Wedding Viral News: मानापमान आणि रुसवे-फुगव्यांशिवाय कोणतेचं लग्न पार पडत नाही, असे म्हटले जाते. पण या रुसव्याफुगव्यासोबतच लग्न समारंभ आनंदात पार पडतो. अशीच एक घटना उत्तराखंडच्या रुद्रापूर येथील एका लग्नात घडली, जिथे डिजेत नाचण्यावरून वधू-वराच्या पक्षातील लोकांमध्ये फ्री स्टाईल हाणामारी झाली. हे पाहून वधू-वरही थक्क झाले. लग्नातील वाद इतका वाढला की, भांडणानंतर लग्नाची मिरवणूक वधूविना परतले. या भांडणात वधू-वर पक्षातील सुमारे दहा जण जखमी झाल्याची माहिती आहे.
किच्छा येथे राहणाऱ्या तरुणाचे नाते रुद्रपूर येथील एका तरुणीशी जुळले होते. शुक्रवारी रात्री नऊ वाजताच्या सुमारास ही मिरवणूक आवास विकास येथे आली. लग्नाची मिरवणूक आल्यानंतर वर पक्षातील लोक डीजेवर नाचत होते, असे सांगितले जात आहे. नियमानुसार दहा वाजल्यानंतर डीजे बंद करणे बंधनकारक आहे. यामुळे वधूपक्षातील काही लोकांनी डीजे बंद करण्याची विनंती केली. मात्र, यामुळे वराकडचे संतापले.
यानंतर किरकोळ वादाचे रुपांतर हाणामारीत झाले. त्यामुळे लग्नाच्या मिरवणुकीत गोंधळ निर्माण झाला. संतप्त झालेल्या पाहुण्यांनी मंडपाचे पडदे फाडले आणि खुर्च्याही फोडल्या. या मारामारीत दोन्ही बाजूचे दहा जण जखमी झाले. दोन्ही पक्षांच्या ज्येष्ठांनी लग्नातील पाहुणे आणि कुटुंबीयांची समजूत काढण्याचा प्रयत्न केला, मात्र तोपर्यंत प्रकरण तापले होते.
या घटनेची माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी पोहोचले. यानंतर जखमींना जिल्हा रुग्णालयात नेण्यात आले. या भांडणात वधू-वर पक्षातील दहा जण जखमी झाले. या वादामुळे लग्नाचा मुहूर्त निघून गेला. वराच्या घरी शनिवारी आणखी एक लग्नसोहळा असल्याचे सांगण्यात आले. संपूर्ण वादानंतर लग्नाची मिरवणूक वधूशिवाय परतली.दोन्ही पक्षांच्या वडिलधाऱ्यांना वाद मिटवून लग्न सोहळा संमारभ पार पाडण्यात सांगितले गेले.
लग्नात जेवणात पनीरची भाजी नसल्यावरून राडा झाला होता. लग्न सोहळ्यातील मेजवानीत पनीर नसल्यामुळे पाहुण्यांनी जोरदार भांडण केल्याची घटना उघडकीस झाली होती. या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला होता. लोकांनी एकमेकांवर खुर्च्या फेकल्या होत्या.
संबंधित बातम्या