मराठी बातम्या  /  क्रिकेट  /  SRH vs CSK Live Steaming : आजही ५०० धावांचा पाऊस पडणार? हैदराबादेत धोनी आणि पॅट कमिन्स भिडणार

SRH vs CSK Live Steaming : आजही ५०० धावांचा पाऊस पडणार? हैदराबादेत धोनी आणि पॅट कमिन्स भिडणार

Rohit Bibhishan Jetnavare HT Marathi
Apr 05, 2024 11:11 AM IST

SRH vs CSK Live Steaming : आयपीएल २०२४ चा आठरावा सामना हैदराबाद आणि सीएसके यांच्यात रंगणार आहे. हा सामना हैदराबादच्या राजीव गांधी आंतरराष्ट्रीय स्टेडियमवर खेळला जाईल.

SRH vs CSK Live Steaming आजही ५०० धावांचा पाऊस पडणार? हैदराबादेत धोनी आणि पॅट कमिन्स भिडणार
SRH vs CSK Live Steaming आजही ५०० धावांचा पाऊस पडणार? हैदराबादेत धोनी आणि पॅट कमिन्स भिडणार

Sunrisers Hyderabad vs Chennai Super Kings Pitch Report : इंडियन प्रीमियर लीग म्हणजेच आयपीएलच्या इतिहासात केवळ एकदाच एका सामन्यात दोन्ही संघांनी मिळून ५०० धावांचा पाऊस पाडला आहे. सनरायझर्स हैदराबाद आणि मुंबई इंडियन्स यांच्यातील सामन्यात हा रेकॉर्ड याच वर्षीच्या आयपीएलमध्ये घडला आहे. दोन्ही संघातील हा सामना हैदराबादच्या राजीव गांधी आंतरराष्ट्रीय स्टेडियमवर खेळला गेला होता.

ट्रेंडिंग न्यूज

आता प्रेक्षकांना या मोसमात पुन्हा एकदा धावा आणि विक्रमांचा वर्षाव पाहायला मिळू शकतो. वास्तविक,  इंडियन प्रीमियर लीगच्या या मोसमात शुक्रवारी (५ एप्रिल) हैदराबादमध्ये सनरायझर्स हैदराबाद आणि चेन्नई सुपर किंग्ज यांच्यात सामना होणार आहे. या सामन्यातील खेळपट्टी कशी असेल ते जाणून घेऊया.

आजही धावांचा पाऊस पडणार?

पॅट कमिन्सच्या नेतृत्वाखालील सनरायझर्स हैदराबादला आज ऋतुराज गायकवाडच्या नेतृत्वाखालील चेन्नई सुपर किंग्जचे आव्हान असणार आहे. याआधी या मोसमात हैदराबादच्या राजीव गांधी स्टेडियमवर सामना झाला तेव्हा दोन्ही संघांनी मिळून ५२३ धावा केल्या होत्या.त्या सामन्यात प्रथम फलंदाजी करताना हैदराबादने २० षटकात ३ गडी गमावून २७७ धावा केल्या होत्या. त्यानंतर फलंदाजीला आलेल्या मुंबई इंडियन्स संघानेही ५ गडी गमावून २४६ धावांपर्यंत मजल मारली होती. सामन्यादरम्यान केवळ ८ विकेट पडल्या.

हैदराबादची पीच फलंदाजांसाठी स्वर्ग

आता SRH आणि CSK चे संघ आमनेसामने येणार असल्याने गोलंदाजांची धुलाई होऊ शकते आणि धावांचा पाऊस पडू शकतो. आजच्या सामन्यातही गोलंदाजांना खेळपट्टीकडून क्वचितच मदत मिळेल, अशी अपेक्षा आहे. इथली सपाट खेळपट्टी फलंदाजांसाठी स्वर्ग मानली जाते. अशा स्थितीत वेगवान गोलंदाज काहीसा प्रभाव पाडू शकतील, पण कोणताही फलंदाज स्थिरावला तर गोलंदाज अडचणीत येऊ शकतात.

हैदराबाद वि. सीएसके सामना कधी, कुठे पाहणार?

सनरायझर्स हैदराबाद आणि चेन्नई सुपर किंग्स यांच्यात गुरुवारी (५ एप्रिल २०२४) आयपीएलमधील १८वा सामना खेळला जाईल. हा सामना हैदराबादच्या राजीव गांधी आंतरराष्ट्रीय स्टेडियमवर खेळला जाणार आहे. भारतीय वेळेनुसार, हैदराबाद आणि सीएसके यांच्यातील सामना सामना संध्याकाळी ७.३० वाजता सुरु होईल. 

यापूर्वी अर्धातास नाणेफेक होईल. हा सामना स्टार स्पोर्ट्सच्या वेगवेगळ्या चॅनेलवर हिंदी आणि इंग्रजीसह देशातील इतर भाषांमध्ये पाहू शकतो. जिओ सिनेमा ॲपवर या सामन्याचे लाईव्ह-स्ट्रीमिंग पाहता येईल. याशिवाय, https://marathi.hindustantimes.com/ वर सामन्याशी संबंधित बातम्या, लाइव्ह अपडेट्स आणि रेकॉर्डही वाचू शकता.

गुणातालिकेत हैदराबाद आणि सीएसके

आयपीएल २०२४ च्या गुणतालिकेत CSK ने आतापर्यंत तीनपैकी दोन सामने जिंकले आहेत आणि एक गमावला आहे. संघ सध्या ४ गुणांसह तिसऱ्या स्थानावर आहे. तर सनरायझर्स हैदराबादने तीन सामने खेळले असून, संघाने फक्त एकच जिंकला आहे आणि दोन सामन्यात पराभवाचा सामना करावा लागला आहे. 

या सामन्यातील विजयानंतर CSK ला टॉप दोनमध्ये प्रवेश करण्याची संधी असेल, तर SRH ला टॉप ४ मध्ये प्रवेश करण्याची संधी असेल. मात्र, हा सामना अत्यंत चुरशीचा आणि रंजक होणार हे जवळपास निश्चित दिसत आहे.

IPL_Entry_Point