बॉलिवूड अभिनेत्री हेमा मालिनी आणि अभिनेते धर्मेंद्र यांची लेक ईशाच्या खासगी आयुष्याची सध्या जोरदार चर्चा सुरु आहे. ईशा देओल पती आणि उद्योजक भरत तख्तानीला घटस्फोट देणार असल्याच्या चर्चांना जोर आला आहे. याबाबत चाहत्यांना कळताच धक्का बसला आहे. आता ईशाच्या घटस्फोटाचे कारण समोर आले आहे.
एका रेडिट यूजरने पोस्ट केली आहे. या पोस्टमध्ये ईशाच्या घटस्फोटामागील कारण काय असू शकते याची शक्यता वर्तवली जात आहे. ‘कदाचित ईशा देओल तिच्या पतीपासून विभक्त झाली आहे. कारण तिने पतीसोबत सोशल मीडियावर फोटो पोस्ट करणे बंद केले आहे. एवढेच नाही तर भरतचे परक्या महिलेसोबत विवाहबाह्य संबंध आहेत' असा दावा सोशल मीडिया यूजरने केला आहे.
वाचा: 'बिग बॉस १७'च्या विजेत्याचे नशीब फळफळणार, ट्रॉफीसोबत मिळणार 'हे' बक्षीस
दुसऱ्या एका यूजरने 'ईशाचा पती भरत न्यू इअरच्या दिवशी बंगळुरुमधील एका पार्टीमध्ये हजर होता. त्यावेळी त्याची गर्लफ्रेंडदेखील सोबत होती' असे म्हटले आहे. भरतची गर्लफ्रेंड बंगळूरुमध्ये राहते असल्याचे देखील म्हटले आहे. पण ईशा किंवा तिच्या कुटुंबीयांनी याबाबत अधिकृत माहिती दिलेली नाही. त्यामुळे ईशा खरच घटस्फोट घेणार की या केवळ चर्चा सुरु आहेत याबाबत माहिती आलेली नाही.
ईशाने जून २०२३मध्ये भरतला लग्नाच्या वाढदिवसानिमित्त शुभेच्छा देणारी एक सुंदर पोस्ट लिहिली होती. त्यात त्यांनी एक सुंदर फोटोही शेअर केला होता, ज्यामध्ये दोघांमधील प्रेम दिसले होते. ईशा आणि भरत यांची भेट एका आंतरमहाविद्यालयीन स्पर्धेदरम्यान झाली होती. १० वर्षांनंतर ते पुन्हा अमेरिकेत भेटले आणि एकमेकांच्या प्रेमात पडले. २९ जून २०१२ रोजी त्यांनी मुंबईतील इस्कॉन मंदिरात लग्नगाठ बांधली होती. त्यांच्या लग्नाला ११ वर्षे झाली आहेत. ईशा आणि भरत यांना राध्या आणि मिराया या दोन मुली आहेत. पण आता त्यांच्या नात्यात फूट पडल्याचे समोर आले आहे. भरत दुसऱ्या मुलीच्या प्रेमात असल्याचे म्हटले जात आहे.