मराठी बातम्या  /  देश-विदेश  /  लग्न समारंभात नववधू-वरांना आशिर्वाद देण्यास आलेल्या भाजप सरकारमधील मंत्र्यांला जमावाकडून मारहाण, VIDEO व्हायरल

लग्न समारंभात नववधू-वरांना आशिर्वाद देण्यास आलेल्या भाजप सरकारमधील मंत्र्यांला जमावाकडून मारहाण, VIDEO व्हायरल

Shrikant Ashok Londhe HT Marathi
Apr 22, 2024 08:26 PM IST

Viral Video : एका लग्नसमारंभात वधू-वरांच्या समोरच भाजप सरकारमधील मंत्र्यांवर लोकांनी हल्ला करत त्यांची धुलाई केली. मारहाणीनंतर बेशुद्धावस्थेत त्यांनी रुग्णालयात दाखल केले गेले.

भाजप मंत्र्यांला जमावाकडून मारहाण, VIDEO व्हायरल
भाजप मंत्र्यांला जमावाकडून मारहाण, VIDEO व्हायरल

उत्तरप्रदेश राज्यातील संतकबीरनगर जिल्ह्यात रविवारी रात्री योगी सरकारमधील मंत्री संजय निषाद (minister sanjay nishad attacked) यांच्यावर हल्ला झाला. या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. व्हायरल व्हिडिओ एक लग्न समारंभातील असून लोकांची गर्दी दिसत आहे. व्हिडिओमध्ये दिसते की, लग्नाच्या विधीची तयारी सुरू आहे. स्टेजवर वधू-वर उपस्थित आहेत. दरम्यान कार्यक्रमात गोंधळाचा आवाज येतो.

ट्रेंडिंग न्यूज

लोकांनी मागे वळून पाहिल्यावर दिसते की, काही लोकांनी यूपी सरकारचे मंत्री संजय निषाद यांच्यावर हल्ला केला आहे. त्यांच्या सुरक्षा रक्षकांनी मंत्र्यांना लोकांच्या तावडीतून कसेबसे सोडवले. मंत्र्यावर झालेल्या हल्ल्याचा कोणीतरी व्हिडिओ बनवला व सोशल मीडियावर व्हायरल केला. या हल्ल्यात मंत्री संजय निषाद जखमी झाले आहेत. त्यांना थेट रुग्णालयात दाखल करण्यात आले. घटनेनंतर मंत्री संजय निषाद यांनी पोलिसात तक्रार दाखल केली आहे. या तक्रारीच्या आधारे पोलिसांनी आठ लोकांविरोधात व अन्य अनेक अज्ञात लोकांविरोधात हत्येचा प्रयत्न व मारहाणीचा गुन्हा दाखल करत तीन लोकांना ताब्यात घेतले आहे.

मंत्र्यांकडून दाखल तक्रारीत म्हटले आहे की, मंत्री संजय निषाद मोहम्मदपूर कठार येथे एका लग्न समारंभात सामील होण्यासाठी गेले होते. त्यावेळी सरपंच राधेश्याम यादव व अन्य लोकांनी अचानक हल्ला केला. त्यांच्या स्टाफने त्यांना लोकांच्या तावडीतून सोडवून त्यांना रुग्णालयात दाखल केले. मारहाणात मंत्री बेशुद्ध झाले होते.

या हल्ल्यानंतर संजय निषाद यांनी म्हटले की, काही लोक खासदार प्रवीण निषाद आणि निषाद पार्टीविषयी अश्लील शब्दांचा वापर करत होते. त्यांना समजावण्याच्या प्रयत्न केल्यावर त्यांनी आक्रमक होत मंत्री व समर्थकांवर हल्ला केला. याची माहिती मिळताच खासदार प्रवीण निषाद आणि पक्षाचे तीन आमदार जिल्हा रुग्णालयात दाखल झाले. त्यांनी हल्लेखोरांवर तत्काळ कारवाईची मागणी केली.

समाजवादी पार्टीवर आरोप -

आपल्यावर झालेल्या हल्ल्यासाठी मंत्री संजय निषाद यांनी समाजवादी पक्षाच्या कार्यकर्त्यांवर आरोप केले आहेत. त्यांनी म्हटले की, ते निषाद व अन्य जात समुहांचे नेतृत्व करत आहे. यामुळे समाजात जनजागृती होत असून सपचे पतन होत आहे. सपकडून जातीय सघर्ष भडकवण्याचा प्रयत्न केला जात आहे. आमच्या अन्य नेत्यांवरही अशाच प्रकारचे हल्ले करण्यात आले आहेत.

IPL_Entry_Point