मराठी बातम्या  /  निवडणुका  /  Lok sabha Election 1 phase voting live: राज्यात सकाळी ११ पर्यंत १९ टक्के मतदानाची नोंद; भर उन्हात मतदारांचा उत्साह कायम

Lok sabha Election 1 phase voting live: राज्यात सकाळी ११ पर्यंत १९ टक्के मतदानाची नोंद; भर उन्हात मतदारांचा उत्साह कायम

Ninad Vijayrao Deshmukh HT Marathi
Apr 19, 2024 12:53 PM IST

Lok Sabha Election first phase voting Live updates : लोकसभा निवडणुका २०२४ च्या पहिल्या टप्प्यातील मतदान आज होणार आहे. देशातील १०२ तर राज्यातील पाच जागांवर आज मतदान होणार आहे. या साठी चोख सुरक्षा व्यवस्था तैनात करण्यात आली आहे.

लोकशाहीच्या उत्सवाला आज पासून सुरुवात! राज्यातील ५ तर देशातील १०२ जागांसाठी मतदान
लोकशाहीच्या उत्सवाला आज पासून सुरुवात! राज्यातील ५ तर देशातील १०२ जागांसाठी मतदान

Lok sabha Election first phase voting live updates : आज देशात लोकशाहीचा उत्सवाला सुरुवात होणार आहे. पहिल्या टप्प्यातील मतदान आज होणार आहे. राज्यातील पाच तर देशात १०२ जागांवर आज मतदान होणार आहे. हे मतदान शांततेत व निर्भय वातावरणात पार पडावे यासाठी राज्यातील मतदारसंघात सुरक्षा व्यवस्था चोख ठेवण्यात आली आहे. या साठी केंद्रीय दल तसेच अन्य राज्यांचे दल मिळून १२४ कंपन्या तैनात करण्यात आल्या आहेत. तर नक्षलग्रस्त गडचिरोली जिल्ह्यात सुरक्षा यंत्रणा चोख ठेवण्यात आली आहे.

ट्रेंडिंग न्यूज

सकाळी ७ ते सायंकाळी ६ पर्यंत मतदान होणार आहे. तर नक्षलग्रस्त भागात नक्षली कारवायांचा धोका लक्षात घेऊन गडचिरोली, चिमूर लोकसभा मतदारसंघातील आमगाव, आरमोरी, गडचिरोली आणि अहेरी तसेच भंडारा गोंदिया लोकसभा मतदारसंघातील अर्जुनी मोरगाव अशा पाच विधानसभा मतदारसंघात सकाळी सात ते दुपारी तीन या वेळेत मतदान पार पडेल.

लोकसभा निवडणुकीच्या पहिल्या टप्प्यातील पाच मतदारसंघात  १९.१७ टक्के मतदान

राज्यातील लोकसभा निवडणुकीच्या पहिल्या टप्प्यातील मतदान  सकाळी ७.०० पासून सूरु झाले आहे. पहिल्या टप्प्यातील एकूण पाच मतदार संघात सकाळी १२ वाजेपर्यंत १९.१७ टक्के मतदान झाले आहे. 

रामटेक १६.१४ टक्के

नागपूर १७.५३ टक्के

भंडारा- गोंदिया १९.७२ टक्के

गडचिरोली- चिमूर २४.८८ टक्के

चंद्रपूर १८.९४ टक्के

नागपूरमध्ये ११ वाजेपर्यंत १७ टक्के मतदानाची नोंद

नागपूरमध्ये सकाळी ११ वाजेपर्यंत १७.५३ टक्के मतदानाची नोंद झाली. तर भंडारा आणि गोंदियात गोंदिया १९.७२ टक्के मतदानाची नोंद झाली. चंद्रपूर जिल्ह्यात १८.९४ टक्के मतदानाची नोंद झाली. तर गडचिरोली-चिमुर येथे २४.८८ टक्के मतदानाची नोंद झाली. रामटेक येथे १६.१४ टक्के मतदानाची नोंद झाली.

 

नाना पटोले यांनी त्यांच्या भंडारा येथील साकोली या गावी त्यांच्या मतदार संघात कुटुंबासह मतदान केले.
नाना पटोले यांनी त्यांच्या भंडारा येथील साकोली या गावी त्यांच्या मतदार संघात कुटुंबासह मतदान केले.

 

सुधीर मुनगंटीवार व प्रतिभा धानोरकर या उमेदवारांचेही मतदान

काही किरकोळ घटना वगळता चंद्रपूर लोकसभा मतदार संघात अतिशय उत्स्फूर्तपणे मतदान सुरू आहे. चंद्रपूर शहरातील सिटी हायस्कूल येथील मतदान केंद्रावर महायुतीचे उमेदवार सुधीर मुनगंटीवार यांनी सहपरिवार जाऊन मतदानाचा हक्क बजावला. तर वरोरा येथील मतदान केंद्रावर महाविकास आघाडीच्या उमेदवार प्रतिभा धानोरकर यांनी मतदानाचा हक्क बजावला.

