(2 / 6)हसीन दिलरुबा: तापसी पन्नू आणि विक्रांत मेस्सी यांचा हा चित्रपट तुम्ही नेटफ्लिक्सवर पाहू शकता. हा एक रोमँटिक थ्रिलर चित्रपट आहे. चित्रपटाची सुरुवात एका खुनाच्या संदर्भात चौकशीने होते. तापसीवर खुनाचा आरोप आहे, पण या चित्रपटाच्या शेवटी जेव्हा तुम्हाला खुनी सापडेल, तेव्हा तुम्हाला आश्चर्याचा धक्का बसेल.