इंडियन प्रीमियर लीग २०२४ चा ५१ वा सामना आज (३ मे) मुंबई इंडियन्स आणि कोलकाता नाईट रायडर्स यांच्यात खेळला गेला. मुंबईच्या वानखेडे स्टेडियमवर कोलकाताने मुंबईचा २४ धावांनी पराभव केला. मिचेल स्टार्कने १९व्या षटकात ३ बळी घेतले.
केकेआरने १२ वर्षांनंतर वानखेडेवर विजय मिळवला आहे. कोलकाताने प्रथम फलंदाजी करताना १६९ धावा केल्या होत्या. प्रत्युत्तरात मुंबईचा संघ १८.५ षटकात १४५ धावांत गडगडला.
मुंबईसाठी सूर्यकुमार यादवने ३० चेंडूत अर्धशतक झळकावले, पण तो आपल्या संघाला विजयापर्यंत नेऊ शकला नाही. मुंबईचा ११ सामन्यातील हा आठवा पराभव आहे.
यासह हार्दिक पांड्याचा संघ प्लेऑफमधून जवळपास बाहेर पडला आहे. केकेआरकडून मिचेल स्टार्कने ४ विकेट घेतल्या. तर सुनील नरेन, आंद्रे रसेल आणि वरुण चक्रवर्तीने २-२ बळी घेतले.
केकेआरच्या खात्यात १४ गुण आहेत. श्रेयस अय्यरचा संघ गुणतालिकेत दुसऱ्या स्थानावर असून प्लेऑफसाठी पात्र होण्याच्या मार्गावर आहे. मुंबई -०.३५६ नेट रन रेटसह नवव्या स्थानावर आहे.
या सामन्यात कोलकात्याच्या गोलंदाजांनी धुमाकूळ घातला आहे. आंद्रे रसेलने डावाच्या १२व्या षटकात कर्णधार हार्दिक पांड्याला बाद केले. त्याला एकच धाव करता आली. टीम डेव्हिड आठव्या क्रमांकावर फलंदाजीसाठी आला आहे. संघाला विजयासाठी ५१ चेंडूत ९१ धावांची गरज आहे.
सहाव्या षटकातील पाचव्या चेंडूवर सुनील नरेनने रोहित शर्माला बाद केले. त्याला केवळ ११ धावा करता आल्या. यासह पॉवरप्लेही संपला. मुंबईने ६ षटकांत तीन विकेट गमावल्या. ६ षटकांनंतर संघाची धावसंख्या ४६/३ आहे.
दुसऱ्या षटकात इशान किशनने आधी चौकार आणि नंतर षटकार मारला. मात्र, तिसऱ्या चेंडूवर मिचेल स्टार्कने इशानला बोल्ड केले. ७ चेंडूंत १३ धावा करून तो बाद झाला. मुंबईने १६ धावांवर पहिली विकेट गमावली.
मुंबईतील वानखेडेवर प्रथम फलंदाजी करताना कोलकाता नाईट रायडर्सचा संघ १९.५ षटकांत सर्वबाद १६९ धावांवर आटोपला. मुंबईकडून जसप्रीत बुमराह आणि नुवान तुषाराने प्रत्येकी ३ बळी घेतले. तर केकेआरसाठी व्यंकटेश अय्यरने सर्वाधिक ७० धावा केल्या. ५२ चेंडूंच्या खेळीत त्याने ६ चौकार आणि ३ षटकार मारले. याशिवाय मनीष पांडेने ४२ धावांची खेळी केली.
हार्दिक पांड्याने कोलकाताला सहावा धक्का दिला. डावाच्या १७व्या षटकाच्या दुसऱ्या चेंडूवर त्याने मनीष पांडेला बाद केले. या सामन्यात त्याला ४२ धावा करण्यात यश आले. मनीषने व्यंकटेश अय्यरसोबत ८३ धावांची भागीदारी करत कोलकात्याला संकटातून बाहेर काढले.
पियुष चावलाने कोलकाताला पाचवा धक्का दिला. त्याने रिंकू सिंगला ५७ धावांवर बाद केले. त्याला केवळ ९ धावा करता आल्या. मनीष पांडे सातव्या क्रमांकावर फलंदाजीसाठी आला आहे. ७ षटकांनंतर संघाची धावसंख्या ६०/५ आहे.
हार्दिक पांड्याने कोलकाताला चौथा धक्का दिला. त्याने सुनील नरेनला बोल्ड केले. त्याला केवळ ८ धावा करता आल्या. रिंकू सिंग सहाव्या क्रमांकावर फलंदाजीसाठी आला आहे. पाच षटकांनंतर संघाची धावसंख्या ५१/४ आहे.
फिल सॉल्टच्या रूपाने कोलकाताला पहिला धक्का बसला. डावाच्या पहिल्याच षटकात नुवान तुषाराने त्याला तिलक वर्माकरवी झेलबाद केले. त्याला केवळ ५ धावा करता आल्या. आंगकृष्ण रघुवंशी तिसऱ्या क्रमांकावर फलंदाजीसाठी आला आहे. एका षटकानंतर संघाची धावसंख्या १ बाद १४ आहे.
मुंबई इंडियन्स (प्लेइंग इलेव्हन): इशान किशन (विकेटकीपर), सूर्यकुमार यादव, तिलक वर्मा, नेहल वढेरा, हार्दिक पांड्या (कर्णधार), नमन धीर, टीम डेव्हिड, जेराल्ड कोएत्झी, पीयूष चावला, जसप्रीत बुमराह, नुवान तुषारा.
कोलकाता नाईट रायडर्स (प्लेइंग इलेव्हन): फिलिप सॉल्ट (विकेटकीपर), सुनील नरेन, अंगक्रिश रघुवंशी, श्रेयस अय्यर (कर्णधार), व्यंकटेश अय्यर, रिंकू सिंग, आंद्रे रसेल, रमणदीप सिंग, मिचेल स्टार्क, वैभव अरोरा, वरुण चक्रवर्ती.
मुंबई इंडियन्सने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. या सामन्यात मुंबईने एक बदल केला आहे. नमन धीर संघात परतला आहे. त्याला मोहम्मद नबीच्या जागी संधी मिळाली आहे. त्याचवेळी श्रेयस अय्यरने सांगितले की, या सामन्यात आपला संघ कोणताही बदल न करता खेळताना दिसेल.
संबंधित बातम्या