Nitrogen Smoked Biscuit News: मुले नवीन गोष्टींकडे खूप लवकर आकर्षित होतात. सध्या मुलांमध्ये नायट्रोजन स्मोक्ड बिस्किटांची प्रचंड क्रेझ आहे. परंतु, तुमच्याही मुलांना स्मोक्ड बिस्कीट खायला आवडत असेल तर, वेळीच सावध व्हा. चेन्नईच्या तामिळनाडू येथे स्मोक्ड बिस्किट खाल्ल्याने एका चिमुकल्याचा मृत्यू झाल्याचे सांगण्यात येत आहे. या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहे, ज्यात मुलगा नायट्रोजन स्मोक बिस्किट खाताना दिसतो. मात्र, काही क्षणातच त्याची तब्येत बिघडते. या घटनेचा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर पालकांमध्ये भितीजनक वातावरण निर्माण झाले आहेत.
सोशल मीडियावर व्हायरल होत असलेल्या व्हिडिओमध्ये लहान मुलगा नायट्रोजन स्मोक्ड बिस्किट खाताना दिसतो. मात्र, बिस्किट खाल्ल्यानंतर या मुलाची तब्येत बिघडते आणि तो रडू लागतो. मुलाला नेमका कशाचा त्रास होत आहे, हे समजण्याच्या आधीच त्याचा मृत्यू होतो.
@mohandreamer या ट्विटर हँडलवरून हा व्हिडिओ शेअर करण्यात आला आहे. या व्हिडिओच्या कॅप्शनमध्ये अशा नायट्रोजन स्मोक्ड बिस्किटांच्या विक्रीवर बंदी घालण्याची मागणी करण्यात आली आहे. स्मोक्ड बिस्किट पाहून लहान मुले त्याकडे आकर्षित होतात आणि ते खायला आतुर होतात. स्मोक्ड बिस्किट शरिरासाठी हानीकारक असून तामिळनाडू सरकारने यावर बंदी घालावी, अशी मागणी केली जात आहे.

काही लोकांचा असा दावा आहे की तामिळनाडू सरकारने चेन्नई येथे नुकत्याच झालेल्या सरकारी मेळ्यात असे दोन स्टॉल उभारण्याची परवानगी दिली होती. या व्हायरल व्हिडीओच्या उगमस्थानाबाबत कोणतीही ठोस माहिती मिळालेली नसली तरी हा व्हिडिओ मोठ्या प्रमाणात शेअर केला जात आहे.
साध्या बिस्किटमध्ये नायट्रोजन लिक्विड टाकले जाते आणि ते एकत्रित केले जाते. त्यानंतर तोंडात टाकताच तोंड धुराने भरले जाते. काही मिनिटे फिरवले जाते आणि नंतर ते तोंडात टाकताच संपूर्ण तोंड धुराने भरले जाते. या दुकानदाराच्या मते नायट्रोजनचे तापमान १९६ सेल्सिअस असते, जे आरोग्यासाठी हानीकारक नाही. परंतु, मुलाच्या मृत्युनंतर अनेक प्रश्न उपस्थित केले जात आहेत.
संबंधित बातम्या