मराठी बातम्या  /  देश-विदेश  /  Viral News: चॉकलेट खाऊन दीड वर्षाच्या मुलीला रक्ताच्या उलट्या, तपासात धक्कादायक माहिती उघड!

Viral News: चॉकलेट खाऊन दीड वर्षाच्या मुलीला रक्ताच्या उलट्या, तपासात धक्कादायक माहिती उघड!

Ashwjeet Rajendra Jagtap HT Marathi
Apr 20, 2024 05:58 PM IST

Patiala Expired Chocolates News: पंजाबच्या लुधियाना येथे चॉकलेट खाल्ल्याने दीड वर्षाच्या मुलीला रक्ताच्या उलट्या झाल्याने परिसरात खळबल माजली.

पंजाबमध्ये मुदत संपलेले चॉकलेट खाल्ल्याने दीड वर्षाच्या मुलीला रक्ताच्या उलट्या झाल्या.
पंजाबमध्ये मुदत संपलेले चॉकलेट खाल्ल्याने दीड वर्षाच्या मुलीला रक्ताच्या उलट्या झाल्या. (Unsplash)

Panjab chocolates News: पंजाबमध्ये चॉकलेट खाल्ल्यानंतर दीड वर्षाच्या मुलीला रक्ताच्या उलट्या झाल्याने एकच खळबळ माजली. या मुलीवर जवळच्या रुग्णालयात उपचार सुरू आहेत. या घटनेची माहिती मिळताच अधिकारी ज्या दुकानातून चॉकलेट खरेदी केले, तिथे पोहोचले. याप्रकरणी अधिक तपास केला असता चॉकलेट एक्सपायरी डेटचे असल्याचे आढळून आले. या घटनेने परिसरात एकच खळबळ माजली.

ट्रेंडिंग न्यूज

रविया असे रुग्णालयात उपचार सुरू असलेल्या मुलीचे नाव असून ती लुधियाना येथील रहिवाशी आहे. नातेवाईकांनी दिलेल्या माहिती माहितीनुसार, काही दिवसांपूर्वी रविया त्यांच्या कुटुंबांसोबत पाटियाला येथे गेली होती, जिथे तिने एका दुकानातून चॉकलेट खरेदी केली. घरी परतल्याने तिने चॉकलेट खाल्ले. मात्र, काही वेळाने तिला उलटीचा त्रास होऊ लागला.

odisha boat accident : प्रवाशांनी भरलेली बोट महानदीत बुडाली! ८ जणांचा मृत्यू, आतापर्यंत ७ मृतदेह सापडले!

त्यावेळी नातेवाईकांना सुरुवातीला घरच्यांना वाटले की ही एक सामान्य गोष्ट आहे. परंतु, मुलीची प्रकृती सतत खराब होत गेली. २२ वर्षांच्या मुलीनेही चॉकलेट खाल्ल्याने तिचीही प्रकृती बिघडली. यानंतर घरच्यांना संशय आल्याने त्यांनी मुलीला तातडीने डॉक्टरांकडे नेले. मात्र, मुलीची प्रकृती गंभीर झाल्याने डॉक्टरांनी संबंधित मुलीला सीएमसी रुग्णालयात दाखल केले, जिथे तिच्यावर उपचार सुरू आहेत.

SC to Baba Ramdev : योगातून कमावलेल्या पैशावर कर भरावा लागणार; सुप्रीम कोर्टाचा रामदेव बाबांच्या पतंजलीला आणखी एक झटका

याबाबत माहिती मिळाल्यानंतर नातेवाईक पुन्हा त्याच चॉकलेटच्या दुकानात गेला. तिथे एक्स्पायरी डेटचा माल आढळून आला. हा प्रकार कळताच त्याने आरोग्य विभागाकडे तक्रार करण्यात आली. यानंतर ते आरोग्य अधिकाऱ्यांच्या पथकासह त्या मिठाईच्या दुकानात गेले. त्यानंतर त्यांनी एक्सपायरी डेटचा सर्व माल जप्त केला. यानंतर पोलिसांनाही तेथे पाचारण करण्यात आले. पोलिसांनी कुटुंबीयांचे जबाब नोंदवले, त्यानंतर या प्रकरणाचा तपास सुरू आहे. मुदत संपलेल्या मालाच्या विक्रीची तपासणी आरोग्य विभागाने सुरू केली आहे.

केके खाऊन ११ वर्षाच्या मुलीची हत्या

पंजाबच्या काही पटियालामध्ये काही दिवसांपूर्वी केक खाऊन एका अकरा वर्षाच्या मुलीचा मृत्यू झाला होता. मृत मुलीने वाढदिवसानिमित्त तिच्या आई वडिलांनी ऑनलाईन केक ऑर्डर केला. मात्र, हा केक खाल्ल्यानंतर मुलीची तब्येत बिघडली आणि उपचारदरम्यान त्यांच मृत्यू झाला. या घटनेने परिसरात एकच खळबळ माजली.

IPL_Entry_Point

विभाग