मराठी बातम्या  /  महाराष्ट्र  /  Salman Khan : सलमानच्या घरावर हल्ला करणाऱ्यांनी वापरलेली बाईक कुणाची? तपासात पुढे आली महत्वाची माहिती

Salman Khan : सलमानच्या घरावर हल्ला करणाऱ्यांनी वापरलेली बाईक कुणाची? तपासात पुढे आली महत्वाची माहिती

Ninad Vijayrao Deshmukh HT Marathi
Apr 15, 2024 12:19 PM IST

Salman Khan House Firing case update : बॉलिवूड अभिनेता सलमान खानच्या (Salman Khan) घराजवळ झालेल्या गोळीबार प्रकरणी हल्लेखोरांनी वापरलेल्या दुचाकी बाबत महत्त्वाची माहिती मुंबई पोलिसांना (Mumbai Police) मिळाली आहे. ही बाईक रायगडमधील असल्याची माहिती तपासात पुढे आली आहे.

सलमानच्या घरावर हल्ला करणाऱ्यांनी वापरलेली बाईक कुणाची? तपासात पुढे आली महत्वाची माहिती
सलमानच्या घरावर हल्ला करणाऱ्यांनी वापरलेली बाईक कुणाची? तपासात पुढे आली महत्वाची माहिती

Salman Khan House Firing case update : बॉलीवूड अभिनेता सलमान खानच्या वांद्रे येथील घरावर रविवारी पहाटे हल्ला झाला होता. या हल्ल्या प्रकरणी अनेक पुरावे मुंबई पोलिसांच्या हाती लागले आहेत. सीसीटीव्हीत ही घटना कैद झाली आहे. हल्ला कुणी केला हे देखील तपासात निष्पन्न झाले आहे. या सोबतच त्यांनी वापरलेल्या दुचाकीबद्दल देखील माहिती मिळाली आहे. ही दुचाकी सेकंड हँड विकत घेण्यात आली असून ती रायगड येथून घेण्यात आल्याचे तपासात पुढे आले आहे.

ट्रेंडिंग न्यूज

Google : ऑनलाइन आर्थिक व्यवहार करताना लोक का फसतात?; गुगलनं चुकांबरोबरच सुरक्षेचे उपाय देखील सांगितले!

हल्लेखोरांनी वापरलेली बाईक रायगडची

सलमान खान याच्यावर हल्ला झाल्यावर मुंबई पोलिसांनी या घटनेचा तपास अधिक वेगवान केला आहे. हल्लेखोर कोठून आले. कसे आले ? त्यांनी बाईक कोणती वापरली या बाबत मोठी माहिती तपासात पुढे आली आहे. सलमान खानच्या घरावर गोळीबार करण्याआधी हल्लेखोरांनी बाईक खरेदी केली होती. ही बाईक त्यांनी रायगड जिल्ह्यातून खरेदी केली असल्याचे तपसात पुढे आले आहे. ही जुनी बाईक असून या बाईकवरुन हल्लेखोर आले होते. ही बाईक सेकंड हँड खरेदी करून त्यांनी मुंबई गाठली. यानंतर सलमान खानच्या वांद्रे येथील घरावर  गोळीबार करून ते पसार झाले आहे. ज्यांच्या कडून ही बाईक खरेदी करण्यात आली पोलिस त्यांची देखील चौकशी करत आहेत.

Israel Iran War : इस्रायल इराण तणावामुळे भारताचं टेन्शन वाढलं! युद्ध झाल्यास काय होऊ शकतो परिमाण? वाचा

हल्ल्याचा सुनियोजित कट

सलमान खानच्या घरावर कारण्यात आलेल्या हल्ल्याचा कट हा अमेरिकेत शिजल्याची माहिती पुढे आली आहे. हल्लेखोरांनी गोळीबार केल्याबर मुंबईतून पसार होण्याचा देखील प्लॅन आखला होता. त्यांनी खरेदी केलेल्या दुचाकीच्या व्यवहारातून काही माहिती मिळते का ? याचा तपास पोलिस करत आहेत.

बिश्नोई गँगने स्वीकारली हल्ल्याची जबाबदारी

सलमान खान याला या पूर्वी देखील मारण्याच्या धमक्या आल्या आहेत. त्याला जीवे मारण्याचे निनावी पत्र देखील मिळाले आहे. तर धमकीचे मेल देखील आले आहे. रविवारी झालेल्या हल्याची जबाबदारी लॉरेन बिश्नोई गँगने घेतली असून तशी फेसबूक पोस्ट देखील केली आहे. लॉरेन्स बिश्नोई हा बिश्नोई समाजाचा आहे. हा समाज निसर्ग पूजक आहे. सलमान खान हा काळविट मारण्याच्या प्रकरणातुन सुटला. दरम्यान हा समाज काळविटाला देव मानतो. यामुळे दरम्यान सलमान खानने दोन काळवीटांची शिकार केल्याचा आरोप असून त्यामुळेच लॉरेन्सने सलमान खानला मारण्याची अनेक वेळा धमकी दिली आहे.

IPL_Entry_Point