Pimpri chinchwad: पिंपरीत श्वानाच्या पिल्लाला लोखंडी रॉडने बेदम मारहाण; गुन्हा दाखल, मारहाणीचा व्हिडिओ व्हायरल
मराठी बातम्या  /  महाराष्ट्र  /  Pimpri chinchwad: पिंपरीत श्वानाच्या पिल्लाला लोखंडी रॉडने बेदम मारहाण; गुन्हा दाखल, मारहाणीचा व्हिडिओ व्हायरल

Pimpri chinchwad: पिंपरीत श्वानाच्या पिल्लाला लोखंडी रॉडने बेदम मारहाण; गुन्हा दाखल, मारहाणीचा व्हिडिओ व्हायरल

Apr 20, 2024 01:00 PM IST

puppy brutally beaten in Pimpri chinchwad : पिंपरी-चिंचवड येथे एका श्वानाच्या पिलाला अमानुषपणे लोखंडी रॉडने मारहाण करण्यात आल्याची घटना उघडकीस आली आहे. या घटनेचा व्हिडिओ देखील व्हायरल झाला असून मारहाण करणाऱ्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पिंपरीत श्वानाच्या पिल्लाला लोखंडी रॉडने बेदम मारहाण; गुन्हा दाखल, मारहाणीच्या व्हिडिओ व्हायरल
पिंपरीत श्वानाच्या पिल्लाला लोखंडी रॉडने बेदम मारहाण; गुन्हा दाखल, मारहाणीच्या व्हिडिओ व्हायरल

puppy brutally beaten in Pimpri chinchwad : पिंपरी-चिंचवड येथे एक धक्कादायक आणि माणुसकीला काळिमा फसणारी घटना उघडकीस आली आहे. एका व्यक्तीने श्वानाच्या पिल्लाला लोखंडी रॉडने अमानुषपणे मारहाण केली असून यात हे पिल्लू गंभीर जखमी झाले आहे. या घटनेचा व्हिडिओ देखील सोशल मिडियावर व्हायरल झाला आहे. मारहाण करणाऱ्याविरोधात पिंपरी पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही घटना पिंपरीमधील गुप्ता ट्रेडर्स या दुकानासमोर घडली.

uddhav thackeray : आदित्य ठाकरेंना मुख्यमंत्रीपदासाठी तयार करतो असा फडणवीसांचा शब्द होता; उद्धव ठाकरे यांचा गौप्यस्फोट

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. हितेश कुंदनानी यांनी पिंपरी पोलिसात तक्रार दिली आहे. गुप्ता ट्रेडरच्या दुकानात एक श्वानाचे पिल्लू येऊन बसत होते. ही बाब दुकान मालक गुप्ता यांना आवडत नव्हती. ते या श्वनाच्या पिल्लाला हाकलून लावत होते. मात्र, हे पिल्लू सारखे त्यांच्या दुकानात जात असल्याने गुरुवारी शुक्रवारी गुप्ता यांनी या पिल्लाला लोखंडी रॉडने मारहाण केली.

Video : छगन भुजबळ यांनी निवडणुकीतून माघार का घेतली? नेमकं काय घडलं त्यांच्याकडूनच ऐका!

यात या पिल्लाला गंभीर मार लागल्याने पिल्लू जखमी झाले. यानंतरही गुप्ता यांनी पिल्लाला लोखंडी रॉडने रस्तावर ढकळून दिले. यानंतर हे पिल्लू ओरडत रस्तावर पडून होते. ही बाब कुंदनानी यांनी पहिली. त्यांनी या घटनेचा व्हिडिओ देखील काढला. यानंतर पिल्लाला प्राण्यांच्या रुग्णालयात नेत त्याच्यावर उपचार केले. या मारहाणीत पिल्लाच्या पायाला गंभीर जखम झाली आहे. सध्या त्याच्यावर उपचार सुरू आहेत. यानंतर कुंदनानी यांनी पींपरी पोलिस ठाण्यात जात तक्रार दिली. त्यानुसार गुप्ता यांच्यावर प्राण्यांचा छळ प्रतिबंधक अधिनियम कायद्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

प्राण्यांवर अत्याचाराच्या घटना वाढल्या

पुण्यात प्राण्यांवर अत्याचाराच्या आणि मारहाणीच्या घटना वाढल्या आहे. सोसायटीच्या समोर घाण करत असल्याने एका श्वानाला मारहाण करण्यात आल्याची घटना पुण्यात घडली होती. तर कोंढवा भागात देखील अशीच एक घटना उघडकीस आली होती.

Whats_app_banner
महाराष्ट्रातील बातम्या, प्रत्येक घडामोडीची ब्रेकिंग न्यूज मिळवा हिंदुस्तान टाइम्स मराठीवर