हत्ती आणि मानव यादरम्यानचे नाते खूप वेगवेगळ्या प्रकारचे असते. नागरिकांच्या संपर्कात आलेले हत्ती अनेकदा आदेशाचे पालन करताना, आज्ञा पाळताना दिसतात. तर कधी अनेकदा देशाच्या विविध भागांत जंगली हत्ती आणि ग्रामस्थांमध्ये संघर्ष होत असताना आपण पाहत असतो. परंतु केरळात एक हत्ती गावकऱ्यांसोबत चक्क क्रिकेट खेळतानाचा व्हिडिओ सध्या भलताच व्हायरल झाला आहे. या हत्तीबाबत अनेक प्रकारचे मिम्स तयार होत असून लोकांच्या प्रतिक्रिया व्यक्त होत आहेत.
‘रेडिट’ या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर हा व्हिडिओ पोस्ट करण्यात आला असून यात एक हत्ती क्रिकेट खेळताना दिसतो आहे. अवाढव्य गजराजचे क्रीडाप्रेम दर्शवणारा हा गोड व्हिडिओ अपेक्षेप्रमाणे प्रचंड व्हायरल झाला असून सोशल मीडियावर हा व्हिडिओ पाहून लोक आनंद घेत आहेत. सध्या सोशल मीडियावर माणसांसोबत प्राणी वेगवेगळे खेळ खेळतानाचे मनमोहक व्हिडिओ व्हायरल होत आहेत.
या व्हिडिओच्या कॅप्शनवरून हा व्हिडिओ केरळमध्ये रेकॉर्ड करण्यात आल्याचे दिसून येत आहे. रेडिट प्लॅटफॉर्मवर व्हिडिओमध्ये एक हत्ती आपल्या सोंडेने बॅट धरून मैदानाच्या कडेला उभा असल्याचे दिसत आहे. एक माणूस गोलंदाजी करतो आणि महाकाय गजराज एकही थाप न चुकवता शॉट घेत असल्याचं या व्हिडिओमध्ये पहायला मिळतो.
हत्ती क्रिकेट खेळत असल्याचा व्हिडिओ शेअर झाल्यापासून आतापर्यंत ६,१०० हून अधिक लोकांनी शेअर केला असून लोकांच्या कमेंट्सही येत आहेत.
हत्ती क्रिकेट खेळत असल्याचा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर अनेक प्रकारच्या कॉमेंटस येत आहेत. सध्या आयपीएलचा हंगाम सुरू आहे. आयपीएलमधील संघाच्या कामगिरीचा संदर्भ देत एका युजरने गमतीने म्हटलय की, ‘तो (हत्ती) रॉयल चॅलेंजर्स बेंगळुरूला (RCB)ला सहज वाचवू शकतो.’
या व्हिडिओवर वेगवेगळ्या यूजर्सच्या आलेल्या प्रतिक्रियाः
‘उत्तम तंत्र. उत्तम ट्रंक (सोंड)-आय कोऑर्डिनेशन सुद्धा आहे’
‘स्टंपच्या मागे आणि क्रीजसमोर एकाच वेळी उभे राहू शकणारे जगातील फलंदाजच आहेत.’
‘ईपीएल (एलिफंट प्रीमियर लीग) सुरू करण्याची वेळ आली आहे..'
‘हे खूप छान आहे…’
यापूर्वी एक कुत्रा आपल्या मालकासोबत व्हॉलीबॉल खेळतानाचा व्हिडिओ व्हायरल झाला होता. कुत्र्याच्या चेंडू हाताळण्याच्या पद्धतीमुळे अनेकांना आश्चर्याचा धक्का बसला. व्हिडिओमध्ये कुत्रा इतर मानवी खेळाडूंसोबत कौशल्याने चेंडू पुढे-मागे उडवत असल्याचं दिसत होतं.
संबंधित बातम्या