 

उपमुख्यमंत्री देवेंद्र फडवणीस यांनी त्यांच्या आई आणि पत्नीसह आज मतदानाचा हक्क बजावला
उपमुख्यमंत्री देवेंद्र फडवणीस यांनी त्यांच्या आई आणि पत्नीसह आज मतदानाचा हक्क बजावला

राज्यात पाच जिल्ह्यात आतापर्यंत झालेले मतदान

महाराष्ट्रातील भंडारा-गोंदिया, चंद्रपूर, गडचिरोली-चिमूर, नागपूर, रामटेक या लोकसभा मतदारसंंघात शांततेत मतदान सुरू झाले आहे. पहिल्या दोन तासांत झालेल्या मतदानाची आकडेवारी समोर आली आहे.

महाराष्ट्रातील मतदानाची टक्केवारी

भंडारा-गोंदियामध्ये - ७.२२ टक्के मतदान

चंद्रपूरमध्ये - ७.४४ टक्के मतदान

गडचिरोली-चिमूरमध्ये - ८.८३ टक्के मतदान

नागपूरमध्ये - ६.४१ टक्के मतदान

रामटेकमध्ये - ५.८२ टक्के मतदान

राज्यातील सकाळी ९ वाजेपर्यंत ६.९९ टक्के

सकाळी ९ वाजेपर्यंत अरुणाचल प्रदेशात ६.४४ टक्के, सिक्कीममध्ये ७.९० टक्के, मध्य प्रदेशात १५ टक्के, महाराष्ट्रात ६.९९ टक्के, जम्मू-काश्मीरमध्ये १०.४३ टक्के, राजस्थानमध्ये १०.६७ टक्के, उत्तर प्रदेशात १२.६६ टक्के, त्रिपुरात उत्तराखंडमध्ये १५.२१ टक्के, पश्चिम बंगालमध्ये १०.५४ टक्के मतदानाची नोंद झाली आहे.

मी निवडणूक मोठ्या फरकाने जिंकेन : नितीन गडकरींचा दावा

केंद्रीय मंत्री आणि नागपूर लोकसभा मतदारसंघातील भाजपचे उमेदवार नितीन गडकरी म्हणाले, 'आपण मतदान केलेच पाहिजे, तो आपला मूलभूत अधिकार आणि कर्तव्यही आहे... मला १०१ टक्के खात्री आहे की मी निवडणुकीत मोठ्या फरकाने जिंकेन.

मिझोरामचे राज्यपाल डॉ. हरी बाबू कंभामपती म्हणाले, 'या निवडणुकीत मोठ्या संख्येने नवीन मतदार सहभागी होत आहेत. मला वाटते की ते पहिल्यांदाच निवडणूक प्रक्रियेत सहभागी होण्यास नक्कीच उत्सुक असतील आणि या प्रक्रियेत सहभागी होऊन त्यांच्या आकांक्षा पूर्ण होतील...'

पुद्दुचेरीचे मुख्यमंत्री एन. रंगसामी मोटारसायकलवरून मतदानासाठी पोहोचले

पुद्दुचेरीचे मुख्यमंत्री एन. रंगसामी त्यांचे मतदान करण्यासाठी मोटारसायकलवरून पुद्दुचेरीतील देलार्शपेट येथील मतदान केंद्रावर पोहोचले. तत्पूर्वी, मेघालयचे मुख्यमंत्री कॉनरॅड के संगमा यांनी सांगितले होते की, ते स्वतः मतदान केंद्रावर गेले होते. मतदान केंद्रांवर मतदारांच्या लांबच लांब रांगा लागल्या आहेत.

बंगालमध्ये हिंसाचार, निवडणूक कार्यालयाला आग

पश्चिम बंगालमधील कूचबिहार, जलपाईगुडी आणि अलीपुरद्वार या तीन लोकसभा जागांवर मतदान होत आहे. या काळात तुरळक हिंसाचाराच्या घटना घडल्याचे वृत्त आहे. कूचबिहारच्या तुफानगंजमध्ये टीएमसीच्या तात्पुरत्या निवडणूक कार्यालयाला आग लावण्यात आल्याचे सांगण्यात येत आहे. तसेच दोन ठिकाणी भाजप बूथ अध्यक्ष आणि एजंटांना मारहाण करण्यात आली.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे मतदारांना मतदान करण्याचे आवाहन

नवी दिल्ली : देशातील लोकसभा निवडणुकीपूर्वी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशातील लोकसभा निवडणुकीच्या पहिल्या टप्प्यासाठी मतदारांना उत्साहाने मतदान करण्याचे आणि मतदानाचा हक्क बजावण्याचे आवाहन केले मोदींनी जनतेला मोठ्या संख्येने मतदान करून मतदानाचा नवा विक्रम निर्माण करण्याचे आवाहन केले. देशातील २१ राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांमधील लोकसभेच्या १०२ जागांसाठी पहिल्या टप्प्यात मतदान होत आहे. याशिवाय अरुणाचल प्रदेश आणि सिक्कीम विधानसभेच्या ९२ जागांसाठीही मतदान होत आहे.

