आयपीएल 2025 पर्पल कॅप
ड्वेन ब्राव्होने २०१३ मध्ये एकाच मोसमात ३२ विकेट्ससह आणि २०१५ मध्ये २६ विकेट्ससह दोनदा पर्पल कॅप जिंकली होती. तर, भुवनेश्वर कुमारने २०१६ आणि २०१७ च्या आयपीएलमध्ये अनुक्रमे २३ आणि २६ विकेट्स घेऊन दोनदा पर्पल कॅप जिंकली.
इंडियन प्रीमियर लीगच्या पहिल्या मोसमाची पर्पल कॅप जिंकण्याचा मान पाकिस्तानच्या सोहेल तन्वीर याच्या नावावर आहे. तन्वीरने २००८ मध्ये आयपीएलच्या उद्घाटनाच्या मोसमात पर्पल कॅप जिंकली होती. त्याने त्यावर्षी २२ विकेट घेतल्या होत्या. तर आयपीएल २०२४ ची पर्पल कॅप हर्षल पटेल याने जिंकली. पंजाब किंग्सकडून खेळताना त्याने २४ विकेट काढल्या.
आतापर्यंत, २००८ ते २०२४ या दरम्यान एकाच मोसमात सर्वाधिक विकेट्स घेणाऱ्या गोलंदाजामध्ये ड्वेन ब्राव्हो आणि हर्षल पटेल यांचा समावशे आहे. दोघांनी एका मोसमात प्रत्येकी ३२ विकेट घेतल्या होत्या. ब्राव्होने २०१३ मध्ये सीएसकेकडून ३२ विकेट्स घेतल्या होत्या. तर हर्षल पटेलने २०२१ मध्ये आरसीबीकडून ३२ विकेट्स घेतल्या होत्या. या यादीत कागिसो रबाडा ३० विकेटसह दुसऱ्या स्थानावर आहे. रबाडाने २०२० मध्ये ३० विकेट घेतल्या होत्या.
पर्पल कॅप जिंकणाऱ्या खेळाडूंच्या यादीत सोहेल तन्वीर (२००८), आरपी सिंग (२००९), प्रज्ञान ओजा (२०१०), लसिथ मलिंगा (२०११), मोर्ने मॉर्केल (२०१२), मोहित शर्मा (२०१४), अँड्र्यू टाय (२०१८), इम्रान ताहिर (२०१९), कगिसो रबाडा (२०२०), हर्षल पटेल (२०२१, २०२४), युजुवेंद्र चहल (२०२२), मोहम्मद शमी (२०२३), ड्वेन ब्राव्हो (२०१३, २०१५), भुवनेश्वर कुमार (२०१६, २०१७) यांचा समावेश आहे.
Player | T | W | Avg | Ovr | R | BBF | EC | SR | 3w | 5w | Mdns |
---|---|---|---|---|---|---|---|---|---|---|---|
1 ![]() | ![]() | 24 | 19 | 49 | 477 | 3/15 | 9 | 12 | 4 | 0 | 0 |
2 ![]() | ![]() | 21 | 19 | 50 | 402 | 3/16 | 8 | 14 | 3 | 0 | 0 |
3 ![]() | ![]() | 20 | 16 | 51 | 336 | 5/21 | 6 | 15 | 3 | 1 | 0 |
4 ![]() | ![]() | 19 | 24 | 51 | 465 | 4/19 | 9 | 16 | 2 | 0 | 1 |
5 ![]() | ![]() | 19 | 20 | 42 | 383 | 3/24 | 9 | 13 | 2 | 0 | 1 |
6 ![]() | ![]() | 19 | 27 | 54 | 526 | 3/27 | 9 | 17 | 2 | 0 | 0 |
7 ![]() | ![]() | 19 | 26 | 50 | 505 | 4/29 | 10 | 15 | 1 | 0 | 0 |
8 ![]() | ![]() | 19 | 15 | 29 | 295 | 3/19 | 10 | 9 | 2 | 0 | 0 |
9 ![]() | ![]() | 18 | 31 | 61 | 566 | 3/43 | 9 | 20 | 1 | 0 | 1 |
10 ![]() | ![]() | 18 | 30 | 58 | 546 | 3/11 | 9 | 19 | 1 | 0 | 0 |
Standings are updated with the completion of each game
- T:Teams
- Wkts:Wickets
- Avg:Average
- R:Run
- EC:Economy
- O:Overs
- SR:Strike Rate
- BBF:Best Bowling Figures
- Mdns:Maidens
आयपीएल FAQs
A: आयपीएलमध्ये एका मोसमात सर्वाधिक विकेट घेणाऱ्या गोलंदाजाला पर्पल कॅप दिली जाते.
A: आयपीएलमध्ये आतापर्यंत ड्वेन ब्राव्हो, भुवनेश्वर कुमार आणि हर्षल पटेल यांनी सर्वाधिक वेळा म्हणजेच प्रत्येकी दोनवेळा पर्पल कॅप जिंकली आहे. ब्राव्होने २०१३, २०१५ मध्ये पर्पल कॅप जिंकली होती. तर तर भुवनेश्वर कुमारने २०१६, २०१७ मध्ये पर्पल कॅप जिंकली. तर हर्षल पटेल याने २०२१ आणि २०२४ मध्ये पर्पल कॅप जिंकली आहे.
A: आयपीएलच्या एका मोसमात सर्वाधिक विकेट घेणारे दोन खेळाडू आहेत. २०१३ मध्ये ड्वेन ब्राव्होने एकाच मोसमात ३२ विकेट घेतल्या होत्या. यानंतर २०२१ मध्ये हर्षल पटेलने ३२ विकेट्स घेऊन त्या विक्रमाची बरोबरी केली होती.
A: आयपीएल २०२४ ची पर्पल कॅप हर्षल पटेल याला मिळाली. त्याने पंजाब किंग्सकडून खेळताना २४ फलंदाज बाद केले.
A: आयपीएलमध्ये आतापर्यंत १३ गोलंदाजांना पर्पल कॅप मिळाली आहे. सोहेल तन्वीर हा आयपीएलची पहिली पर्पल कॅप जिंकणारा गोलंदाज आहे.