मराठी बातम्या  /  मनोरंजन  /  अर्जुन आणि चैतन्यला एकत्र आणण्याचा प्रयत्न करणार सायली! ‘ठरलं तर मग’ मालिकेत आज काय होणार?

अर्जुन आणि चैतन्यला एकत्र आणण्याचा प्रयत्न करणार सायली! ‘ठरलं तर मग’ मालिकेत आज काय होणार?

Harshada Bhirvandekar HT Marathi
Apr 20, 2024 01:20 PM IST

आता सायली आपल्या हातातला माईक चैतन्यच्या हातात देऊन, त्याला अर्जुनच्या शेजारी उभा करते आणि तुम्ही दोघे मित्र मिळून आम्हाला तुमच्या कॉलेजच्या गमतीजमती सांगा, असं म्हणते.

अर्जुन आणि चैतन्यला एकत्र आणण्याचा प्रयत्न करणार सायली! ‘ठरलं तर मग’ मालिकेत आज काय होणार?
अर्जुन आणि चैतन्यला एकत्र आणण्याचा प्रयत्न करणार सायली! ‘ठरलं तर मग’ मालिकेत आज काय होणार?

ठरलं तर मग’ या मालिकेच्या आजच्या भागात अजूनही अर्जुनच्या कॉलेजचं रियुनियन पाहायला मिळत आहे. यातच साक्षी आपल्याला ओळखलेल्या त्या मुलापासून स्वतःला लपवण्याचा प्रयत्न करत आहे. तर, दुसरीकडे चैतन्य आणि अर्जुन यांच्यात पुन्हा एकदा जवळीक निर्माण होत आहे. कुणालचा विषय निघाल्यावर सगळेच भावूक झाले होते. कॉलेजमध्ये असताना अर्जुन, कुणाल आणि चैतन्य या तिघांचा खूप चांगला बॉण्ड होता. तिघेही एकमेकांचे बेस्ट फ्रेंड होते. अनेकदा कॉलेजचे लेक्चर बंक करून हे तिघे चित्रपट पाहायला जायचे. याच दरम्यानची एक आठवण शेअर करताना अर्जुन भावूक होतो आणि आपण कोणता चित्रपट पाहायला गेलो होतो, हे त्याला आठवत नाही.

ट्रेंडिंग न्यूज

मात्र, याप्रसंगी तो सतत चैतन्यचं नाव घेणे टाळतो. अर्जुनला चित्रपटाचे नाव आठवत नाहीये, हे बघून चैतन्य पटकन पुढे येऊन चित्रपटाचे नाव सांगतो. सायली हे बघून मनोमन सुखावून जाते. आता सायली आपल्या हातातला माईक चैतन्यच्या हातात देऊन, त्याला अर्जुनच्या शेजारी उभा करते आणि तुम्ही दोघे मित्र मिळून आम्हाला तुमच्या कॉलेजच्या गमतीजमती सांगा, असं म्हणते. दुसरीकडे, साक्षी आतमध्ये येऊन अर्जुन आणि चैतन्यला एकत्र बघते आणि तिच्या पायाखालची जमीनच सरकते. अर्जुन आणि चैतन्याची पुन्हा मैत्री होणे म्हणजे तिच्यासाठी धोक्याची घंटा आहे. त्यामुळे साक्षी पुन्हा एकदा नवी शक्कल लढवायला सुरुवात करते.

‘चला हवा येऊ द्या’ परत आला तरी मी नसेन; निलेश साबळेने ‘तो’ विषयच केला कट! काय म्हणाला वाचा...

नागराजवर पडणार रविराजची नजर!

तिथे प्रिया आपल्या वडिलांना म्हणजेच रविराज किल्लेदार यांना एका कॅफेमध्ये घेऊन जाते. या कॅफेमध्ये नागराज महिपतच्या दोन गुंडांसोबत बसून, पुढचं प्लॅनिंग दाखवत असतो. रविराजने नागराजला असं बघावं यासाठीच, मुद्दाम प्रिया त्याला या कॅफेमध्ये घेऊन आलेली असते. यावेळी रविराजची नजर नागराजवर पडते. नागराज तिथे बसून दोन गुंडांना महिपतच्या वसुलीचे काम समजावून सांगत असताना, रविराज ते ऐकतो त्यानंतर संतापलेला रविराज नागराजला जाब विचारायला जाणारी इतक्यात प्रिया त्याला थांबवते. आणि म्हणते की, ‘तुम्हा दोघा भावांमध्ये अशी भांडण होताना मला बघणार नाही. त्यापेक्षा मी इथून निघून जाते’.

साक्षीचं बिंग फुटणार?

रविराज आता प्रियाच्या बोलण्यात अडकणार आहे. नागराज आधीपासूनच महिपतची मदत करत होता. मात्र, महिपत हा गुंड आहे, हे आपल्याला माहीत नसल्याचं प्रिया रविराजला सांगणार आहे. रविराजची प्रॉपर्टी एकट्या प्रियाला मिळावी यासाठी तिने हा प्लॅन आखला होता. दुसरीकडे, साक्षी आता सायली आणि अर्जुन यांना चैतन्यपासून दूर ठेवण्याचा प्रयत्न करत असतानाच, सायलीच्या हाती फोटो लागल्यामुळे तिचं बिंग फुटणार आहे. मालिकेच्या येत्या भागांमध्ये हे रंजक वळण पाहायला मिळणार आहे.

IPL_Entry_Point