आयपीएल २०२४ ऑरेंज कॅप
आयपीएल २०२४ ऑरेंज कॅप: आयपीएलच्या सुरुवातीपासून दरवर्षी, एका हंगामात सर्वाधिक धावा करणाऱ्या फलंदाजाला ऑरेंज कॅप दिली जाते. आतापर्यंत आयपीएलचे १६ हंगाम झाले आहेत. यामध्ये एकूण १३ खेळाडूंनी ही ऑरेंज कॅप जिंकली. डेव्हिड वॉर्नरने ही कॅप तीनदा जिंकण्याचा मान मिळवला आहे.
आयपीएलमध्ये आतापर्यंत २००८ ते २०१६ पर्यंत म्हणजेच १६ हंगामात १३ खेळाडूंना ऑरेंज कॅप मिळाली आहे. डेव्हिड वॉर्नरने तीनदा ऑरेंज कॅप जिंकली आहे. यात शॉन मार्श (२००८), मॅथ्यू हेडन (२००९), सचिन तेंडुलकर (२०१०), मायकेल हसी (२०१३), रॉबिन उथप्पा (२०१४), विराट कोहली (२०१६), केन विल्यमसन (२०१८), केएल राहुल (२०२०) यांचा समावेश आहे. तसेच, ऋतुराज गायकवाड (२०२१), जोस बटलर (२०२२), शुभमन गिल (२०२३), यांनीही ऑरेंज कॅप जिंकली आहे. तर ख्रिस गेल (२०११, २०१२), आणि डेव्हिड वॉर्नर (२०१५, २०१७, २०१९) यांनीही एकपेक्षा अधिकवेळा ऑरेंज कॅफ जिंकली आहे.
वॉर्नरला २०१५ , २०१७, २०१९ या हंगामात लीगमध्ये सर्वाधिक धावा करणारा फलंदाज म्हणून ऑरेंज कॅप मिळाली. या तीन हंगामात तो सन रायझर्स हैदराबाद संघाकडून खेळला. दरम्यान, युनिव्हर्स बॉस ख्रिस गेलने २०११ आणि २०१२ मध्ये दोनदा ऑरेंज कॅप जिंकली होती. त्या दोन हंगामात त्याने अनुक्रमे ६०८, ७३३ धावा केल्या होत्या.
यानंतर विराट कोहलीने एका मोसमात सर्वाधिक धावां करण्याचा विक्रम केाला . २०१६ च्या मोसमात त्याने रॉयल चॅलेंजर्स बंगलोर संघासाठी एकट्याने ९७३ धावा केल्या. यानंतर गेल्या गुजरात टायटन्सकडून खेळणारा शुभमन गिल कोहलीच्या जवळ पोहोचला होता. गिलने आयपीएल २०२३ मध्ये १६ सामन्यांमध्ये ८९० धावा केल्या होत्या.
आयपीएल २०२४ मध्ये ऑरेंज कॅप जिंकण्याच्या शर्यतीत वॉर्नर, कोहली, केएल राहुल, गिल, ऋतुराज, बटलर यांसारख्या फलंदाजांचा समावेश आहे.
Player | T | R | SR | Mat | Inn | NO | HS | Avg | 30s | 50s | 100s | 6s |
---|---|---|---|---|---|---|---|---|---|---|---|---|
1 ![]() | ![]() | 741 | 154 | 15 | 15 | 3 | 113* | 61 | 4 | 5 | 1 | 38 |
2 ![]() | ![]() | 583 | 141 | 14 | 14 | 3 | 108* | 53 | 3 | 4 | 1 | 18 |
3 ![]() | ![]() | 573 | 149 | 16 | 14 | 3 | 84* | 52 | 5 | 4 | 0 | 33 |
4 ![]() | ![]() | 567 | 191 | 15 | 15 | 1 | 102 | 40 | 3 | 4 | 1 | 32 |
5 ![]() | ![]() | 531 | 153 | 16 | 15 | 4 | 86 | 48 | 1 | 5 | 0 | 24 |
6 ![]() | ![]() | 527 | 141 | 12 | 12 | 1 | 103 | 47 | 7 | 2 | 1 | 16 |
7 ![]() | ![]() | 520 | 136 | 14 | 14 | 0 | 82 | 37 | 3 | 4 | 0 | 19 |
8 ![]() | ![]() | 499 | 178 | 14 | 14 | 6 | 75 | 62 | 6 | 3 | 0 | 36 |
9 ![]() | ![]() | 488 | 180 | 15 | 14 | 0 | 109 | 34 | 1 | 3 | 1 | 33 |
10 ![]() | ![]() | 484 | 204 | 16 | 16 | 1 | 75* | 32 | 5 | 3 | 0 | 42 |
Standings are updated with the completion of each game
- T:Teams
- Wkts:Wickets
- Avg:Average
- R:Run
- EC:Economy
- O:Overs
- SR:Strike Rate
- BBF:Best Bowling Figures
- Mdns:Maidens
आयपीएल FAQs
A: आयपीएलमध्ये एका मोसमात सर्वाधिक धावा करणाऱ्या खेळाडूला ऑरेंज कॅप दिली जाते.
A: डेव्हिड वॉर्नरने आयपीएलच्या इतिहासात तीनदा ऑरेंज कॅप जिंकली आहे. वॉर्नरने २०१५, २०१७, २०१९ हंगामात ऑरेंज कॅप जिंकली होती.
A: आयपीएल एका हंगामात सर्वाधिक धावा करणारा खेळाडू विराट कोहली आहे. विराटने २०१६ च्या मोसमात ९७३ धावा केल्या होत्या. त्याच्यानंतर २०२३ मध्ये शुभमन गिलने ८९० धावा केल्या होत्या.
A: आयपीएलमध्ये आतापर्यंत २००८ ते २०१६ पर्यंत म्हणजेच १६ हंगामात १३ खेळाडूंना ऑरेंज कॅप मिळाली आहे. डेव्हिड वॉर्रनरे तीनदा ऑरेंज कॅप जिंकली आहे. यात शॉन मार्श (२००८), मॅथ्यू हेडन (२००९), सचिन तेंडुलकर (२०१०), मायकेल हसी (२०१३), रॉबिन उथप्पा (२०१४), विराट कोहली (२०१६), केन विल्यमसन (२०१८), केएल राहुल (२०२०) यांचा समावेश आहे. तसेच, ऋतुराज गायकवाड (२०२१), जोस बटलर (२०२२), शुभमन गिल (२०२३), यांनीही ऑरेंज कॅप जिंकली आहे. तर ख्रिस गेल (२०११, २०१२), आणि डेव्हिड वॉर्नर (२०१५, २०१७, २०१९) यांनीही एकपेक्षा अधिकवेळा ऑरेंज कॅफ जिंकली आहे.