MP Rape Crime : मध्य प्रदेशातील गुना जिल्ह्यातील एका गावात शेजाऱ्याने एका महिलेचे अहपहरण करून तिच्यावर अमानुषपणे बलात्कार केल्याची लाजिरवाणी घटना समोर आली आहे. आरोपींना महिलेची वडिलोपार्जित मालमत्ता हडप करायची होती. आरोपीने तरुणीने आरडा ओरडा करू नये यासाठी तिचे ओठ गोंदाने चिटकवले होते. आरोपी ऐवढ्यावरच थांबला नाही तर तिला गंभीर मारहाण करून तिच्या जखमांवर तिखट आणि मीठ टाकून तिचा अमानुषपणे छळ केला. पीडितेने तिची कशीबशी सुटका करून पोलिस ठाणे गाठले. यानंतर तिच्या तक्रारीवरून पोलिसांनी आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल करून त्याला अटक केली आहे.
गुरुवारी याबाबत माहिती देताना पोलिसांनी सांगितले की, गुना येथील एका २३ वर्षीय महिलेवर शेजाऱ्याने महिनाभर बलात्कार करून तिच्यावर अत्याचार केले. पीडितेने सांगितले की, आरोपी तिच्याशी जबरदस्तीने लग्न करू इच्छित होता तसेच तिच्या वडिलोपार्जित मालमत्तेच्या कागदपत्रांवर स्वाक्षरी करून त्याला तिची संपत्ती ही त्याच्या नावावर करायची होती.
यामुळे आरोपीने तिचे अपहरण केले. तिला ओलिस ठेवले. तिच्यावर महिनाभर बलात्कार केला. लैंगिक अत्याचार केले, ऐवढेच नाही तर तिला बेल्टने व पाण्याच्या पाईपने मारहाण केली. असे टाइम्स ऑफ इंडियाने वृत्त दिले आहे. आरोपीने तिच्या जखमेवर मिरची पावडर चोळली. ती किंचाळू नये म्हणून तिचे ओठ गोंदाने बंद केले. पीडित महिला तिच्या आईसोबत गुनाच्या बाहेरील गावात राहते.
पीडितेने सांगितले की, एक महिन्यापूर्वी आरोपीने तिला बळजबरीने आपल्या घरी ओढले, जिथे त्याने तिला एका खोलीत बंद केले. त्याला बाहेर जाण्याची किंवा कोणाशीही बोलण्याची परवानगी नव्हती. मंगळवारी रात्री ती कशीतरी त्याच्या तावडीतून सुटण्यात यशस्वी झाली. पीडितेने कँट पोलिस स्टेशन गाठण्यासाठी आणि पोलिसांची मदत घेण्यासाठी रात्रभर ५ किलोमीटरचा प्रवास केला.
पीडित महिलेची अवस्था पाहून खुद्द पोलीसही हादरले तिचे ओठ गोंदाने चिकटवले होते. तिचा शरीरावर अनेक जखमा होत्या. तर तिचे डोळे सुजले होते. पोलिसांनी आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल करून त्याला अटक केली आहे. पोलिसांनी सांगितले की त्याच्यावर बलात्कार आणि जीवे मारण्याचा प्रयत्न केल्या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
संबंधित बातम्या