Navneet Rana : काँग्रेसची घोषणाबाजी ऐकून नवनीत राणा यांनी जोडले हात; असं काय म्हणाले कार्यकर्ते? पाहा व्हिडिओ
मराठी बातम्या  /  महाराष्ट्र  /  Navneet Rana : काँग्रेसची घोषणाबाजी ऐकून नवनीत राणा यांनी जोडले हात; असं काय म्हणाले कार्यकर्ते? पाहा व्हिडिओ

Navneet Rana : काँग्रेसची घोषणाबाजी ऐकून नवनीत राणा यांनी जोडले हात; असं काय म्हणाले कार्यकर्ते? पाहा व्हिडिओ

Apr 15, 2024 04:34 PM IST

Navneet Rana Viral Video: अमरावती लोकसभा मतदार संघातील उमेदवार नवनीत राणा यांचा व्हिडिओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहे.

नवनीत राणा यांचा अमरावतीच्या इर्विन चौकातील व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.
नवनीत राणा यांचा अमरावतीच्या इर्विन चौकातील व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. (HT)

Lok Sabha Election 2024: भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त (dr bhimrao ambedkar jayanti 2024) देशभरात उत्साह पाहायला मिळाला. महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांच्यासह अनेक राजकीय नेत्यांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर अभिवादन केले. याच पार्श्वभूमीवर अमरावतीच्या खासदार नवनीत राणा (Navneet Rana) इर्विन चौकातील डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्‍या पुतळ्यासमोर नतमस्‍तक होण्‍यासाठी गेले असता तिथे उपस्थित असलेल्या काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी घोषणा दिल्या. काँग्रेसच्या कार्यकर्त्यांच्या घोषणा ऐकल्यानंतर नवनीत राणा यांनी सगळ्यांसमोर हात जोडले, ज्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

Salman Khan : सलमानच्या घरावर हल्ला करणाऱ्यांनी वापरलेली बाईक कुणाची? तपासात पुढे आली महत्वाची माहिती

मिळालेल्या माहितीनुसार,नवनीत राणा या आपल्‍या समर्थकांसोबत शनिवारी मध्‍यरात्री इर्विन चौकातील डॉ. आंबेडकर यांच्‍या पुतळ्याजवळ पोहचल्‍या होत्‍या. त्यांनी डॉ. बाबासाहेब यांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण केला. मात्र, त्या चबुतऱ्यावरून खाली उतरत असताना काँग्रेस कार्यकर्त्यांनी 'वारे पंजा, आया पंजा' अशा घोषणा देण्यास सुरुवात केली. घटनास्थळी प्रचंड गर्दी असल्याने नवनीत राणा यांनी सुरुवातीला व्यवस्थित ऐकू आले नाही. मात्र, काही क्षणातच हा प्रकार त्यांच्या लक्षात आला. त्यानंतर त्यांनी हात जोडून तिथून जाण्याचा निर्णय घेतला.

Sangli Superstition News : झाडाला आठवडाभर उलटं लटकवलं; अखेर तडफडून झाला मृत्यू, सांगलीत अघोरी प्रकाराने खळबळ

नवनीत राणा काँग्रेसविरुद्ध लोकसभेच्या रिंगणात

हा संपूर्ण प्रकार सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. यंदाच्या लोकसभा निवडणुकीत नवनीत राणा यांच्याविरोधात काँग्रेसचे उमेदवार बळवंत वानखडे हे अमरावती लोकसभा मतदार संघातून लढत आहेत. नवनीत राणा आणि बळवंत वानखेडे यांच्यात चुरशीची लढत पाहायला मिळू शकते. गेल्या लोकसभा निवडणुकीत नवनीत राणा या काँग्रेसच्या पाठिंब्यावर निवडून आल्या. मात्र, यावेळी त्या काँग्रेसच्या विरोधात निवडणुक लढत आहेत. यामुळे काँग्रेस कार्यकर्ते नवनीत राणा यांच्यावर टीका करण्याची एकही संधी सोडताना दिसत नाही.

निवडणूक आयोगाने नवनीत राणा यांचे बॅनर हटवले, कारण काय?

अमरावती मतदारसंघातून लोकसभा निवडणुकीसाठी उमेदवारी मिळालेल्या भाजप उमेदवार नवनीत राणा यांचे बॅनर निवडणूक आयोगाने काढून टाकले आहेत. नवनीत राणा यांनी प्रचाराचे बॅनर लावण्यासाठी ग्रामपंचायतीची परवानगी न घेतल्यामुळे निवडणूक आयोगाने ही कारवाई केली आहे.

Whats_app_banner
विभाग
महाराष्ट्रातील बातम्या, प्रत्येक घडामोडीची ब्रेकिंग न्यूज मिळवा हिंदुस्तान टाइम्स मराठीवर