मराठी बातम्या / क्रीडा / आयपीएल /
आयपीएल 2025 खेळाडूंची आकडेवारी
इंडियन प्रीमियर लीगमध्ये दरवर्षी विविध पुरस्कारांचा वर्षाव होत असतो. आयपीएलच्या सुरुवातीपासून दरवर्षी, एका हंगामात सर्वाधिक धावा करणाऱ्या फलंदाजाला ऑरेंज कॅप दिली जाते. तर सर्वोत्तम गोलंदाजाला पर्पल कॅप प्रदान केली जाते. यासोबतच आयपीएलमध्ये अनेक पुरस्करांचा वितरण केले जाते. यामध्ये मोस्ट व्हॅल्युबल प्लेयर (MVP), इमर्जिंक प्लेयर ऑफ द सीझन, अल्टीमेट फँटसी प्लेयर ऑफ द सीझन, सर्वाधिक षटकार मारणारा फलंदाज, सर्वाधिक चौकार मारणारा फलंदाज, सर्वोत्तम स्ट्राईक रेट असणारा फलंदाज, सर्वोत्त झेल यांसारख्या पुरस्कारांचा समावेश आहे.
आयपीएलमध्ये आतापर्यंत एकूण १३ खेळाडूंनी सर्वाधिक धावा करण्यासाठी दिली जाणारी ऑरेंज कॅप जिंकली आहे. यामध्ये डेव्हिड वॉर्नर याने ही कॅप तीनदा जिंकण्याचा मान मिळवला आहे. तसेच, आयपीएलमध्ये आतापर्यंत १३ गोलंदाजांनी सर्वाधिक विकेटसाठी दिली जाणारी पर्पल कॅप जिंकली आहे. यामध्ये ड्वेन ब्राव्हो, भुवनेश्वर कुमार, हर्षल पटेल यांनी तीनदा ही कॅप जिंकली आहे. यानंतर विराट कोहली हा एका आयपीएल मोसमात सर्वाधिक धावां करणारा फलंदाज आहे. कोहलीने २०१६ च्या मोसमात रॉयल चॅलेंजर्स बंगलोर संघासाठी ९७३ धावा केल्या होत्या. यानंतर गेल्या गुजरात टायटन्सकडून खेळणारा शुभमन गिल कोहलीच्या जवळ पोहोचला होता. गिलने आयपीएल २०२३ मध्ये १६ सामन्यांमध्ये ८९० धावा केल्या होत्या. आयपीएल २०२४ मध्ये अभिषेक शर्मा (४२) याने सर्वाधिक षटकार मारले होते. तर ट्रेव्हिस हेडने (६४) चौकार मारले होते. दोघेही सनरायझर्स हैदराबादचे खेळाडू आहेत.

सर्वोत्तम स्कोअर
SR: स्ट्राइक रेट, match: सामने, INN: डाव, NO: नाबाद, HS: सर्वोच्च धावसंख्या, AV: सरासरी, RS: धावा केल्या, vs team: संघा विरुद्ध BF: चेंडूचा सामना केला, TS: संघाची धावसंख्या, BBF: सर्वोत्कृष्ट बॉलिंग फिगर्स, Wkts: विकेट्स, RG: किती धावा दिल्या, Ovr: षटकं, Mdns: निर्धाव षटकं, EC: इकॉनॉमी, T-SC: संघाच्या धावा, Vnu: स्थळ.
आयपीएल FAQs
Q : आयपीएलमध्ये आतापर्यंत सर्वाधिक धावा कोणी केल्या आहेत?
A : आयपीएलमध्ये सर्वाधिक धावा (८,००४) आणि सर्वाधिक शतके (८) करण्याचा विक्रम विराट कोहलीच्या नावावर आहे.
Q : आयपीएलमध्ये सर्वोच्च स्ट्राइक रेट कोणाच्या नावे आहे?
A : आयपीएलमध्ये सर्वोच्च स्ट्राइक रेट आंद्रे रसेलचा आहे. त्याने आतापर्यंत १७४ च्या स्ट्राइक रेटने फलंदाजी केली आहे.
Q : आयपीएल २०२४ मध्ये सर्वाधिक षटकार कोणत्या फलंदाजाने मारले?
A: आयपीएल २०२४ मध्ये सर्वाधिक षटकार अभिषेक शर्मा (४२) याने सर्वाधिक षटकार मारले. तर ट्रेव्हिस हेडने (६४) सर्वाधिक चौकार मारले . दोघेही सनरायझर्स हैदराबादचे खेळाडू आहेत.
Q : आयपीएलमध्ये आतापर्यंत सर्वाधिक षटकार कोणत्या फलंदाजाने मारले आहेत?
A: आयपीएलमध्ये आतापर्यंत ख्रिस गेलने सर्वाधिक (३५७) षटकार मारले आहेत. ख्रिस गेलने एकूण १४२ यपीएल सामने खेळले.