मराठी बातम्या  /  देश-विदेश  /  Jamaica Airport Viral Video: सेक्सची मागणी करत महिलेने विमानतळावरच काढले कपडे, व्हिडिओ व्हायरल

Jamaica Airport Viral Video: सेक्सची मागणी करत महिलेने विमानतळावरच काढले कपडे, व्हिडिओ व्हायरल

Ashwjeet Rajendra Jagtap HT Marathi
Apr 16, 2024 10:41 PM IST

Woman Naked at Jamaica Airport: जमैका विमानतळावर एका महिलेने कपडे काढून धिंगाणा घातला आहे.

एअरपोर्टवर कपडे काढून धिंगाणा करणाऱ्या महिलेचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.
एअरपोर्टवर कपडे काढून धिंगाणा करणाऱ्या महिलेचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.

Jamaica Viral Video: सध्या सोशल मीडियावर एक व्हिडिओ प्रचंड व्हायरल होत आहे, ज्यात एका महिलेने विमानतळावर स्वत:च्या अंगावरील कपडे काढून गोंधळ घालण्यास सुरुवात केली. महिलेला या अवस्थेत पाहून विमानतळ अधिकाऱ्यांचीही अवस्था बिकट झाली. या महिलेने केलेल्या विचित्र मागण्या ऐकून इतर प्रवाशांना धक्का बसला आहे.

ट्रेंडिंग न्यूज

कर्ज फेडायला करावं लागत बाबा…! स्वतःचा व्हिडीओ शेअर करत प्राजक्ता माळी असं का म्हणाली?

सोशल मीडियावर व्हायरल होत असलेल्या हा व्हिडिओ जमैका विमानतळावरील असल्याचे बोलले जात आहे. ज्यात एक प्रवासी महिला विमानतळावर धिंगाणा घालताना दिसत आहे. व्हिडिओत महिलेने मद्यपान केल्याचे समजत आहे. महिलेची ही कृती पाहून विमान तळावरील लोक आश्चर्यचकित झाले. असा दावा केला जात आहे की, दारूच्या नशेत या महिलेने आपले कपडे काढले आणि सेक्सची मागणी करण्यास सुरुवात केली. हे ऐकून तिथे उपस्थित लोक आश्चर्यचकित झाले आहेत. या महिलेला शांत करण्याचे खूप प्रयत्न करण्यात आले. मात्र, बराच वेळ महिला कोणाचेही न ऐकता मोठमोठ्याने किंचाळत होती. महिला तिच्या गुप्तांगाला स्पर्श करीत वारंवार सेक्सची मागणी करीत होती.

मिळालेल्या माहितीनुसार, हा व्हिडिओ दोन महिन्यापुर्वीचा जुना आहे, जो एका यूट्यूब चॅनलवर अपलोड करण्यात आला होता. हा व्हिडिओ जमैकाच्या मॉन्टेगो बे येथील सँगस्टर आंतरराष्ट्रीय विमानतळावरील असल्याचे सांगण्यात आले. ही महिला डॉक्टर असून अमेरिकन मित्रांना भेटायला आली होती, असे सांगण्यात येत आहे. या घटनेबाबतचा अधिक तपशील अद्याप समोर आलेला नाही. परंतु, हा धक्कादायक प्रकार पाहून विमानतळावरील उपस्थित कर्मचारी आणि प्रवासीही स्तब्ध झाले. हा व्हिडीओ आता व्हायरल झाला असून मोठ्या संख्येने सोशल मीडिया युजर्स त्यावर प्रतिक्रिया देत आहेत.

मेट्रोमध्ये पॉर्न व्हिडिओ पाहत महिलेला स्पर्श? व्हिडिओ व्हायरल

दिल्ली मेट्रोमध्ये प्रवास करणाऱ्या एका प्रवाशाने पॉर्न व्हिडिओ पाहत प्रवासी महिलेला आक्षेपार्हरित्या स्पर्श केल्याचा दावा करणारा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. 'फ्री प्रेस जनरल'ने यासंदर्भातील वृत्त दिलं आहे.

IPL_Entry_Point

विभाग