पंतप्रधान म्हणाले, “लोकशाहीचा सर्वात मोठा सण आजपासून सुरू होत आहे. लोकसभा निवडणुकीच्या पहिल्या टप्प्यात २१ राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशातील १०२ जागांसाठी मतदान होत आहे. या सर्व जागांच्या मतदारांना मी आवाहन करतो की त्यांनी मतदानाचा हक्क बजावून मतदानाचा नवा विक्रम निर्माण करावा. पहिल्यांदाच मतदान करणाऱ्या माझ्या तरुण मित्रांना माझे विशेष आवाहन आहे की त्यांनी मोठ्या संख्येने मतदान करावे. लोकशाहीत प्रत्येक मत मौल्यवान असते आणि प्रत्येक आवाज महत्त्वाचा असतो.”

संध्याकाळी ६ पर्यंत चालणार मतदान

निवडणूक आयोगाने दिलेल्या माहितीनुसार, मतदान सकाळी ७ वाजता सुरू होईल आणि संध्याकाळी ६ वाजेपर्यंत चालेल. आयोगाने देशभरात १.८७ लाख मतदान केंद्रांवर १८ लाखांहून अधिक मतदान कर्मचारी तैनात केले आहेत. या मतदान केंद्रांवर १६.६३ कोटींहून अधिक मतदार आपला मतदानाचा हक्क बजावू शकतील. मतदारांमध्ये ८.४ कोटी पुरुष, ८.२३ ​​कोटी महिला आणि ११,३७१ तृतीय लिंगांचा समावेश आहे. ३५.६७ लाख लोक पहिल्यांदाच मतदार झाले आहेत. यासोबतच २० ते २९ वयोगटातील ३.५१ कोटी तरुण मतदार आहेत.

आज देशात लोकशाहीचा उत्सवाला सुरुवात होणार आहे. पहिल्या टप्प्यातील मतदान आज होणार आहे. राज्यातील पाच तर देशात १०२ जागांवर आज मतदान होणार आहे. अनेक ठिकाणी मतदारांनी सकाळपासून मतदान केंद्राबाहेर मतदान करण्यासाठी रांगा लावल्या आहेत.
आज देशात लोकशाहीचा उत्सवाला सुरुवात होणार आहे. पहिल्या टप्प्यातील मतदान आज होणार आहे. राज्यातील पाच तर देशात १०२ जागांवर आज मतदान होणार आहे. अनेक ठिकाणी मतदारांनी सकाळपासून मतदान केंद्राबाहेर मतदान करण्यासाठी रांगा लावल्या आहेत.

या दिग्गजांनी केले मतदान

लोकसभा निवडणूक 2024: राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे प्रमुख डॉ. मोहन भागवत यांनी नागपुरात मतदान केले. ते म्हणाले, 'मतदान हे आपले कर्तव्य आहे, आपला हक्क आहे. १०० टक्के मतदान झाले पाहिजे. मी माझे मत दिले आहे. त्याचवेळी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि माजी अर्थमंत्री पी चिदंबरम यांनी शिवगंगा येथे मतदान केले.

राज्यात या नेत्यांचे भवितव्य आज होणार मतपेटीत बंद

राज्यात आज नागपूर, चंद्रपूर, रामटेक, भंडारा गोंदिया, गडचिरोली चिमुर येथे मतदान होत आहे. नागपूरमध्ये भाजपचे नितीन गडकरी तर वि. विकास ठाकरे हे काँग्रेसकडून निवडणूक रिंगणात आहेत. चंद्रपूर येथे भाजप कडून सुधीर मुनगंटीवार तर प्रतिभा धानोरकर या काँग्रेस कडून लोकसभा निवडणूक लढवत आहेत. रामटेक येथे राजू पारवे हे शिंदे गटाकडून उभे आहेत तर श्यामकुमार बर्वे हे काँग्रेसकडून उभे आहेत. तर भंडारा गोंदिया येथून भाजप कडून सुनील मेंढे तर प्रशांत पडोळे हे काँग्रेस कडून निवडणूक लढवत आहेत. गडचिरोलीत भाजपचे अशोक नेते तर नामदेव किरसान हे काँग्रेस कडून निवडणूक लढवत आहेत. या सर्व उमेदवारांचे भवितव्य आज मतपेटीत बंद होणार आहे.

