मराठी बातम्या  /  मनोरंजन  /  हेमा मालिनीच्या लेकीला काय झालं? ईशा देओलचे ओठ पाहून चाहतेही पडले काळजीत! Video Viral

हेमा मालिनीच्या लेकीला काय झालं? ईशा देओलचे ओठ पाहून चाहतेही पडले काळजीत! Video Viral

Harshada Bhirvandekar HT Marathi
Apr 21, 2024 08:42 AM IST

सोशल मीडियावर व्हायरल होत असलेल्या या व्हिडिओमध्ये ईशा देओलचे ओठ अगदी वेगळ्या पद्धतीने सुजलेले दिसत आहेत.

हेमा मालिनीच्या लेकीला काय झालं? ईशा देओलचे ओठ पाहून चाहतेही पडले काळजीत! Video Viral
हेमा मालिनीच्या लेकीला काय झालं? ईशा देओलचे ओठ पाहून चाहतेही पडले काळजीत! Video Viral

पती भरत तख्तानीपासून घटस्फोट घेतल्यानंतर बॉलिवूड अभिनेत्री ईशा देओल सोशल मीडियावर चर्चेत राहिली आहे. नुकतीच अभिनेत्री तिची बहीण अहाना देओलसह मथुरा येथे पोहोचली होती. या ठिकाणी दोन्ही बहिणींनी बांके बिहारी मंदिराला भेट दिली आणि २०२४च्या लोकसभा निवडणुकीत सत्तेची लढाई लढणाऱ्या आईसाठी म्हणजेच हेमा मालिनी यांच्या विजयासाठी आशीर्वाद मागितला. दरम्यान, ईशा देओल हिचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे, जो पाहिल्यानंतर अभिनेत्रीचे चाहते देखील आश्चर्यचकित झाले आहेत.

ट्रेंडिंग न्यूज

सोशल मीडियावर व्हायरल होत असलेल्या या व्हिडिओमध्ये ईशा देओलचे ओठ अगदी वेगळ्या पद्धतीने सुजलेले दिसत आहेत. तिच्या ओठांना सूज आलेली दिसत आहे, हे पाहून नेटकऱ्यांनी अभिनेत्रीला ट्रोल करण्यास सुरुवात केली आहे. काही युजर्सचे म्हणणे आहे की ईशा देओलच्या ओठांवर काहीतरी सर्जरी करण्यात आली आहे, तर काही लोकांनी असे म्हटले आहे की तिच्या ओठांवर झालेली सर्जरी चुकली आहे.

नेटकऱ्यांनी उडवली अभिनेत्रीची खिल्ली

ईशा देओलच्या या व्हिडीओवर युजर्स वेगवेगळ्या पद्धतीने कमेंट करून आपल्या प्रतिक्रिया देत आहेत. दरम्यान, एका युजरने लिहिले की, 'हिचे ओठ मधमाशीने दंश केल्यासारखे दिसत आहेत.' दुसऱ्या युजरने विचारले की, 'शस्त्रक्रिया चुकीची झाली आहे का?' तिसऱ्या युजरने लिहिले, 'मला समजत नाही की अभिनेत्री लिप जॉब का करायला जातात? शेवटी याची काय गरज आहे?’ आणखी एका युजरने लिहिले की, 'आता त्यांच्या लिपस्टिकची किंमत वाढली आहे.' कोणी शस्त्रक्रिया करून घेतल्याचे बोलत आहे, तर कोणी लिपस्टिकची किंमत वाढल्याचे म्हणत ट्रोल करत आहे. ईशा देओलच्या व्हिडीओवर युजर्स अशाप्रकारे कमेंट करत आहेत.

ईशा देओलने घटस्फोट घेत दिला सगळ्यांना धक्का!

दुसरीकडे, ईशा देओलने या व्हिडीओवर सध्या कोणतीही प्रतिक्रिया दिलेली नाही. भाजप उमेदवार-अभिनेत्री हेमा मालिनी यांची मुलगी आणि अभिनेत्री ईशा देओलने या वर्षाच्या सुरुवातीला पती भरत तख्तानीपासून विभक्त होण्याचा निर्णय घेतला होता. मात्र, यामागचे कारण स्पष्ट होऊ शकले नाही. ईशा आणि भरत यांचे २०१२ मध्ये लग्न झाले होते. या दोघांना दोन लाडक्या मुली आहेत, ज्यांची नावे राध्या आणि मिराया आहेत. या जोडप्याने अलीकडेच त्यांच्या जवळपास १२ वर्षांच्या वैवाहिक जीवनाचा शेवट झाल्याची घोषणा देखील केली.

IPL_Entry_Point

विभाग