मराठी बातम्या  /  देश-विदेश  /  hariyana crime : पोलीस कागदपत्रांच्या कामात गुंतले असल्याचा फायदा घेत कैद्यांनी व्हॅनमध्ये केला महिलेवर बलात्कार!

hariyana crime : पोलीस कागदपत्रांच्या कामात गुंतले असल्याचा फायदा घेत कैद्यांनी व्हॅनमध्ये केला महिलेवर बलात्कार!

Ninad Vijayrao Deshmukh HT Marathi
Apr 19, 2024 04:03 PM IST

haryana crime : जिंद पोलिसठाण्यात दाखल केलेल्या तक्रारीत पीडितेने म्हटले आहे की, आरोपींनी पीडितेला शीतपेयातून गुंगीचे औषध दिले. यानंतर व्हॅनमध्येच दोघांनी पीडितेवर बलात्कार केला.

 पोलीस कागदपत्रांच्या कामात गुंतले असल्याचा फायदा घेत कैद्यांनी व्हॅनमध्ये केला महिलेवर बलात्कार!
पोलीस कागदपत्रांच्या कामात गुंतले असल्याचा फायदा घेत कैद्यांनी व्हॅनमध्ये केला महिलेवर बलात्कार!

haryana rape crime : हरियाणातून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. पोलीस व्हॅनमध्येच एका महिला कैद्यावर दोन कैद्यांनी बलात्कार केल्याची घटना घडली आहे. पोलीस कर्मचारी कागदपत्राशी संबंधित कामात गुंतले असताना कैद्यांनी बलात्कार केल्याची घटना घडली. सध्या दोन्ही आरोपींविरुद्ध कलम ३७६ अन्वये शून्य एफआयआर अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. रोहतक पोलीस या प्रकरणाचा अधिक तपास करत आहेत.

MP Rape Crime : गोंदाने ओठ चिकटवले; जखमांवर तिखट टाकले! नराधम शेजाऱ्याचा तरुणीवर महिनाभर बलात्कार

पीडितेने दिलेल्या तक्रारीनुसार तिच्यावर रोहतक पोस्ट ग्रॅज्युएट इन्स्टिट्यूट ऑफ मेडिकल सायन्सेस म्हणजेच पीजीआयएमएसमध्ये उपचार सुरू होते, त्यामुळे पोलीस तिला तिथे घेऊन गेले. कैद्यांना नेण्यात आलेल्या गाडीत महिला कैदीसह आणखी दोन कैद्यांना देखील नेण्यात आले होते. रिपोर्टनुसार, पीडितेचे म्हणणे आहे की उपचारानंतर पोलिस कागदपत्रांमध्ये व्यस्त होते.

Ekagrah Murthy : इन्फोसिसच्या एका निर्णयामुळं नारायण मूर्ती यांचा ५ महिन्यांचा नातू एकाग्रला मिळणार ४.२ कोटी रुपये

जिंद पोलिसात दाखल केलेल्या तक्रारीत पीडितेने म्हटले आहे की, 'दरम्यान, आरोपीने पीडितेला शीतपेयातून गुंगीचे औषध दिले. यानंतर दोघांनी व्हॅनमध्ये महिलेवर बलात्कार केला. व्हॅनसोबत असलेले सुरक्षा कर्मचारी पीडितेवर अत्याचार होत असतांना कागदपत्रांच्या प्रक्रियेत व्यस्त होते. कैद्यांनी याचा फायदा घेत तिच्यावर अत्याचार केला. या प्रकरणी एफआयआर रोहतक पोलिसांनाही पाठवण्यात आला आहे.

सध्या पोलीस पीडितेने केलेल्या आरोपांचा तपास करत आहेत. एफआयआरमध्ये गुन्ह्याची तारीख नमूद नसल्याची माहिती आहे. वृत्तानुसार, सूत्रांनी पुष्टी केली आहे की १० वर्षांची शिक्षा भोगत असलेल्या महिला कैदीवर रोहतक पीजीआयएमएसमध्ये उपचार सुरू आहेत. यापूर्वी तिने मानसिक तणावामुळे आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला होता.

IPL_Entry_Point

विभाग