राज्यात या जिल्ह्यात आज मतदान

राज्यात आज नागपूर, रामटेक, भंडारा, गोंदिया, गडचिरोली, चिमूर, चंद्रपूर या राज्यात मतदान होत आहे.

देशात या ठिकाणी होणार मतदान

आज उत्तर प्रदेशातील ८, राजस्थानातील १३, मध्य प्रदेशातील ६, आसाममधील ५, बिहारमधील ४, महाराष्ट्रातील ५, जम्मू-काश्मीर आणि छत्तीसगडमधील प्रत्येकी १, मेघालय आणि अरुणाचल प्रदेशमधील प्रत्येकी २, त्रिपुरामधून १, उत्तराखंडमधील ६, तामिळनाडूमध्ये ३९, पश्चिम बंगाल, सिक्कीम, नागालँड, अंदमान आणि निकोबार, मिझोराम, पुडुचेरी, मणिपूर आणि लक्षद्वीपमध्ये मतदान होणार आहे.

तामिळनाडूतील विरोधकांचा बालेकिल्ला मोडून काढण्यासाठी भाजपचा प्रयत्न

लोकसभा निवडणुकीसाठी शुक्रवारी ज्या १०२ जागांवर मतदान होत आहे, त्यामध्ये जवळपास पन्नास-पन्नासची लढत झाली आहे. तामिळनाडूतील विरोधकांचा बालेकिल्ला मोडून काढण्यासाठी भाजप सर्वतोपरी प्रयत्न करत आहे, परंतु द्रमुक आणि काँग्रेससह भारताच्या आघाडीच्या गटाला आपला गड वाचवण्याचा विश्वास आहे. तसंच हिंदी पट्ट्यातील ज्या भागात भाजपने धुडगूस घातला होता त्या भागात विरोधक आपले अस्तित्व प्रस्थापित करण्याचा प्रयत्न करत आहेत.

तामिळनाडूत ३९ पहिल्या टप्यात ३९ जागांवर मतदान

पहिल्या टप्प्यात तामिळनाडूच्या सर्व ३९ जागांवर मतदान होणार आहे. येथे गेल्या निवडणुकीत द्रमुक आणि काँग्रेस आघाडीने बाजी मारली होती. यावेळी भाजप आपल्या छोट्या मित्रपक्षांसह अनेक जागांवर जोरदारपणे निवडणूक लढवत आहे. एआयडीएमकेने ही स्पर्धा तिरंगी केली आहे.

बंगालमध्ये भाजपची थेट तृणमूल काँग्रेसशी स्पर्धा

बंगालमध्ये भाजपची थेट स्पर्धा तृणमूल काँग्रेसशी आहे. पण, पहिल्या टप्प्यात मतदान होत असलेल्या तीन जागांवर गेल्या निवडणुकीत भाजपचा वरचष्मा होता. छत्तीसगडमध्ये भाजपचे वर्चस्व असूनही, ज्या बस्तरसाठी पहिल्या टप्प्यात मतदान होणार आहे, ती गेल्या वेळी काँग्रेसकडे गेली होती. यावेळी ही स्पर्धा अगदी जवळची असल्याचे बोलले जात आहे.

मध्य प्रदेशातही आज मतदान

मध्य प्रदेशातील छिंदवाडा हा काँग्रेस नेते कमलनाथ यांचा बालेकिल्ला आहे, पण यावेळी निवडणूक रंजक आहे. ईशान्येत भाजपचे वर्चस्व राहिले असले तरी यावेळी काँग्रेसमध्ये अनेक जागांवर स्पर्धा पाहायला मिळत आहे.

गेल्या लोकसभा निवडणुकीबद्दल बोलायचे झाले तर या १०२ जागांपैकी यूपीएने ४५ तर एनडीएने ४१ जागा जिंकल्या होत्या. या ट्रेंडनुसार, स्पर्धा अगदी जवळ असावी. मात्र राज्यनिहाय चित्र तसे नाही. महाराष्ट्रात स्थानिक समीकरणे पूर्णपणे बदलली आहेत, दोन्ही बाजूंना नवीन मित्रपक्ष आहेत. बिहारमधील ग्राउंड रिॲलिटीही बदलण्याजोगी आहे. यूपीमध्ये गेल्या निवडणुकीत सपा आणि काँग्रेससोबत बसपा होता, मात्र यावेळी बसपा स्वतंत्रपणे लढत आहे. सपा-काँग्रेस युती भाजपला कसे आव्हान देऊ शकते हे पाहायचे आहे.

WhatsApp channel