आयपीएल २०२४ वेळापत्रक - HT मराठी

आयपीएल वेळापत्रक 2024

आयपीएलच्या सुरुवातीपासून दरवर्षी, एका हंगामात सर्वाधिक धावा करणाऱ्या फलंदाजाला ऑरेंज कॅप दिली जाते. आतापर्यंत आयपीएलचे १६ हंगाम झाले आहेत. यामध्ये एकूण १३ खेळाडूंनी ही ऑरेंज कॅप जिंकली. डेव्हिड वॉर्नरने ही कॅप तीनदा जिंकण्याचा मान मिळवला आहे.

आयपीएलमध्ये आतापर्यंत २००८ ते २०१६ पर्यंत म्हणजेच १६ हंगामात १३ खेळाडूंना ऑरेंज कॅप मिळाली आहे. विराट कोहलीने एका मोसमात सर्वाधिक धावां करण्याचा विक्रम केाला . २०१६ च्या मोसमात त्याने रॉयल चॅलेंजर्स बंगलोर संघासाठी एकट्याने ९७३ धावा केल्या. यानंतर गेल्या गुजरात टायटन्सकडून खेळणारा शुभमन गिल कोहलीच्या जवळ पोहोचला होता. गिलने आयपीएल २०२३ मध्ये १६ सामन्यांमध्ये ८९० धावा केल्या होत्या.
सामनेतारीखवेळठिकाण

आयपीएल ताज्या बातम्या

आयपीएल FAQs

आयपीएल २०२४ मध्ये एकूण किती सामने होणार आहेत?

आयपीएल २०२४ मध्ये एकूण ७४ सामने होणार आहेत. साखळी फेरीत ७० सामने आणि प्लेऑफमध्ये ४ सामने होतील.

आयपीएल २०२४ मधील लीग स्टेजचे स्वरूप काय असेल?

आयपीएल २०२४ मध्ये दहा संघ एकमेकांना दोनदा भिडतात. संघ एक सामना आपल्या होम ग्राउंडवर खेळतो तर त्याच संघाविरुद्ध दुसरा सामना विरोधी संघाच्या होम ग्राउंडवर खेळतो. अशाप्रकारे आयपीएलचा एक संघ संपूर्ण स्पर्धेत १४ सामने खेळतो. यानंतर लीग टप्प्यात गुणतालिकेतील टॉप ४ संघ प्लेऑफसाठी पात्र ठरतात.

आयपीएल २०२४ मध्ये किती संघ खेळणार आहेत?

आयपीएल २०२४ मध्ये एकूण १० संघ खेळत आहेत. यात चेन्नई सुपर किंग्ज, मुंबई इंडियन्स, सन रायझर्स हैदराबाद, रॉयल चॅलेंजर्स बंगलोर, कोलकाता नाइट रायडर्स, दिल्ली कॅपिटल्स, पंजाब किंग्स, राजस्थान रॉयल्स, लखनौ सुपर जायंट्स, गुजरात टायटन्स या संघांचा समावेश आहे.