका ते बॉलिवूडची पहिली महिला कॉमेडियन टुनटुन! अभिनेत्रीबद्दल ‘हे’ माहितीये?

कास्टिंग प्रॉब्लेममुळे फरहान अख्तर याने देखील सध्या चित्रपट थांबवल्याचे बोलले जात आहे. आता तो आमिर खानसोबतच्या आगामी प्रोजेक्टवर लक्ष केंद्रित करत आहे. त्यांचा हा आगामी चित्रपट स्पॅनिश स्पोर्ट्स कॉमेडीचा रिमेक आहे. यानंतर, फरहान अख्तर रणवीर सिंहसोबत 'डॉन ३'मध्ये देखील दिसणार आहे.

अभिनेत्री अनुष्का शर्माच्या वर्कफ्रंटबद्दल बोलायचे झाले, तर ती लवकरच 'चकदा एक्सप्रेस'मध्ये दिसणार आहे. तिचा हा चित्रपट भारतीय महिला क्रिकेट संघाची खेळाडू झुलन गोस्वामी हिच्या जीवनावर आधारित आहे. अनुष्का शर्माचा हा चित्रपट नेटफ्लिक्सवर प्रदर्शित होणार आहे.

Whats_app_banner